समाज
लाईफमें कभी कभी मसाला मंगता है..
सकाळ झाली.भैरु उठला. न्याहरी करुन शेतावर गेला. माझीही अशीच तऱ्हा. तेच ते आणि तेच ते. "बाई मी दळण दळिते" हे खरं तर "बाई मी पीठ दळते." असं हवं.
माझीही सकाळ उगवली. वाॅशरुममध्ये गेले. तोच तो ब्रश घेतला. तीच ती उदासवाण्या पांढऱ्या रंगाची पेस्ट त्यावर लावली. माझी पेस्ट ना खुशबूदार,ना झाग वाली,ना असरदार. मी दात घासले. टंग क्लिनरनं जीभ साफ केली. मग त्याच त्या वासाच्या, लवकर न झिजणाऱ्या आणि न संपणाऱ्या साबणानं चेहरा धुतला. केस नीट केले. आणि अंजनीबाईंनी केलेला तोच तो पाणचट चहा प्यायले. चहा किती बेचव,पुळकवणी!
भारतीय विचार - मांडुक्य उपनिषद
मांडुक्य उपनिषद
हे उपनिषद, मनुष्य रोजचे आयुष्य जगत असताना मनुष्याचे स्वरूप सच्चिदानंद आत्मा म्हणजे ब्रह्मरूप आहे आणि ते मनुष्याने स्वत: कसे जाणावे हे समजावून सांगते. उपनिषदांनी ब्रह्म जाणण्यासाठी विविध प्रक्रिया शिकवल्या आहेत. मांदुक्य उपनिषद जी प्रक्रिया शिकवते तिला ‘अवस्थात्रय’ म्हणता येईल. मानवी आयुष्याचे सर्व अनुभव, जागेपणा, स्वप्नावस्था आणि स्वप्नरहित असलेली गाढ झोप या तीन अवस्थांमध्ये असतात हे सर्वांनाच माहीत असते. आपण याचा रोजच अनुभव घेतो. आपण जागेपणी या व्यावहारिक जगाचा अनुभव घेतो. स्वप्नावस्थेत आपले मन विविध कल्पना निर्माण करते आणि आपल्याला जगाचा अनुभव येतो.
गोदातीरीची ऐतिहासिक भेट.
आज सकाळी कधी नव्हे ते, बॅडमिंटन खेळायला गेलो. पूर्वीसारखे आता नियमित खेळणे होत नाही. नेटजवळील सेटल घ्यायला जी लवचिकता आणि चपळता लागते ती आता वयांपरत्वे कमी व्हायला लागलीय. पण, मित्रांसाठी भेटीगाठी होतात म्हणून अधून-मधून बॅडमिंटन कोर्टवर जात असतो.
जिरेटोप
"सर... ओळखलंत का मला?"
आईशप्पथ सांगतो... असं अचानक कोणी रस्त्यात भेटलं की माझी जाम गडबड होते. एक तर आपली मेमरी सुभानअल्ला! आणि त्यातून "ओळखलंत का मला" म्हणणारा इसम किमान ४-६ वर्षांनी समोर टपकलेला असतो. अश्या वेळी प्रोसेसर मेमरीची क्लस्टर्स शोधत असताना कितीही प्रयत्न केला तरी माझ्या चेहर्यावर मात्र स्क्रीनसेव्हर लावलेला स्पष्ट दिसत असतो.
पण ह्याला ओळखायला क्षणभरच वेळ लागला. कारण त्याचे ते धारदार डोळे आणि त्यांच्या मधला टिळा हे कॉम्बिनेशन. परेश - माझ्या आधीच्या कंपनीतला अॅडमिन मॅनेजर. उमदा गडी. आपल्याच तानात असायचा. कानाला भिकबाळी, कपाळाला केशरी टिळा, बुलेटवरून फिरायचा.
हरिश्चंद्र-शशक+
तू कुठे इकडे?कोण गेलं?
थंडीत जळत्या सरणा समोर तो एकटाच बसला होता.
जास्तच कुरेदल्यावर,तो आपली रामकथा सांगू लागला.
"बाप कबाडी होता.रस्त्याच्या कडेला कबाडातच मेला. या जगात तो आणी मीच.
जाणाऱ्या येणाऱ्यानां वाटत होते बेवडा आहे. दोन चार गाडीवाल्यांनी पाच दहा रूपायाच्या नोटा फेकल्या आणी पुढल्या जन्मासाठी पुण्य कमावलं.शेवटी तिथल्याच एका हातगाडीवर टाकला व मसणात विल्हेवाट लावली.
छडा गिरधारी, ना लोटा ना थाली.
सरकारी लोक देतात थोडेफार.
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
✪ मोहीमेतील महत्त्वाचा टप्पा
✪ हिरव्यागार निसर्गातील रस्ते
✪ भीमा आणि गाणगापूर
✪ अशी राईड = अपूर्व आनंद
✪ अशा प्रवासात आपली स्वत:सोबत होणारी खरी भेट
✪ कलबुर्गीमध्ये श्री बसवराजजींसोबत भेट
✪ ६ दिवसांमध्ये ५३८ किमी
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- च
मिसळपाव