Skip to main content

गाणारं वायोलिन!!

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 12/12/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एखाद्या वाद्यातून जर तुम्हाला मराठी भावगीताचे बोल जसेच्या तसे, हो जसेच्या तसेच, म्हणजे अगदी काव्यातल्या जोडाक्षरांसकट आणि गायकाच्या/गायिकेच्या आवाजातली मींड, ताना, आलाप या बारकाव्यांसकट ऐकू आले तर तुम्हाला काय वाटेल? तुम्ही अचंबित व्हाल, इतकेच नव्हे तर या माणसाच्या प्रेमातच पडाल! माझंही अगदी असंच झालंय. प्रभाकर जोग नावाच्या एका अवलियाचे काही यूट्यूब वीडिओज मध्यंतरी बघितले त्याचवेळी मी वेडा झालो होतो. आज मी ते वीडिओ पुन्हा बघितले आणि मग मला राहवेना म्हंटलं आता मात्र या चमत्काराची ओळख मिपाकरांना करुन द्यायलाच हवी. मराठी संगीत क्षेत्रातले हे अतिशय नाणावलेले व्यक्तिमत्त्व आहे.

पॉप संगीतातलं एक सुरेल रत्न - अ‍ॅबा

लेखक प्रास यांनी गुरुवार, 08/12/2011 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
सत्तर चं दशक हे पूर्णपणे 'डिस्को'चं दशक होतं. सुरुवात 'बीगीज'ने केलेलीच होती पण त्याला कळस चढवण्यासाठी हातभार लागला 'ABBA'चा. 'अ‍ॅनी-फ्रीड' तथा 'फ्रीडा लिंग्स्टाड', 'बियॉर्न उल्वैस', 'बेनी एन्डरसन' आणि 'अ‍ॅग्नेथा फेल्टस्कुग' या चार जणांच्या नावाच्या आद्याक्षरानी बनवलेला त्यांचा ग्रूप 'ABBA'.

एवरु लेरनी

लेखक अन्या दातार यांनी मंगळवार, 06/12/2011 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टींचे मोल ती गोष्ट ज्याच्याकडे आहे त्याला जितकी कळते त्याहून चांगल्या तर्‍हेने ती गोष्ट ज्याच्याकडे नाही त्याला उमजत असावी. आईचे प्रेम म्हणजे काय? ममता म्हणजे काय? या गोष्टी कधी सांगून कळण्यासारख्या असतात काय? तर एखाद्या अनाथ म्हणून वाढलेल्याला ही जाणीव प्रकर्षाने होत असेल. असो, सांगायचा उद्देश हा, की परवा आमच्या लाडक्या टॉलिवूड मधील एक निरंजन हा चित्रपट परत बघत होतो.

भाषण

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 06/12/2011 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मिश्रेया यांच्या धाग्यावरून याची आठवण झाली. भाषण कसे असावे, भावना कशा व्यक्त कराव्यात, विनोद कसा हलका फुलका असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे पु.लंचे भाषण...ऐकले नसेल तर - येथे जरूर ऐका...

आय गॉट अ वूमन- रे चार्ल्स

लेखक प्रास यांनी रविवार, 04/12/2011 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रभात मित्रांनो! सकाळी सकाळी आठवण झाली 'रे चार्ल्स'ची. या अमेरिकन गीतकार, संगीतकार आणि गायकाने चांगली ५०-५५ वर्ष संगीत रसिकांवर आपल्या सूरांचं गारुड घातलं. आधी उल्लेख झालेल्या 'ब्लूज' संगीताचाच एक प्रकार असलेला 'सोल' (Soul) संगीत, हे याची खासियत!

"माय लिट्ल यल्लो बास्केट"

लेखक प्रास यांनी शुक्रवार, 02/12/2011 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार दोस्त हो! छोट्या भाचीशी खेळताना बालगीतांचा विचार डोक्यात घोळू लागला. आपल्या मराठीत बालगीतं, बडबडगीतं यांची बर्‍यापैकी रेलचेल आहे. तशीच ती इंग्लिश मध्येही आहे. सध्या तर या इंग्लिश नर्सरी र्‍हाईम्स जागोजागी ऐकायला मिळतात.... अर्थ कळो अथवा नाही..... काय आहे, मराठी शाळाच कमी होतायत ना..... असो. पण आज मराठी-इंग्लिश वादाचा दिवस नाही आणि हा तसा या लेखाचा विषयही नाही..... महाजालात शोधता शोधता १९४१ सालचं एक अप्रतिम रत्न गवसलं आणि तुमच्या बरोबर वाटून घेतल्याशिवाय राहिलं नाही.... काही सेकंदातच मी हे गाणं गुणगुणू लागलो.... 'एला फिट्झराल्ड' रॉक्स......

गोटीपुअ

लेखक आळश्यांचा राजा यांनी गुरुवार, 01/12/2011 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
हे नृत्य पहा. ओडिसी सदृश आहे. या नृत्याचे नाव आहे "गोटीपुअ". हे पाहताना आई म्हणाली, अरे या मुली छान नाचतायत, पण एकही दिसायला चांगली नाही, असं कसं काय? आणि अशा काय विचित्र चालतायत! मी म्हणालो, अगं आई, हे मुलगे आहेत. मुलगे. पुरुषासारखंच चालणार. आणि मुलींचे कपडे घालून मुलींसारखे साजूक नाजूक थोडेच दिसणार? गोटी म्हणजे एक, आणि पुअ म्हणजे मुलगा. मुलगा नाचतो, म्हणून नृत्याचे नाव गोटीपुअ. प्रत्यक्षात आठ दहा जण नाचतात. पण नाव पडले आहे.