कुत्र आणि कानमंत्र
लेखनप्रकार
मला लहानपणा पासुनच कुत्र्यांची भीती वाटायची. ज्या रस्त्यावर कुत्रे आहेत त्या रस्त्यावरून मी जातच नसे. कुत्र्यांच भूंकण, त्यांचे विषारी दात, कुत्रं चावल्यामुळे होणारा रोग आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुत्रा चावल्यानंतर पोटात घ्यावे लागणारे इंजेक्शन या सर्व गोष्टींची आठवण काढली की अंगाला काटा येतो. या सर्व गोष्टींमुळे मला कुत्र्यांची फार भीती वाटायची.
मी कुत्र्याला घाबरतो म्हणून माझे सर्व मित्र मला हसायचे. ते मला नेहमी सांगायचे की, "कुत्र कधी अंगावर आलं किंवा पाठीमागे लागलं तर पळायच नाही, तर आपण तीथेच उभं रहायचं किंवा जागेवर बसुन जायचं म्हणजे कुत्रा आपल्याला काहीच करत नाही. कुत्रे फक्त भुंकायचे काम करतात. ते कधीच चावत नाहीत उलट तेच आपल्याला घाबरतात". हा त्यांचा मला नेहमीचाच कानमंत्र असायचा. त्यांनी सांगीतलेलं खरं आहे का हे पाहण्यासाठी एकदा- दोनदा कुत्र माझ्यावर भुंकल तरी मी पळालो नाही, आणि खरचं त्या कुत्र्यानी मला काहीच केल नाही. तो नुसता जागेवरच भुंकून निघुन गेला. असं अनेक वेळा झालं. मला पम जरा हिम्मत आल्यासारखं झाल होतं. मग मी सुध्दा कुत्र कितीही भुंकल तरी ही मी घाबरत नव्हतो, पळत नव्हतो. कुत्रे असतील त्या रस्त्यानेसुध्दा न घाबरता जाउ लागलो. माझ्या मित्रांच्या कानमंत्रानी माझी कुत्र्यावरची भितीच नाहीशी करुन टाकली होती. पण माझ्याघरचे, जास्त करुन माझी आई मला नेहमी कुत्र्याच्या बाबतीत सावध करायची. पण मला आलेल्या अनुभवावरुन मी तिच्या बोलण्याकडे जास्त काही लक्ष लेत नव्हतो.
पुढे काही दिवसांनी आमच्या शेजा-यांनी एक कुत्रा पाळला. पण ते त्याला नेहमी बांधुन ठेवत. तो कुत्रा जेव्हा पण सुटायचा तर तो कोणाला तरी चावूनच परत यायचा. दररोज कोणाच ना कोणाचं, कोणत ना कोणतं भांडण त्यांच्या घरी येत होतं. त्या घरच्या लोकांना जणु त्या भांडण झेलायची सवयच झाली असावी. आम्ही सर्व लहान मुलं कॉलनीत एकत्र खेळायचो, पण जेव्हा त्या शेजा-यांच कुत्र सुटलं असं कानावर पडताच आम्ही दिसेल त्या घरात पळून जायायचो. सगळी कॉलनी करफ्यु लागलेया प्रमाणे व्हायची. त्या वेळेस मुलचं काय तर मोठी माणसं सुध्दा घराच्या बाहेर पडायला घाबरत होती. त्या कुत्र्याचा एखाद्या डाकूप्रमाणे प्रमाणे आमच्या कॉलनीत दरारा होता. जसं रामगढ मध्ये गब्बरसिंग आल्यावर सर्व गावातील लोकं घरी पळतात, तसा अनुभव आम्हाला तो कुत्रा सुटल्यावर यायचा. एक दिवस आमच्या कॉलनीतल्या एका मुलीला तो कुत्रा चावला. त्या कुत्र्याच्या