मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साहित्यिक

पु. ल. (भाई) ना आदरा॑जली

मिश्रेया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काल च 'तुझिया जातीचा मिळो आम्हा कोणी' हे परचुरे प्रकाशन चे पु.ल्.देशपा॑डे॑ च्या स्मरणार्थ प्रकाशित अप्रतिम पुस्तक वाचले. ह्यात पु. ल॑. विषयी कधी काळी लिहिलेल्या लेखाचे आणि भाषणाचे स॑कलन केलेले आहे. अरुण टिकेकर ह्याच्या प्रस्तावने नी सुरुवात आहे. त्या॑च्या प्रस्तावनेत शेवटी लिहीलेले 'महनीया॑नी महनीया॑ बद्द्ल व्यक्त केलेले भावना /विचार अगदी ख॑र आहे. अत्रे, कुसुमाग्रज , श्री.पु. भागवत, जयवन्त दळवी, कानेटकर, राम गबाले , भक्ति बर्वे, मोहन वाघ, म॑गेश पाडगावकर शान्ताबाई शेळके ,बाळ ठाकरे ई.ई दिग्गजा॑चे लेख ह्यात आहेत. पु.ल. हे एक भन्नाट व्यक्तिमत्त्व.

आजोबांच पेन

मराठमोळा ·
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी, कधी कधी उन्हाळ्यात एक थंड हवेची झुळुक येते, ऊर भरून आपण श्वास घेतो, थंडावा अंगभर पसरतो. श्वास न सोडावासा वाटतो. पण निसर्गाचा नियम.. श्वास सोडावाच लागतो. असंच काहीसं सुख आणी दु:ख. ते यावं आणि जावं हेच कदाचित आयुष्य. :) कॉलेज मधे होतो तेव्हा "मेस"वर जेवायचो. मेसवर एक आजोबा यायचे. खळखळून हसायचे. आम्हाला सामील व्हायचे. वय ८५ आहे असे ते म्हणायचे. दुपारी आणि रात्री भेटायचे. आम्हाला बघून खुप खुश व्हायचे. हसायचे, आमच्याबरोबर विनोद करायचे आणि स्वतःचे तरुणपण आठवून पुन्हा खुश व्हायचे. आजोबा एकदा जेवणानंतर गप्पा मारताना म्हणाले की त्यांच्या वयाचे त्यांच्याबरोबर कुणीच नाही.

महाराष्ट्र धर्म :- महोत्सव मराठी साहित्याचा

परिकथेतील राजकुमार ·
लेखनप्रकार
नमस्कार, सर्व मिपाकरांना सस्नेह निमंत्रण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या 'ही राजभाषा आहे' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते होत आहे. पानिपतकार विश्वास पाटीलही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

जालरंग प्रकाशनातर्फे आवाहन

पैसा ·
लेखनप्रकार
(जालरंग प्रकाशनातर्फे हिवाळी अंकासाठी साहित्य पाठविण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.) दिवाळी अंकानंतर आता आपल्याला वेध लागलेत हिवाळी अंकाचे. आपल्या जालरंग प्रकाशनाच्या हिवाळी अंकाचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या अंकासाठी आपले उत्तमोतम साहित्य पाठवावे असे आम्ही आपणास आवाहन करत आहोत... साहित्य कोणते असावे? साहित्याला विषयाचे/प्रकाराचे कोणतेही बंधन नाही ... राजकीय/अराजकीय/सामाजिक/सांगितिक/ललित/विनोदी/प्रवासवर्णन/चरित्र/पुस्तक-परीक्षण/चित्रपट-नाटक परीक्षण/कथा/कविता/गजल/कविता-गजल रसग्रहण/विडंबन/इत्यादि कोणत्याही विषयावरील लेखन चालेल..

क्रांतीतै चे अभिनंदन

परिकथेतील राजकुमार ·
आपल्या मिपावरील सदस्या क्रांतीतै हिला विदर्भ साहित्य संघातर्फे देण्यात येणाऱ्या वार्षिक साहित्य पुरस्कारांत नवोदित लेखनासाठीचा पुरस्कार 'असेही-तसेही' या गझलसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. पुरस्कार दि. १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापनदिनी वर्धा इथे प्रदान करण्यात येणार आहे. रोख रु. ५०००/- आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

मी मराठी.नेट लेखन स्पर्धा २०१२

दशानन ·
नमस्कार, मी मराठी.नेटवर नेहमी नवनवीन योजना राबवल्या जातात, त्यातील एक लेखन स्पर्धा. मागील वर्षी घेतलेल्या लेखन स्पर्धेला व कविता स्पर्धेला सर्वांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी मराठी सर्वांचा ऋणी आहेच. या वर्षी देखील आपण एक लेखन स्पर्धा घेत आहोत लेखन स्पर्धा २०१२ यासंबंधीचा तपशील इथे देण्यात आलेला आहे. सर्व मराठी जाणकारांनी यात आवर्जून भाग घ्यावा आणि लेखन स्पर्धेत भाग घेऊन भाषा समृद्धीच्या प्रयत्नात आपला वाटा उचलावा ही विनंती. स्पर्धा १० डिसेंबर २०११ सकाळी १० वा.

मला आवडलेली काही वाक्ये.

जयंत कुलकर्णी ·
लेखनविषय:
माझ्या मर्कटलीलामृत या धाग्यावर श्री. जगमोहन प्यारे यांनी मी ते पुस्तक लिहायला सुरवात केली त्या तारखेची आठवण करून दिली.... दोन वर्षे झाली मी वेळ मिळेल तसे लिहितोय लिहितोय..... नंतर हार्ड डिस्क चाळता चाळता अजून एक जूने पान सापडले...तारीख १८-८-२००८.... त्या पानावर मी मला आवडलेल्या काही वाक्यांचा अनूवाद करून ठेवला होता.