http://www.misalpav.com/node/48278 इथे लोकसंख्या वाढीबद्दल थोडे प्रतिसाद आहेत.त्या अनुषंगाने ही शास्त्रीय मुलाखत.
----------------------------------------------------
एप्रिल २००४ मधे पुणे आकाशवाणी केंद्रावर अ.पां.देशपांडे यांनी शास्त्रज्ञ श्री.वसंतराव गोवारीकर यांची प्रदीर्घ मुलाखत घेतली होती.त्या मुलाखतीतली लोकसंख्या या मुद्द्यावर गोवारीकर सरांनी मांडलेली मते.
वसंतराव , 1991 साली वडोदरा येथील इंडियन सायन्स काँग्रेसचे आपण अध्यक्ष होतात . आणि पुढं 1993 साली इस्लामपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाचे आपण अध्यक्ष होतात. या दोन्ही वेळेला आपल्या भाषणांचा विषय लोकसंख्या हा होता . या विषयाकडे आपण कसे वळलात ? आणि त्याविषयी आपली काय मतं आहेत?
1975 साली एम . एस . स्वामिनाथन हे इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष होते . तेव्हा त्यांनी एक नवा पायंडा पाडला . त्यापूर्वीचे जे अध्यक्ष होते . ते स्वत : च्या विषयावर बोलायचे . स्वामिनाथन यांचं म्हणणं असं होतं की , ही गोष्ट आता बदलली पाहिजे . कारण इंडियन सायन्स काँग्रेसला 4 - 5 हजार माणसं जमलेली असतात , आणि ती वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात . या सगळ्या मंडळींना समजेल असा अध्यक्षांच्या भाषणाचा विषय असावा .आणि हे बऱ्याच अंशी त्यानंतर पाळलं गेलं .जो अध्यक्ष व्हायचा असतो , त्याला आधी सांगायला लागतं , तो कोणत्या विषयावर बोलणार आहे .मग तो विषय इंडियन सायन्स काँग्रेसच्या महासभेनं मान्य करायचा असतो.अशी तिथली पद्धत आहे. माझं नाव जेंव्हा 1991 वर्षासाठी एक वर्ष आधी जाहीर झालं होतं तेव्हा मी विचार करीत होतो की कोणत्या तर्हेचा विषय हा समजायला सोपा आणि काहीतरी नवीन सांगणारा असू शकेल, तेव्हा थोड्या दिवसांनीच खानेसुमारी होणार होती.यापूर्वीच्या विचाराला सर्वसाधारण कल असा होता की एवढी लोकसंख्या वाढली आहे .आता या देशाचं काय होणार? वगैरे. त्यावेळी , विज्ञान लोकसंख्या आणि विकास' हा विषय माझ्या डोक्यामध्ये आला.आणि त्यावर विचार करायला मला वर्षभर वेळ मिळाला होता.विज्ञानाची जोडणूक समाजाशी संबंधित असावी म्हणून मी तो विषय घेतला.आणि तात्कालिक कारण म्हणजे खानेसुमारी यायची होती. मला स्वत:ला माहितीपण पाहिजे होती, हे सर्व आहे तरी काय ?माझं त्याच्यामध्ये कुठलही मत तयार झालं नव्हतं; कारण मला त्यातली काही माहिती नव्हती. कुठलाही अभिनिवेश नव्हता .पण एक वर्षभर जेव्हा मी यावर जेव्हा वेगवेगळ्या लोकांशी बोलत होतो.तेव्हा अगदी निरपेक्षपणे एेकत होतो,त्याचं ध्वनिमुद्रण करत होतो, घरी येऊन त्याचा विचार करीत होतो. त्यावरून मला खरोखरीच वाटायला लागलं की हिंदुस्थानातील लोकसंख्या ही एक समस्या आहे असा जो विचार आहे. हा काही मला फारसा खरा दिसला नाही. त्या काळातले माझे जे निष्कर्ष होते , ते मी तुम्हाला सांगतो, मग तेच पुढं मी विकसित केलं. लोकसंख्या का वाढल्यासारखी वाटत आहे. तर त्याचा विज्ञानाशी काहीतरी संबंध होता.पेनिसिलीनचा शोध लागल्यानंतर एका नवीन अँटीबायोटिक पद्धतीची सुरुवात झाली आणि त्यामुळं आयुष्यमान कमालीचं वाढलं . सध्या आपलं सरासरी आयुष्यमान - स्त्रियांचं व पुरुषांचं 65 च्या आसपास आहे . हे सारखं वाढतच राहिलेलं आहे . लोकसंख्यावाढ म्हणजे काय आहे ? तर जन्मदर आणि मृत्यूदर यांमधील जो फरक तो म्हणजे लोकसंख्यावाढ . तर मृत्युदर नवीन उपचारांनी कमी होतोय . जन्मदर कमी व्हायला मृत्यूदर बरीच दशके कमी व्हायला पाहिजे . त्यानंतर जन्मदर कमी व्हायला लागतो. आणि मग अशी वेळ येते की , जन्मदर आणि मृत्युदर सारखाच होतो . म्हणजे लोकसंख्येची वाढ शून्याकडे जायला लागते.
