(विनंती- सध्या कॉलेजची परिक्षा सुरु असलेने लेख जरा गडबडीत लिहिला आहे,समजुन घ्यावे ही विनंती.)
उद्या गुरुपौर्णिमा.गुरुला वंदन करायचा दिवस.
उद्या अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम होतील, वंदन वगैरे केले जाईल्, आणि गुरुंचे गुणगान गाईले जाईल ,जे अतिशय योग्य असेल.
पण यावेळेस मी मात्र माझी गुरुपौर्णिमा वेगळ्या पद्धतीने साजरी करणार आहे. मागच्या वेळी मी गुरुपौर्णिमेला शिक्षकांवर एक लेख लिहिला होता.(अर्थात तो सकाळ मध्ये शिक्षक दिनाच्या वेळी प्रसिद्ध झाला हा भाग अलहिदा)पण यावेळी मी माझे जीवन बदलणार्या एका सरांबद्दल लिहिणार आहे.