घरमालकांनी त्या मुलीचा सर्व दवाखान्याचा खर्च उचलला. कॉलनीतील सर्व लोकं त्या कुत्र्याच्या मालकाला सारखं बजावत होते की, '' या कुत्र्याला तुम्ही महानगर पालिकेत तरी द्या! '' नाही तर दुर कुठे तरी जंगलात सोडून द्या. पण त्या घरच्या लोकांच त्या कुत्र्यावर ऐवढ प्रेम होतं की, ते काही केल्या त्या कुत्र्याला सोडायला तयार नव्हते. पण एकेदिवशी तो कुत्रा त्यांच्या घरातल्या कोणालातरी चावला. या गोष्टीचा त्या लोकांना चांगलाच धक्का बसला. त्या मुळे त्या दिवशी त्या कुत्र्याला कुठे तरी नेउन ठेवलं काय माहीत? पण त्या दिवसापासुन तो कुत्रा आम्हाला कधीच दिसला नाही. पण जे झालं ते चांगलच झालं म्हणाव, नाही तरी आमच्या कॉलनीत कधी '' जय-विरु'' आले नसते. म्हणून जे झालं ते चांगलच झालं. तो कुत्रा नाहीसा झाल्याची बातमी ज्या दिवशी कॉलनीत कळाली तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. आम्ही मुलं तर मजेत कॉलनीत फिरायला लागलो. जसं १५ ऑगस्ट १९४७ ला जसा प्रत्येक भारतीय इंग्रजांच्या सत्तेतुन बाहेर पडल्यावर खुष झालतना तेवढी खुशी, तेवढा आनंद आम्हा कॉलनीच्या सर्व लोकांच्या तोंडावर दिसत होता. काही दिवस गेल्यानंतर माझ्या कानावर एक बातमी आली की, तो कुत्रा मेला अथवा त्यावा कोणीतरी मारुन टाकलं. असो पण त्या वेळीपण मला जे झालं ते उत्तमच झालं असं वाटलं.
काही वर्षांनी माझी शाळा संपली. १० वी च्या सुट्ट्या लागल्या आणि उन्हाळ्याच्या सुट्यात काय करायचं असा प्रश्न माझ्या समोर उभा राहीला. माझ्या लक्ष्यात आल की, माझा एक मित्र ८ वी पासुन पेपर वाटत होता. त्याच्या जवळ नेहमी पैसे असायचे. मग मला पण पेपर वाटावसं वाटायला लागल. कारण त्यात भरपुर पैसा होता, शिवाय एका तासाच काम. नंतर संपुर्ण दिवस मोकळ. पण या कामात एक मोठ्ठी अडचण होती. ती म्हणजे सकाळी उठण्याची. मी मुलाखाचा आळशी माणुस. रात्री १२ पर्यंत टी.व्ही. पहायची आणि सकाळी १० ला उठायचं अशी माझी सवय. तरी माझे वडिल मला सकाळी ६.३० वाजता मारुन-मारुन उठवायचे म्हणुन बरं. नाही तर माझी ७ वी ते १० वी ची सकाळची शाळा कधीच पुर्ण झाली नसती. शाळा सुरु असताना मी रविवारची वाट चातकपक्षी ज्या प्रमाणे पावसाची वाट पाहतो त्या प्रमाणे पहायचो. कारण रविवार म्हणजे सुट्टी आणि शाळेला सुट्टी म्हणजे मनसोक्त झोपायचं असा माझा कार्यक्रम ठरलेला असायचा. आणि आता तर काय सुट्टयाच सुट्टया. त्यात हे असल काम करायचं म्हणजे सकाळीच काय तर आता पहाटे ४ वाजताच उठायचं. पण तरीही मनाशी पक्क ठरवून मी सकाळी ४ वाजता स्वतः उठून पेपर वाटायला जात होतो. मी माझ्या कामावर खुष होतो, कारण बराच पैसा (माझ्यादृष्टीने) मला मिळत होता. महीना ३०० रु. पगार आणि त्यात एखादा पेपर एखाद्या घरात न टाकता तो रस्त्यावर विकला की त्या पेपरचे २.