मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्षण ते...

कौस्तुभ आपटे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
क्षण ते (कॉलेज डेज) क्षण ते, फांदीवरी बसलेले क्षण ते, झुळकीसवे झुरलेले क्षण ते, संपुनही उरलेले मज मिळतील का पुन्हा सवे, झुलतील का पुन्हा मज सांग रे मना. क्षण ते... ॥धृ॥ नभ भासे विहरण्या, पंखाना तोकडे थांबावे ते कुठे, नच आम्हा सापडे त्या पक्षांचे थवे, आता जमतील का पुन्हा भिजुनी मने, जुळतील का पुन्हा क्षण ते .. ॥१॥ हसण्यात आमुच्या जग सारे विरघळे गाण्यात आमुच्या मन सारे पाघळे रंगाने आमुच्या आता रंगेल का आकाश गंधाने आमुच्या पसरेल का सुवास क्षण ते ... ॥२॥ काळ जाई रे पुढे मन मागे ओढते गळलेली ती फुले पुन्हा जोडु पाहते त्या बागेत बहर आता नाचेल का पुन्हा मातीत आमुच्या दिसतील का खुणा क्षण ते ... ॥३॥ गीत :- कौस्तुभ आपटे गाणे ऐकण्या साठी खालील लिंक बघा! http://www.youtube.com/watch?v=rFM_yWLW_B0&feature=relmfu आवड्ल्यास असे स्पुरावे गीत(www.facebook.com/AseSphuraveGeet) या फेसबूक पेज ला जरुर लाईक करा

वाचने 868 वाचनखूण प्रतिक्रिया 0