तासगावचं घर :
श्रीकृष्ण सदन, नरगुंदे बोळ, २ नं. शाळेसमोर, मेन रोड, तासगांव. असा पत्रिय पत्ता. तासगावात विचारायचे झाल्यास गोखले वकिलांचा वाडा. अस जर कोणाला विचारलं तर डोळे झाकून आणून सोडतील.
नरगुंदे बोळात मोठा दरवाजा त्यातल्याच एका दाराला छोटा दिंडी दरवाजा.. दरवाजातून आत गेलं की, उजव्या बाजूला रिकामा गोठा, डाव्याबाजूला एका ओळीत बिर्हाड करूंच्या खोल्या. मला आठवणारे बिर्हाड्करू म्हणजे माणगांवकर शिक्षक आणि एक कोणितरी नर्स . पुढे गेलं की, मोठ्ठ अंगण .. अंगणाच्या डाव्या बाजूला माडीवर जाण्यासाठी केलेला लाकडी जीना. बरोबर समोर.. सारवलेलं अंगण आणि जुन्या पद्धतीचं घराचं दार..