यालाच तुम्ही लोकसंख्येच स्थिरीकरण म्हणता का?
यालाच आम्ही लोकसंख्येचे स्थिरीकरण म्हणतो. लोकसंख्येत शून्य वाढ असं याला म्हणतात.स्थिरीकरण त्याच्या आसपास असतं .1941 - 1971 ही 30 वर्ष जर तुम्ही बघितली तर मृत्यूदर हा निम्म्यानं कमी झालेला आहे.पण जन्मदर हा फक्त 3 - 4 आकड्यांनीच कमी झालेला आहे. त्यामुळे इ .स .1941 ते 1971 यामध्ये लोकसंख्या झपाट्यानं वाढलेली आहे.याला कोणी काही करू शकत नाही .जन्मदर कमी व्हायला अनेक दशके अशी जायला लागतात , जेव्हा मृत्युदर कमी झालेला असतो. हा सगळ्या जगाचा अनुभव आहे .आपल्याकडे मृत्युदर कमी व्हायला लागण्याला कारण पेनिसिलीनचा प्रभाव व आपल्याकडे त्याचा सुरु झालेला उपयोग .इ .स .1971 - 81 ही दहा वर्ष पाहिलीत तर जेवढा मृत्युदर कमी झाला आहे .तेवढाच जन्मदर कमी झाला आहे .इ .स .1981 - 91 ही दहा वर्ष जर बघितलीत , तर जन्मदर मृत्यूदरापेक्षा जास्त कमी झाला आहे .1991 सालाकडे बघितलंत तर आपला मृत्युदर हा दर हजारी 8.5 ते 9 पर्यंत आलेला आहे .जो युरोपमधील स्पेन , इटलीसारख्या अनेक देशांच्या बरोबरीत आलेला आहे .उदा .इटली , म्हणजे सरासरी आयुष्यमान 20 - 21 वर्षाचे कुठं आणि ( 1991 च्या सेन्ससप्रमाणे ) 54.5 चं कुठ? अडीचपट झालं,अशी एकदम चढ आली.आज मृत्युदराच्या दृष्टीनं आपण जवळजवळ आंतरराष्ट्रीय झालोत. आता आपण युरोपमधील पुष्कळ देशांशी बरोबरी करत आहोत. त्यामुळं याच्यापुढं मृत्युदर फारसा कमी व्हायचा नाही. थोडाफार होईल. पण आता जगामध्ये जन्मदर झपाट्यानं कमी व्हायला लागलेला आहे .त्यामुळं जन्मदर आणि मृत्युदर यांच्यातला फरक म्हणजे लोकसंख्यावाढीचा दर झपाट्याने कमी होत आहे , असं माझं सांगणं होतं .पण हे केव्हा थांबेल? तुम्ही म्हणता ते स्थिरीकरण केव्हा होईल? ते साधारण इ .स. 2040 - 2050 च्या आसपास कुठंतरी होईल .थोडक्यात मुख्य मुद्दा असा आहे की , ही प्रक्रिया जेवढा वेळ घेणार आहे .त्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही .त्यामुळे प्रत्येक खानेसुमारीचा निष्कर्ष आला की या देशाचं काय चाललं आहे , कशी लोकसंख्या वाढतेय , कसं होणार पुढं , असं म्हणण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही .लोक काळजी करतात , तज्ज्ञही तेच करतात .काय होणार आहे? कसं होणार आहे? मी असं म्हणतो की 1951 साली जर मला या लोकसंख्या विश्लेषणाचं ज्ञान असतं तर 2001 साली किती लोकसंख्या होईल हे मी सांगू शकलो असतो .काही ठरावीक मयदिमध्ये .म्हणजे या मधल्या दहा वर्षामध्ये दोन खानेसुमारीच्या मधल्या काळामध्ये असं काही भयंकर घडत नसतं की ज्यामुळं आपण चिंतित व्हावं.
