मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

▁ ▂ ▄ ▅ ▆ ▇ █ बरबादीचा आलम █ ▇ ▆ ▅ ▄ ▂ ▁

लेखनवाला ·
जगण्यातल्या रोजनिशीतल्या घडामोडी 1.व्यवस्था ही शहर तुम्हाला अशीच चालवाचीयत तर तस सांगा, लोकांना जेरीस आणून आपण मात्र सुशेगाद जगायचं, आपल्या सोयीच्या गोष्टीसाठी सगळे नियम धाब्यावर बसवायचे, निवडणुका, प्रकाशन सोहळे, जय्यत तयारीने होणारे खाजगी समारंभ यासाठी कुठे असते सोशल डिस्टसिंग. लोकांना दररोज करावा लागणारा सार्वजनिक बस वाहतुकीचा प्रवास हा सध्या "आज कूछ तुफानी करते है " या कॅटेगरीतला.

सांगली येथे राहणारे कुणी मिपाकर आहेत का?

मुक्त विहारि ·
नमस्कार, दिनांक, 23-24-25 फेब्रुवारी, 2021, ह्या दरम्यान, मी आणि आमची सौ. सांगलीला येत आहोत. 24 तारखेला, संध्याकाळी 5-7 ह्या दरम्यान, एखादा छोटासा कट्टा करता येईल का? सांगलीत पहिल्यांदाच येत असल्याने, ह्या शहराविषयी खूप काही माहिती नाही. कळावे, लोभ आहेच, तो वाढावा ही विनंती ....

इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?

Shantanu Abhyankar ·
इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात? एका अवैज्ञानिक कल्पनेची वैज्ञानिक चिकीत्सा डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी लग्नच का करतात?’, असा प्रश्न ‘लेकुरे उदंड झाली’, या नाटकात एका जोडप्याला पडलेला असतो. अर्थात यांचे रीतसर लग्न झालेलेच असते. याच चालीवर, ‘इतकी शहाणीसुरती माणसं मुळी देवच का मानतात?’, असा प्रश्न विचारता येईल. आस्तिकांच्या मते देव आहेच, आपले अस्तित्व तो विविध लीलांनी दाखवून देत असतो आणि नास्तिकांच्या मते देवाचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही सबब तो नाहीच. तेंव्हा देव आहे का नाही ह्याची चर्चा फारशी उद्बोधक ठरणार नाही.

लोकसंख्या - शास्त्रज्ञ वसंतराव गोवारीकर

उपयोजक ·
http://www.misalpav.com/node/48278 इथे लोकसंख्या वाढीबद्दल थोडे प्रतिसाद आहेत.त्या अनुषंगाने ही शास्त्रीय मुलाखत. ---------------------------------------------------- एप्रिल २००४ मधे पुणे आकाशवाणी केंद्रावर अ.पां.देशपांडे यांनी शास्त्रज्ञ श्री.वसंतराव गोवारीकर यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.त्या मुलाखतीतली लोकसंख्या या मुद्द्यावर गोवारीकर सरांनी मांडलेली मते. वसंतराव , 1991 साली वडोदरा येथील इंडियन सायन्स काँग्रेसचे आपण अध्यक्ष होतात . आणि पुढं 1993 साली इस्लामपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे आपण अध्यक्ष होतात.

आपल्या सुंदर बिनडोक पणाचे रहस्य काय?

मुक्त विहारि ·
लहानपणी, मराठीतला एक सिनेमा, वारंवार बघण्यात आला आणि तो म्हणजे, "सामना" चित्रपटाचे आकलन फार उशीरा झाले. पण डायलाॅग मात्र कायमचे लक्षांत राहिले. शिक्षण नावाचा टाईमपास करत असतांना, हे डायलाॅग, खूप लोकांना ऐकवले .... स्वतःला सर्वज्ञ समजणारा माणूस, तोंडघशी पडला की, खालील डायलाॅग ऐकवायचा ... "गर्व ही सुद्धा एक प्रकारची वस्तुस्थिति आहे." बेकार असतांना, कुणी विचारले की सध्या काय करतोस? तर खालील डायलाॅग ऐकवायचा ....

