मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिक्षण

अभियांत्रिकीचे दिवस- भाग १

पाटिल ·
इसवी सन: २००६-०७ आता ह्यात मुख्यतः 'महाराजा'च्या टेरेसवर सुरुवात केलेल्या चतकोर बीअरपासून पुढे खंबे पालथे घालण्यापर्यंत सुसाट वेगानं झालेल्या प्रवासाबद्दलच लिहावं लागेल. आणि तो विषय हार्ड होईल.. म्हणून ते नको. तर अभियांत्रिकीच्या दिवसांबद्दल लिहायचं तर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सोडून बाकीच्या गोष्टींबद्दलच लिहावं लागतं. हे असं होतंच म्हणजे.

फडफडणारा पक्षी आणि वातावरण

Harshal Kulkarni ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मी त्यावेळी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली, येथे पदव्युत्तर शिक्षण घेत होतो! अभ्यासक्रमात भालवणकर सर Finite Element Analysis शिकवत होते! कृश शरीरयष्टी, बेताची उंची, पाठीतील थोडा बाक, अधू दृष्टी असल्याने जाड भिंगाचा चष्मा, असे एकंदरीत व्यक्तिमत्व! भरीस भर म्हणून, वयोमानानुसार आवाजही बारीक झालेला! वर्गात ते शिकवत असताना एकंदरीत जेमतेमच कळे, आणि lecture संपल्यावर त्यांना गाठून शंका विचाराव्या लागत! असो! Semester चे सुरुवातीचे दिवस होते, त्यामुळे introduction मध्ये सर विषयाचा significance आणि importance अनेक उदाहरणातून समजावून देत होते!

मला भेटलेले रुग्ण - १९

डॉ श्रीहास ·
‘डॉक्टर कभी भी कुछ लगे तो याद किजीये ‘ असं म्हणत पेशंटच्या बापानी हात जोडून नमस्कार केला ..... ६ महीन्यांपुर्वी टिबीचं निदान झालं आणि सेकंड ओपिनीयनसाठी माझ्याकडे आले होते.... मग औषधं लिहीणं, टिबीची माहिती देणं आणि आहारासंबंधी बोलून झाल्यावर धीर देणं हा माझा नियमीत प्रोटोकाॅल ! प्रत्येक व्हिसीट वेळेवर किंवा वेळेआधीच आणि शेवटी पेशंट आजारातून बाहेर असा सगळा काळ गेला परंतू डोळ्यात अश्रु घेऊन धन्यवाद देतांना त्यांनी अदृश्य आर्शिवाद दिलेला मला दिसला .... मी असं काय जगावेगळं केलं की त्यांच्या डोळ्यात पाणी यावं ? मी ईतका महान आहे का ?

मंदीत संधी

रानरेडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मंदीत संधी लेखक हेमंत वाघे. मी दुबईला जंबो इलेक्ट्रोनिक्स म्हणून कंपनीत काम केले होते . हि मनु छाब्रिया म्हणून एक अत्यंत श्रुड आणि धाडसी माणसा ने स्थापन केलेली कंपनी होती ,( मी होतो तेंव्हा तो मेला होता ) हा मनु कर चुकवून दुबईला पळाला होता व तिकडून तो त्याच्या भारतातील काही कंपनी चालवायचा ! ( तो दुबई मध्येच मेला ) त्याची एकदा एका अति सिनिअर स्टाफ ने त्याची गोष्ट सांगितली होती . जंबो इलेक्ट्रोनिक्स हा सोनी जंबो चा फार फार मोठा डिस्ट्री ब्युटर होता ( बहुदा जगातील सर्वात मोठा ) आणि मोठ्या कम्पनी प्रोडक्शन प्लान करताना डिस्ट्री चा सल्ला घेतात .

विसरून जाण्याजोग्या आठवणी

deepak.patel ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आंतरजालावर हल्लीच शाळा कॉलेजातील अविस्मरणीय आठवणींबद्दल चर्चा वाचली होती. त्यावर लिहिण्यासारख्या बर्‍याच आठवणी आहेत, पण माझ्यापाशी शाळेतल्या दिवसांमधल्या कायमच्या विसरून जाण्याजोग्याही बर्‍याच आठवणी आहेत. आज त्याच लिहाव्या असं वाटलं. माझ्या शाळा होती मुंबईत. म्हणजे अगदी शिवाजी पार्क, गिरगांव अशी खुद्द मुंबईतल्या भागांमध्ये नाही तर एका उपनगरामध्ये. शाळा चांगली होती, उत्तम शिक्षक होते. अभ्यास, परिक्षा, इतर उपक्रम सगळ्याची योग्य सांगड घातली जाई. शाळेतली मुलंही सुसंस्कृत, मध्यमवर्गीय घरांमधली होती.