रघुनाथ कर्वेचं जन्मदरांच्या संदर्भामध्ये काय मत होतं?
त्यांचंं अतिशय व्यावहारिक मत होतं.त्यांचं मत असं की, हे जे तुम्ही लोकसंख्या कमी करा वगैरे सांगताय ते कोणी ऐकणार नाही .देशासाठी करा सांगितलंत तरी कोणी ऐकणार नाही .जेव्हा माणसाला समजेल की लोकसंख्या कमी करण माझ्या वैयक्तिक हिताचे आहे , तेव्हा तो कुटुंबनियोजन करील .र .धों .कर्वे यांनी 60 वर्षांपूर्वी हे सांगितलं.
तुम्ही आता हा सिद्धान्त मांडला, तो निरीक्षणांवर आधारित आहे?
होय , निरीक्षणांवर आधारित आहे.
पण तरीदेखील, तो परदेशात तज्ज्ञांना मान्य झाला का?
हो , परदेशात पुष्कळ तज्ज्ञांना तो मान्य झाला .जेव्हा सायन्स काँग्रेसमध्ये मी हे प्रथम मांडलं , तेव्हा तिथं युनायटेड नेशन्सच्या अनेक संस्था होत्या .यूएनडीपी , यूएनएसपीए .डब्ल्यूएचओचे लोक होतं .दर सायन्स काँग्रेसच्या वेळेला हे लोक साधारण तिथं असतात .त्यांना माझा हा दृष्टिकोन वेगळा वाटला आणि मग ती मंडळी माझ्याकडे आली .सायन्स काँग्रेस झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की , असं मत मांडणारे तुम्ही पहिले आहात , 400 - 500 पानांचा ग्रंथ विज्ञान लोकसंख्या आणि विकास , या मुख्य विषयावर प्रकाशित झाला .यात माझी स्वत:ची काहीतरी चार प्रकरणे होती .पण बाकी सर्व विभागांतील तज्ज्ञांचे त्यामध्ये लेख होते ." विज्ञान , लोकसंख्या आणि पाणी ' , " विज्ञान , लोकसंख्या आणि शिक्षण ' अशा प्रकारचे , तेव्हा एवढं मोठंच्यामोठं पुस्तक , सायन्स कांग्रेसच्या संमेलनापूर्वीच्या वाचनासाठीचं वाटलं होतं .त्यात माझं भाषणही होतं .त्या सगळ्या मंडळींनी त्याचा अभ्यास केला होता .त्यांना त्यात नावीन्य वाटलं .त्यांनी पूर्वी असं काही पाहिलेलं नव्हतं .म्हणून ती मंडळी माझ्याकडे आली आणि म्हणाली की , तुम्ही या मूळ 500 पानी पुस्तकांवरून आम्हाला एक छोटं पुस्तक , साधारण 300 पानांचं करून द्या .आम्ही त्याचा खर्च करतो .ते आम्ही केलं .ही पुस्तकं डब्ल्यूएचओ , यूएनडीपी .यूएनएसपीएच्या मंडळीनी परदेशात पाठवून दिली.
काय नाव बरं त्या पुस्तकाचं?
'द इनएव्हिटेबल बिलियन प्लस ' असं या पुस्तकाचं नाव होत.मुळात नाव होतं ' विज्ञान , लोकसंख्या आणि विकास .' हे जे 300 पानांचं पुस्तक होतं ' बिलियन प्लस ' त्यांच्या दोन आवृत्या निघाल्या.आणि आपल्या नॅशनल बुक ट्रस्ट ( एनबीटी ) तर्फेही त्याच्या 2 - 3 आवृत्त्या काढल्या गेल्या .न्यूयॉर्कचं जे प्रसिद्ध पॉप्युलेशन काउन्सिल आहे , तिथं या पुस्तकाच्या अनेक प्रती गेल्या .आणि माझा असा समज आहे की , त्यानंतर हिंदुस्थानाच्या लोकसंख्येबद्दल जो अगदी नकारात्मक दृष्टिकोन ही पाश्चिमात्य मंडळी मांडायची , तो दृष्टिकोन पुष्कळ कमी झाला .कारण मी तेव्हा म्हटलं होतं की 2020 - 2050 साली हे होईल तेव्हा बरोबर 100 वर्षांचे चक्र पुरं होतंय . एकदा ही जाणीव झाली , त्या दृष्टीनं हालचाल सुरू झाली , मी1941 सालापासूनचा हिशेब मांडतोय . . . .