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

शशिकांत ओक ·

‘मी पाहिलेले-अनुभवलेले आखीव माधवनगर’.

1

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

१.गणेशोत्सव... माधवनगरातील कॉटन मिलमधे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. त्यात आरती-प्रसाद विसर्जन या भानगडीत न पडता आम्हा सवंगड्यांना त्यावेळचे खास आकर्षण असे ते दर शनिवारी ठेवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांचे. त्या काळात एकमेकांच्या घरी जाऊन गल्लीतील सगळे जण बसायला पटकुरं घेऊन रात्री आठ वाजल्यापासून घोळक्याने मिलच्या गेटपाशी रेटारेटी सहभागी होत, आत झुंडीने जात.

मालवणचे देवधर: काही मौखिक आठवणींची नोंद

चलत मुसाफिर ·
(नोंद: या आठवणी त्रोटक आहेत. एका संध्याकाळी दोनतीन तास चाललेल्या गप्पांवरून दुसऱ्या दिवशी जे व जितके आठवले तसे नोंदले आहे. यात जातिसंस्था, शिवाशीव वगैरे प्रथांचा उल्लेख काळानुरूप आला असला तरी त्यांचे उदात्तीकरण करण्याचा मुळीच हेतू नाही. कुणाला ते तसे उल्लेखही अनुचित वाटण्याची शक्यता आहे, त्यांची आधीच माफी मागतो) *** संध्याकाळी आम्ही आमच्या कुटुंबातील Grand Old Man मनोहरमामा देवधर (मूळ गाव देऊळवाडा, मालवण, पण बरेचसे आयुष्य गुजरातेत काढले. आताही वास्तव्य तिथेच) यांच्या घरी गेलो होतो. हे खरेतर आईचे मामा, माझे आजोबाच. पण आम्हीही सगळे त्यांना मामाच म्हणतो. नव्वदीचे वय.

पाणीबाणी

vcdatrange ·
सावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलयं, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.

सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा

अरुण मनोहर ·
सरतील कधी शोष शोषितांचे! - खंड दुसरा भाग ७ - उलट-पलट आदिकाळापासून चालत आलेली व्यवस्था. तिने घर सांभाळायचे आणि पुरुषाने उदरनिर्वाहाचे बघायचे. यात कधीतरी अहंकार आणि आपल्यावरच ती अवलंबून आहे हा गैरसमज शिरला. हळूहळू कुटुंबव्यवस्था नावाखाली तिचे पद्धतशीर शोषण सुरू झाले. तिचा घरच्या कामांसाठी वापर करणे, शिकून काय करायचेय, घराची कामे करायला शिक्षणाचे चोचले कशाला हवे, स्त्री म्हणजे अबला अशी मानसिकता पसरवून तिचा गैरफायदा घेणे.. जिथेजिथे शक्य होईल तसे शोषण जगभरात होऊ लागले.

कोमेजलेला सोनचाफा

लई भारी ·
सोनचाफा आवडतो मला; विशेषतः त्याचा सुगंध. सगळ्यांनाच आवडत असणार. बर्‍याच वर्षांपूर्वी दादर स्टेशन बाहेर पहिल्यांदा बघितला आणि घेण्याआधी वास घेऊन बघत होतो तर फुलवाल्या आजी म्हणाल्या, "बाळा, वास घेऊ नये. देवाला वाहतात फुलं!" आज थंडी वाढली आहे तशी, संध्याकाळी बाहेर जाताना अंधार पडल्यावर गाडीच्या काचा बंद करून हीटर मोड वर चालू होता एसी. एका सिग्नलला गाडी थांबली आणि बहुतांशी रस्त्यावर राहणारी माणसं काहीबाही विकायला घेऊन आली. कुठेतरी वाचलेले आठवते की अशा लोकांना पैसे देऊन उत्तेजन देऊ नका. पळवून नेलेली मुलं घेऊन भीक मागतात. किंवा विनाकारण काही वस्तू गळ्यात मारतात वगैरे.