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

पाषाणभेद ·

पथनाट्य: बचत पाण्याची, समृद्धी जीवनाची!

कलाकारः सुत्रधार आणि दोन सहकारी कलाकार (दोघांकडे एक एक वाद्य असेल तर उत्तम.) (शक्य असल्यास पथनाट्य सादरीकरणाआधी स्थानिक जनतेच्या अवलोकनार्थ, वातावरण निर्मीतीसाठी पाण्याच्या अपव्ययाचे, दुष्काळाचे प्रातिनिधीक छायाचित्रे असलेला फलक लावावा.) एक सहकारी कलाकार (पाणीवाल्याच्या भुमिकेत ): पाणी घ्या पाणी, पाणी घ्या पाणी! दुसरा सहकारी (स्त्री भुमिकेत): अरे ए पाणीवाल्या कसे दिले पाणी? पाणीवाला: शंभर रुपयाचा एक ग्लास पाणी, पाणी घ्या पाणी. स्त्री: काय!

मी मोठ्ठा की लहान?

पाषाणभेद ·
मला कुणी मोठ्ठं समजतच नाही मी लहानाचा मोठ्ठा जसा झालोच नाही ||धृ|| अभ्यास कर अभ्यास कर सतत सांगता निट लक्ष दे बोलतात उठता बसता अभ्यास तर तो होतच असतो त्याशिवाय का मी पास होतो? तरी बोलतात तुला काही समजतच नाही ||१|| अभ्यासाच्या ताणातुन सुटकेसाठी खेळ खेळणे चांगले आरोग्यासाठी बोलणे हे खोटे आहे तुमचे सारे कारण खेळ कोणते खेळावे ते तुम्हीच ठरवावे अशाने ताण कधी कमी होतच नाही ||२|| शाळा म्हणजे काय शाळा आहे!? पुस्तके कित्ती तरी! सोबत वर्कबुक्स आहे ओझे दप्तराचे घेवून सकाळीस निघे टाय, ब्लेझर गणवेशातले काय कामाचे? मला जे समजते ते शाळेतल्या शिक्षकांना समजत का नाही?

EVM

चिगो ·
लेखनप्रकार
(डिस्क्लेमर : हा लेख EVM बद्दलची माहिती देणे व त्याबद्दलचे गैरसमज दुर करणे, ह्या हेतूने लिहीण्यात येत आहे. सदर माहिती ही लेखकाच्या निवडणुकांबद्दलच्या अनुभवांवर तसेच भारत निर्वाचन आयोगाद्वारे बनवलेल्या नियम, प्रोटोकॉल्स आणि निर्देशांवर आधारीत आहे. कुणाही वाचकाला जर ह्या विषयावर सखोल माहिती हवी असेल तर ती माहिती भारत निर्वाचन आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना नम्र विनंती आहे, कि त्यांनी त्यांना असलेल्या शंकांना कृपया राजकीय वळण न देता विचाराव्यात.

सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग

माहितगार ·
इस्लामिक कट्टरतावादाची समस्येस विवीध देश विवीध पद्धतींनी तोंड देत आहेत. चीनमध्ये दहा च्या आसपास मुस्लिम समुह आहेत त्यापैकी उघ्युर बहुल झिंजीयांग प्रांत मुस्लिम बहुल समजला जातो. समजला जातो हा शब्द प्रयोग यासाठी कि चिनी कम्युनीस्ट क्रांती नंतर मुख्य चिनी हान वंशांचे चीनच्या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणावर स्थानांतर करण्यात आले त्यामुळे आता झिंजीयांग प्रांतात देखिल मोठ्या प्रमाणावर हान चायनीज लोकही रहातात. चिनमध्ये सुरवातीपासूनच चीन बाह्य धार्मिक प्रभावांच्या स्थानिकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे.

आजच्या घडीला आपल्याकडे जी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे!

आदित्य कोरडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजच्या घडीला आपल्याकडेजी आहे ती शिक्षण पद्धती ( EDUCATION SYSTEM ) आहे कि परीक्षा पद्धती (EXAMINATION SYSTEM)आहे. "९८१ भागिले ९ किती होतात रे?" कंपनीत आमच्या सेक्शनमध्ये नव्यानेच जॉईन झालेल्या ट्रेनी पोराला विचारले. "कितीही वेळ लागुदे, मनात कर किंवा कागदावर. पण calculator, कॉम्प्यूटर किंवा इतर कुणाची मदत नाही घ्यायची.स्वत;चे स्वत: करायचे." ( डिप्लोमा-ट्रेनी म्हणजे डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे हा पोरगा.) “ह्या! त्याची काय गरज आहे? ९८१ भागिले ९ ना... सोप्पे तर आहे उत्तर ९९.”तो म्हणाला मी शांतपणे म्हटले “कागदावर कर. तुला हवा तेवढा वेळ घे.