५० रु. मिळत, आणि असे रोज चार- पाच पेपर तर आम्ही (मी अणि माझा मित्र) मालकाला न विचारता जास्त घेउन ते रस्त्यावर विकून देत. त्याचे रोज १० ते १२ रूपये मला मिळत, शिवाय एखाद्याच्या घराला कुलूप असल तर तो पेपर आपल्या घरी घेउन जाता येत होतं. अश्या प्रकारे माझं काम चांगलच सुरू होतं. सुट्टयातही चांगल्या प्रकारे चालल्या होत्या आणि माझ्या उठण्याने घरचे पण खुष होते. तरी ही आईला भिती होती ती म्हणजे कुत्र्यांची. मला आई नेहमी म्हणत रस्त्याने बघुन जात जा, एक तर तुला चष्मा लागलेला. सायकल नीट चालव. कुत्री असतात रस्त्यात. एखाद कुत्र चावल तर तुझा पुर्ण पगार त्यातच घालावा लागेल. असं नेहमीच मला बजावत. पण आईच्या बोलण्याचं मी काही जास्त मनावर घेत नव्हतो. कारण माझ्या मित्रांनी दिलेला कानमंत्र होताच की माझ्या लक्षात –"कुत्र कधी अंगावर आलं किंवा पाठीमागे लागलं तर पळायच नाही, तर आपण तीथेच उभं रहायचं किंवा जागेवर बसुन जायचं म्हणजे कुत्रा आपल्याला काहीच करत नाही. कुत्रे फक्त भुंकायचे काम करतात. ते कधीच चावत नाहीत उलट तेच आपल्याला घाबरतात". हे सर्व लक्ष्यात ठेऊन मी माझं काम जोरात चालु ठेवल.
आता हळुहळु मी पेपरच एकेक घर विकत घेऊन (म्हणजे तीथे मी स्वतः पेपर टाकेलचं पण त्याचं बील सुध्दा मीच घेईल). माझी स्वतःची एजन्सी तयार केली. मी स्वतः मालक झलो. जास्त नाही तरी वीस-बावीस घरं आता माझ्या मालकीची होती. आता माझे उत्पन्न हे वाढून ६०० रू. म्हणजे दुप्पट झालं होतं. हे सर्व सुरळीत होतं तेच एक दिवस मी पेपर वाटत होतो. साधारण सकाळी ६.३० ची वेळ असेल. त्या दिवसात मला रोज पेपर वाटायला उशीर व्हायचा कारण तो हिवाळ्याचा महीना होता. इतक्या थंडीत सकाळी उटायचं म्हणल तर जिवावर येत होत. शिवाय उजेड पण ६.३० च्या सुमारास पडायचा. म्हणून नेमके किती वाजले ते समजत नव्हतं. माझं पेपर वाटण साडेसात-आठ वाजापर्यंत चालुच असायचं. लोकं माझ्यावर चिडत होती. कारण त्यांची नौकरी ६.३० वाजता असायची, त्यांच म्हणनं अस होतं की, सहा-सव्वा सहापर्यंत पेपर यायला हवा, कसं जरा पेपर वाचुन जाता येईल कामावर. पण आता पेपर वाटायला उशीर होतं असल्यामुळे काही लोकांनी मला पेपर बंद करायची धमकी दिली आणि त्यात माझी स्वतःची एजन्सी असल्याने नुकसान माझच होणार होतं. म्हणुन मी लवकर उठण्याचा प्रयत्नात होतो.
