Skip to main content

विडंबन हव आहे

लेखक राधा१ यांनी मंगळवार, 28/07/2009 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी प्रथमच मि.पा. वर स्वतंत्र लिहीत आहे, अपेक्षा आहे की तुम्हाला आवडेल. गेले काही दिवसापासुन मी नियमित मि.पा. वाचत आहे त्यातला विडंबन हा प्रकार मला खुप आवडला खाली जी कविता आहे ती माझी आहे.मला ह्या वरती विडंबन करुन हव आहे. माझ्या माहिती प्रमाणे केशवसुमार आणि चतुरंग ह्यांची नावे मी विडंबनासाठी प्रसिद्ध आहेत अस लक्षात आले आहे. क्रुपया अवांतर तद्यासाठी.......हवा असल्यास स्वतंत्र धागा काढुया.... (ह.घे.) कोसळणारा तो धुंद पाऊस, नेहमीच म्हणतोस तु नको जाऊस.. ओली चिंब झाली झाडे मन ही ओले चिंब झाले तुझ ते हळुवार हसण माझ्याकडे टक लावुन बघण आणि हळुच इशारा करण आणि माझ मन चिंब चिंब होण झालय नेहमीचच गाह्राण नेहमीच अस टक लावुन बघतोस आणि मला झुरवतोस तुझ बघण आणि माझा झुरण झालय आता नेहमीचच मला कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला?
लेखनविषय:

वाचने 3115
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

घ्या, आता बोला ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...

वा! कवि लोकांना प्रियकर्/प्रेयसी, देव, निसर्ग अन काय काय प्रेरणा देउन जातात इथे तर विंडबनानेच यांना प्रेरणा दिली! वा वा! :)

बरळणारा तो मित्र खडूस नेहेमीच म्हणतो तू (ओरिजीनल) नको लिहूस बाष्कळ बडबडी तु वेडे संपादक तरीही मित्र बोले तुझं ते टोचून बोलणं मला वारंवार सल्ले देणं आणि हळूच पिन मारणं आणि मी विडंबन लिहीणं झालय नेहमीचच गाह्राण नेहमीच अशा पिना मारतोस आणि मला चढवतोस तुझं चढवणं आणि माझं लिहीणं झालय आता नेहमीचच मला कधी कळणार रे माझा बालिशपणा तुला? (बिका, ह.च घे रे; नायतर लावशील कात्री!) अदिती

In reply to by बिपिन कार्यकर्ते

संपादक तरीही मित्र बोले तुझं ते टोचून बोलणं मला वारंवार सल्ले देणं आणि हळूच पिन मारणं एखादा संपादक असं करतो ना तेव्हाच त्याच्या हातून कात्री निसटलेली असते. इतरांच्या स्वानुभवाचे बोल आहेत हे.

In reply to by श्रावण मोडक

हेच म्हणते मी....!!! अनुभव...केव्हाही मोठच ठरतो..!!!

घोळणारा साखरेत तो मधूर ऊस, नेहमीच म्हणतोस तू नको खाऊस झाली थोडीशी खिळखिळीत हाडे म्हणून असे मला काय झाले तुझं ते मट्कन बसणं माझ्याकडे भीतीने बघणं डॉक्टरला फोन करणं आणि माझं घामाने चिंब चिंब होणं झालंय नेहमीचंच गाह्राणं नेहमीच असं घाबरतोस आणि मला टरकवतोस तुझ घाबरणं आणि माझं वजन वाढणं झालंय आता नेहमीचच मला कधी कळणार रे माझ्या मनातील भावना तुला?

In reply to by बहुगुणी

=)) =)) =)) =)) बहुगुणी आहात.. सुहास

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

बहुगुणी राव सॉल्लीडच विडंबन :-) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)

आहाहा !@! काय सुरेख कविता आहे !! अशा परफेक्ट आणि अफलातुन कवितेचं चपखल (आणि हिणकसंही) विडंबण करणे फारंच अशक्य आहे ... तुम्ही असं स्वतःहुन विडंबणाला आमंत्रण देणं काळजाला भिडून गेलं !! हृदय हेलावून गेलं ,,,, कवितांचे विडंबणकार सक्रिय आहेत म्हणून ते विडंबण पाडतील .. ते ही "वा!! छाण !!! " असेलंच .. इथे आलेली २ विडंबणही "वा !! छाण !! " आहेत .. सगळ्यांचच कौतुक वाटत!! आम्हाला तर बाबा .. विडंबणं येतंच नाहीत ... :( - टारझन

हबिणंदण वगैरे ठीक आहे हो....ह्रुदय वगैरे भी हेलकावु शकत...गेला बाजार डोक सुदिक...पन श्रावण असल्यामुळे हे चान्सेस कमी हायती...!!! आम्हाला तर बाबा .. विडंबणं येतंच नाहीत ... तुम्हाला जे जमत...ते त करा की राव....ते बॅचलर का मॅरीड...साबुदान्याची थालीपीट..तर लावु शकता न व...ते करा...!!!म्हनजी झाल.....म्हजी ज्यानी येवढी जी विडंबण लिहीली आहेत...ते पन खुश...कि टारु भाईंना....पण..येतय....!!!