'मिपा' च्या वाचकांना 'प्रेमाची गोष्ट' वर लिहिलेले आवडले, म्हणून अजुन एक प्रायोगिक नाटक पाहिले होते, त्यावरचे लिखाण पाठवत आहे.
आमची प्रायोगिक नाटकांची आवड तशी खूप जुनी. अगदी छबिलदास चळवळीपासून. त्यामुळे ,प्रायोगिक नाटक लागले की पाय तिथे आपोआप वळणारच! कधी फजितीही होते, सगळं डोक्यावरुन जातं. मग डोक्याला ताप. ह्याला विचार, त्याला विचार, असं चालतं, आपण इतके निर्बुद्ध कसे असे वाटून स्वतःचाच राग येतो. तरी पुढली वारी काही चुकत नाही. दहा नाटके डोक्यावरुन गेली तरी चालेल, पण एखादंच असं आनंद देऊन जातं की बस! 'अमृता सुभाष' , ही एक अत्यंत हुशार अभिनेत्री!