आपल्याला असं नको आहे की , सरासरी आयुष्यमान फार कमी आहे . जन्मदरही प्रचंड आहे आणि मृत्युदरही प्रचंड आहे , आणि म्हणून लोकसंख्या स्थिर झाली आहे . ही परिस्थिती आपल्याला नको आहे . इ.स. 1920 आणि 1930 हे जे दशक होतं , त्यामध्ये ते आलेलं होतं . खरं म्हणजे काही दशकांमध्ये लोकसंख्या अक्षरश : कमी झालेली आहे . जन्मदर प्रचंड होता आणि मृत्युदरही त्याच्यापेक्षा प्रचंड होता त्यामुळे उणे वाढ झालेली आहे . आपल्याला तसं नकोय . आपलं , जे राहणीमान आहे . त्याची जी गुणवत्ता आहे , ती कुठतरी चांगल्या तर्हेने होऊन , त्यादृष्टीनं आपण जे म्हणतो की , 65 हे आपलं सरासरी आयुष्यमान आपले आहे . आणि मग जन्मदर मृत्युदर हे दोन्ही कमी व्हावेत , आयुष्यमान वाढावं , अशी आपली अपेक्षा आहे . मी नेहमी म्हणतो की हा फार वेगळा परिणाम आहे . तुम्हाला आठवत असेल की इ.स.1940 - 50 मध्ये सरासरी आयुष्यमान 30 च्या आसपास होतं , 30 च्या पुढं गेलात की तुम्ही उतारवयाला लागलात ! अशी परिस्थिती 1930 साली होती . आणि वयानं 40 च्या पुढं गेलात म्हणजे आपलं आता काय होईल , अशी भाषा लोक बोलायचे.
अहो , लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला आहे.' फर्ग्युसन कॉलेजमधले चार म्हातारे ' आणि ही चार माणसं चाळिशीची होती, ती म्हातारी झाली असा अग्रलेख आहे.
होय , आणि माझं असं मत आहे की , हल्ली परिस्थिती अशी आहे . विशेषत : स्त्रियांच्या बाबतीत त्यांना 60 - 70 वयानंतर मध्यमवयाच्या म्हणायला हरकत नाही , कोणी म्हातारे होणारच नाहीत आता कारण आपण ज्याला म्हातारवय म्हणायचं , त्या वयाच्या पलीकडं मनुष्य गेलेला आहे. आणि त्याचा सामाजिक संदर्भ बदलला आहे , असं माझं म्हणणं आहे . म्हणून आपलं निवृत्तीचं वय आता 60 आहे . 64 - 65 वयापर्यंत मनुष्य काम करू शकतो. अमेरिकेत अनेक विद्यापीठं अशी आहेत की तिथं माणसं 65 व्या वर्षी निवृत्त होतात.
(आभार: मराठी विज्ञान परिषद)
वाचने
9398
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखाबद्दल धन्यवाद.
_/\_
In reply to लेखाबद्दल धन्यवाद. by साहना
कुणाला इंटरेस्ट असेल तर वेगळ्या लेखांत विस्ताराने लिहीन.
In reply to लेखाबद्दल धन्यवाद. by साहना
@साहना
In reply to लेखाबद्दल धन्यवाद. by साहना
ह्या मध्ये ह्याचा पण विचार करावा लागेल
अंदाज....
In reply to ह्या मध्ये ह्याचा पण विचार करावा लागेल by Rajesh188
एक साधे तर्क शास्त्र आहे ....
ह्या तर्कांत एक खूप मोठी चूक
In reply to एक साधे तर्क शास्त्र आहे .... by मुक्त विहारि
थोडक्यात....
In reply to ह्या तर्कांत एक खूप मोठी चूक by साहना
मस्त विषय ...
+ १
In reply to मस्त विषय ... by मुक्त विहारि
जगात
आपण सहारा मध्ये राहायला जावे.
In reply to जगात by Rajesh188
सहारा वाळवंट असल्याने,
In reply to आपण सहारा मध्ये राहायला जावे. by साहना
काय चुकीचे बोलले राजेश इथे?
In reply to आपण सहारा मध्ये राहायला जावे. by साहना
वाक्यात थोडा बदल करतो...
In reply to जगात by Rajesh188
नक्कीच
In reply to वाक्यात थोडा बदल करतो... by मुक्त विहारि