त्या दिवशी मला नेहमी प्रमाणे पेपर वाटायला जायायला उशीर झाला. गडबडीत मी एकेक पेपर वाटू लागलो. एका कॉलनीत गच्चीवर मला पेपर टाकायचा होता. आणि त्यांच्या खालच्या घरच्या कंपाउंडमध्ये एक कुत्र नेहमी असायचं. मी दररोज लांबुनच पेपरची घडी करुन वरती पेपर फेकुन देत होतो, आणि ते कुत्र मला नेहमी भुंकायच. दरवेळेस ते कुत्र तीथे आहे की नाही हे पाहुनच मी तीथे जात होतो. पण आज जरा जास्त उशीर झाल्याने मी गडबडीत त्या कुत्र्याकडे लक्ष्यच दिले नाही व त्या गच्चीवर पेपर फेकुन निघुन आलो. थोड्या वेळाने ते कुत्र भुंकत-भुंकत पळत माझ्याजवळ येत होतं असं मला दिसलं. मी घाबरलो, घामाघुम झालो. मग मला माझ्या मित्रांनी दिलेला कानमंत्र आठवला, मी हिम्मत करुन जागीच उभा राहीलो. वाटलं.. ते कुत्र भुंकुन निघुन जाईल, पण ते कुत्र माझ्याजवळ पळत-पळत, येतचं होतं मी पळलो तर ते मला चावेल अशी भिती पण माझ्या मनात होतीच, म्हणुन मी त्या कुत्र्याला हाड-हाड करत, घाबरत-घाबरत तिथेच उभा राहिलो. पण ते कुत्र न थांबता माझ्या पायाला चावा घेणार..तेच मी त्याचे तोंड धरले व बाजुला केले तरीही त्याचे दात माझ्या हाताला लागले. मी थोडा प्रतिकार केल्यानंतर कुत्र तिथुन निघुन गेलं. माझ्या हातातुन रक्त येत होतं. मी घाबरलो होतो. माझा शर्ट पुर्ण घामाने ओला झाला होता. माझा हात पण फार दुखायला लागला. कसे तरी करुन मी सगळे पेपर वाटून घरी आलो व माझ्या आई समोर जाऊन हात लपवत शांतपणे बसलो. पण मी विसरलो होतो ती माझी होती. माझ्या आईला माझ्यासोबत जे काही घडलं ते सर्व न सांगता समजतं. कुणास ठाऊक कसं काय? तरी आईने विचारलं ‘काय झालं!’ मी म्हणालो ‘काही नाही’, आई तरी म्हणाली ‘काही कुत्र-बीत्र चावलं का?’ मग मात्र मी हो म्हणलो. माझ्या आईचा जीव बेचैन झाला. धावपळ सुरु झाली. शेजार-पाजा-यांना मोठ्या मंडळींना यावर उपाय विचारा, त्याच्यावर काही औषध लावा असे अनेक प्रकार सुरु झाले. मला दवाखान्यात नेलं. दवाखान्यात इतकी मोठी रांग होती की, काय सांगु ? ही रांग कशाची असेल याच विचारात मी असताना मला कळाले की, या सर्व लोकांना पण कुत्र्यांनी चावले आहे. मला जरा सम दु:खी लोकांना पाहून दिलासा वाटला, म्हटलं ‘मी एकटाच पळालो नाही असं नाही, तर भरपूर लोकं माझ्यासारखे कुत्र्याला पाहून पळाले नाहीत’ असे म्हणुन मी माझ्या मनाला दिलासा देत होतो. मी मनातल्या मनात हसू येत होते की, ‘माझ्या सारखेच मित्र इतरांना पण आहेत कानमंत्र देणारे’....
-राहुल अरुणकिशन रणसुभे
शास्त्रीनगर, सिडको औरंगाबाद.
abhipray23@gmail.com
rahulkransubhe@gmail.com
वाचने
8039
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
राहुल
In reply to राहुल by रामदास
+१
कुत्रा चावणे...
अबब ... आमचा
In reply to अबब ... आमचा by टारझन
कुठेतरी
In reply to कुठेतरी by भडकमकर मास्तर
काही तरी गफला असेल हो ...
In reply to काही तरी गफला असेल हो ... by टारझन
दुसरा पाय
In reply to काही तरी गफला असेल हो ... by टारझन
हा हा हा हा
In reply to काही तरी गफला असेल हो ... by टारझन
>>गांधी
ह्म्म्म्...
कथा आवडली
चांगलं
सही रे कथा!!
:)
गोष्ट आवडली
In reply to गोष्ट आवडली by प्रकाश घाटपांडे
गोष्ट आवडली
मस्त लिहले
In reply to मस्त लिहले by मदनबाण
तो कुत्रे
हो कुत्रा भुंकताना अंगावर धावत आला
अनुभव
अरे वा !
कुत्र आणि कानमंत्र
सावधान! कुत्रा मोकळा आहे!
अनुभव