४/५ दिवसांपुर्वी असच चॅनल बदलता बदलता एमटीव्ही वर गेलो असताना काही ओळी कानावर पडल्या आणी एक गायक वैविध्यपुर्ण हातवारे करत गाताना दिसला, त्या १०-१२ सेकंदाच्या अवधीत जे काही कानावर पडले त्याने मनमोहुन्,एक प्रकारे उद्विग्न करुन गेले.
अधिक खोदकाम केले असता असे कळले की हा कोक स्टुडिओचा कार्यक्रम असुन गाणारी व्यक्ती ही पियुश मिश्रा आहे आणी ह्यानींच ह्या गाण्याची रचना व पुनर्लेखन केले आहे.
वस्तुतः हे गाणे जावेद नावाच्या माणसाने फाळणीच्या वेळेस स्वतःच्या हुस्ना ह्या प्रेयसीच्या विरहापोटी लिहीले ज्यामधे त्याची तिला पुन्हा न भेटता येण्यामुळेची लाचारी व होणारे अगतिकतेचे दु:ख ह्याचा मिलाफ दिसुन येतो