अपचन
नेहमीप्रमाणे चौपाटीवरची मजा पाहुन मी परत चाललो होतो. एका कोप-यात एक माणुस तळमळत बसलेला दिसला. सारखा पोटाला हात लावुन तोंडाने खुर्क खुर्क आवाज काढत होता. जवळ जावुन पाहिले तर आपला नाना!
'नाना? काय रे काय झाले ?'
'काही नाही यार ! त्या समोरच्या भेळवाल्याकडची भेळ खावुन पोटात दुखत आहे... सारखे करपट ढेकर येत आहेत.... साला काय बकवास भेळ बनवतो.. अग आईग...खुर्क'
'छ्या ! नाना ! काहीतरीच काय बोलतोस? बघ किती गर्दी आहे त्याच्या दुकानात... कुणाचेही काही पोट दुखत नाही अन तुझेच कसे काय दुखते?'
'अरे खोटारडे आहेत ते... त्या भेळवाल्याला बरे वाटावे म्हणुन तसे म्हणतात.'
'बर मग त्या दुस-या भेळवाल्याकडे जायचे... शेजारच्या! '
'छे ! फार गोड बनवतो तो भेळ, मला मधुमेह आहे.'
'बर मग तो पलिकडे बसलेलाऽऽ '
'छे ! फार तिखट असते त्याची भेळ, मला मुळव्याध पण आहे.'
'मग नुसतीच पाणीपुरी खायची... '
'नाही ना ! तोंड आले आहे.. तिखट पाणी घेववत नाहि..'
'मग तो त्याच्या शेजारचा.. त्याचा रगडा पॅ॑टीस एकदम बेस्ट '
'नको ! बटाटा खावुन सारखे पादायला होते... लाज वाटते'
'नाना, हे नको ते नको.. सारखे तोंड वेंगाडत असतोस... ह्याची भेळ खराब, त्याची पाणी पुरी खराब.. कधी तरी कुठल्यातरी गोष्टीला चांगले म्हण... '
'अरे कुणी नाहीच बनवत तसे तर मी तरी काय करु?'
'अजिबात नाही. तुलाच कावीळ झाल्यावर जग पिवळे दिसते तसे सगळे जग खराब दिसते आहे. अरे सगळ्यांचीच भेळ काही भारी बनत नसते. पण खराबही नसते. कुणाची बनते कूणाची नाही. आपण जे चांगले आहे त्याचा आस्वाद घ्यावा. भेळ आवडली तर मनापासुन कौतुक करुन सांगावे. भेळ बनवणा-याला पण बरे वाटते. तो पुढच्यावेळी अजुन छान भेळ बनवुन आपल्याला खिलवतो.. अरे तु एवढा मोठा ! तुला या गोष्टी मी सांगायच्या का?'
'अरे पण मला कौतुक करायची लाज वाटते... ! '
'छ्या ! त्यात काय लाजायचे. आणि जर भेळ नीट जमली नसेल तर जे काही कमी आहे ते गोड शब्दात सांगायचे. आता परवाच बघ त्या भेळवाल्याची भेळ तिखट होती मी त्याला म्हटले वा ! फार छान जमली आहे भेळ, फक्त थोडे तिखट कमी असते तर बरे झाले असते कारण माझे तोंड आले आहे. अरे काय सांगु? त्याने लगेच मस्तपैकी चिंचेचे आंबटगोड पाणी दिले, वर नंतर एक कोरडी पुरी शेव घालुन दिली. अहाहा ! मजा आली. असे करायचे सोडुन तु भेळेची प्लेट फेकुन देतोस.. असे करुन नाही चालणार.'
'हम्म... '
'याचमुळे तुझे पोट दुखते, डोके दुखते. सारखा एकटा एकटा असतोस, अरे भेळ हा सगळे मिळुन खाण्याचा प्रकार आहे. मजा करत करत भेळेची लज्जत चाखायची. चल उठ ! आपली मंडळी आहेत तिकडे चल. आत्ता तुझी पोटदुखी पळुन जाईल आणि हा अपचनाचा त्रास बरा होईल.'
बघुया आता नानात सुधारणा होते की माझेच पोट नानासारखे दुखु लागते ! खुर्क !!
वर्गीकरण
(विषय दिलेला नाही)
In reply to (विषय दिलेला नाही) by यशोधरा
अनंताशी
वा!!
In reply to वा!! by अनंता
अनंताशी
परा
हॅहॅ हॅ
इनो
जळजळ
In reply to जळजळ by नितिन थत्ते
ओवा खावा
क्रॅक
In reply to क्रॅक by विनायक प्रभू
हाहाहाहा
In reply to क्रॅक by विनायक प्रभू
सर,
In reply to सर, by नितिन थत्ते
दुखणे
लेखन खास
In reply to लेखन खास by विसोबा खेचर
लेखन खास
खर्क
In reply to खर्क by अवलिया
अरे
In reply to अरे by विसोबा खेचर
काय ?
हा लेख
बहुतेक परा नाना ला
भेळ,
सुधारणा नक्की कुणात झाली रे?
विजुभाऊ आवरा.. वेळ जात