’वि.वा.’ कुसुमाग्रज - एक अवलोकन
नाही, हे कुसुमाग्रजांच्या लिखाणाचे किंवा त्यांच्या कवितांचे अवलोकन नाही, तर त्यांच्या कवितांवर जो एक संच काढला आहे त्याचे अवलोकन आहे.
महाराष्ट्र टाईम्स व टाईम्स म्युझिक ह्यांनी सादर केलेला "’वि.वा’ कुसुमाग्रज" हा संच मी मागवला. विचार केला एरवी कविता वाचणे जास्त होत नाही. गाणी/कथा ऐकण्याची सवय आहे तर ह्याचा फायदा करून घ्यावा. नोंदणी करून ठेवली. ३० एप्रिलला मला दिल्लीहून फोन आला तुमची ऑर्डर नक्की करण्याकरीता हा फोन आहे. तुम्हाला २५०+२५ रू.द्यावे लागतील.
मिसळपाव