Skip to main content

मुक्तक

(काय करून आलो)

लेखक नाखु यांनी शनिवार, 29/06/2019 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
वाचायला(च) गेलो, लिहून काय आलो? आमंत्रण नव्हते तरी ज्ञान पाजळून आलो .. ना अर्थ आशयाचा बोली.. लावून आलो . कावलेल्या समयी भडास काढून आलो .. होते कोण न कोण बघतोच मी कशाला ? बिना वातीचेच (मुद्दाम) कंदील लावून आलो ? धागे जरी भिकार डोके फिरवून आलो.. जाऊ मुळी न देता संधी साधून आलो . (जालिय विचारवंत आणि सल्लागारांना समर्पित)

कार्पोरेटायनम:

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 28/06/2019 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं कसं असतंय.. कंपनीत कोणाच्यातरी एका छोट्या चुकीने एखादा छोटामोठा प्रॉब्लेम उद्भवतो. आणि हल्ली फारच अनकॉमन झालेला कॉमन सेन्स वापरला तर तो प्रॉब्लेम लगेच सोडवला जाऊ शकतो. पण पण पण.... जो हायलाईटच झाला नाही तो प्रॉब्लेम कसला ! या कार्पोरेट नियमाप्रमाणे तो प्रॉब्लेम चुगलकी पद्धतीने तुघलकी मॅनेजमेंटसमोर मांडल्या जातो. मग गुन्हेगारांची रीतसर पेशी होते. आणि समस्येचे मूळ शोधण्यासाठी 'जाऊ तिथे माती खाऊ' अश्या हायली एक्सपीरिअन्सड लोकांची समिती नेमण्यात येते. पुढचे काही दिवस समिती गुन्हेगारांची उलट तपासणी घेते. ही उलटतपासणी होत असताना बाकीचे कलीग,"घेन्न बाबू आता" ह्या नजरेने बघत असतात.

काॅफी पिऊन आले...

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 28/06/2019 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
ऐकावयास गेले, बोलून काय आले? बोलावलेस तू, मी काॅफी पिऊन आले.. ना थेंब पावसाचा ओली.. भिजून आले. भांबावल्या दुपारी काॅफी पिऊन आले.. होते कुणी न कोणी नव्हतोच एकटे ना? लोकां कसे पटावे काॅफी पिऊन आले? पेले जरी रिकामे डोळे भरून आले.. वाहू मुळी न देता काॅफी पिऊन आले.
काव्यरस

माझे आजी आजोबा

लेखक chittmanthan.OOO यांनी गुरुवार, 20/06/2019 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आजी आजोबा घरी असायला आणि त्यांच्याकडून लाड करून घ्यायला नशीब लागत असे म्हणतात. आजकाल जनरेशन गॅप मुले प्रत्येक मुलाला आज्जी आजोबांचे प्रेम मिळतेच असे नाही. पण मी नशीबवान आहे कारण मला माझ्या आजी आजोबांची संगत मिळाली. मला आज्जी चे प्रेम ज्यास्त मिळाले आणि अजूनही मिळतेच आहे. आजोबांचा सहवास थोडा कमी मिळाला कारण मी सातवीत असताना ते गेले.त्यांना मी लाडाने आबाजी म्हणायचो. ते दहा वर्षे पार्किन्सन्स ने आजारी होते. शेवटचे दिवस तर इतके हाल झाले की काय बोलायला नको. मी आजी आजोबांच्या खोलीत झोपत असल्याने होणारे हाल बघितले होते. माझ्या आजीने त्यांची खूप सेवा केली .

दे दे दे दे दे दे

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 18/06/2019 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे किती वेळ झाला सारखा हातात घेते तु जशी मालकीण मी पण मालक आहे माझ्याच घरात मला चोरी झाली मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे दे दे दे दे दे दे दे सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते (चाल सोडून:- भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा) महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे दे दे दे दे दे दे दे अगं दे दे दे दे दे दे जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे जास्त वेळ नाही पण थोड

शोधत होतो पुन्हा स्वत:ला

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 17/06/2019 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
शोधत होतो पुन्हा स्वत:ला उपसत होतो पुन्हा पुन्हा मी पुरातनाची प्रचंड पडझड परंपरांची अपार अडगळ शोधत होतो अथक स्वत:ला ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी वर्तमान हतबल करणाऱ्या भवितव्याचे भीषण पडघम ऐकत होतो अधीरपणाने माझीच अनोळखीशी चाहूल कळून चुकला पुन्हा, स्वतःचा शोध विफल ठरण्याचा संभव
काव्यरस

मी तुझा विचार करते

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/06/2019 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......

घडलंय असं आज...

लेखक किसन शिंदे यांनी शनिवार, 08/06/2019 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
आॅफिसला जाण्याची सकाळची गडबड. लवकर कसं पोहचू? ट्रेन उशीर तर करणार नाहीत ना? आजचं काम व्यवस्थित होईल का? असे सगळे प्रश्न डोक्यात ठेवून आपण धावत सुटतो, अगदी आजूबाजूचं जग विसरून. इतकं की आपल्या सभोवती घटणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींकडेही आपलं लक्ष जात नाही इतके आपण यांत्रिकपणे पळत सुटलोय. पण आज समोर घटणाऱ्या दोन घटनांनी या यांत्रिक आयुष्यातून किंचितही का होईना मला बाहेर पडण्यास मदत झाली. सकाळी स्टेशनला आत शिरताना बाहेर ठाणं मांडून बसलेल्या विक्रेत्यांचा अडसर हा रोजचाच.

आई - ३

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 04/06/2019 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
एक मनस्वी वादक होता. आत्मानंदी! कलेचा उपासक. रोज सकाळी उठून वाद्य खांद्यावर घेऊन गावाबाहेर दूरच्या डोंगरावरच्या एका कड्याच्या काठी बसायचा, आणि कलासाधनेत मग्न व्हायचा. डोंगरातला वाराही त्या तालावर फेर धरायचा, पक्षी सम साधत गाऊ लागायचे, सारे भवताल सचेतन होऊन जायचे. या वादकाला त्याचा पत्ताही नसायचा. त्याची जादूई बोटं त्या वाद्यावर थिरकत स्वर्गीय नादनिर्मितीत मग्न असायची... अशा समाधीस्थितीत बराच वेळ जायचा. सूर्य डोंगराआड कलू लागला की पक्षी भानावर यायचे आणि नाखुशीनेच घरट्याची वाट धरायचे. वाराही मलूल होऊन शांत डुलकी घ्यायचा, आणि कधीतरी हा वादक भानावर यायचा... वाद्य नीट गुंडाळून उठून वाट धरायचा. ...

मनात आले म्हणून

लेखक सर टोबी यांनी मंगळवार, 04/06/2019 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज काही प्रवासाशी संबंधित वाचण्यात आले आणि वाटले कि आपणही काही आठवणी लिहाव्यात. प्रवास म्हटलं कि बऱ्याच वेळेला मुंबईतील लोकांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. जवळपास दररोजच नोकरीनिमित्त आणि सुटी असली तरी खरेदी, नातेवाईकांना भेटणे या निमित्ताने प्रवास करण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय नसतो. तसे धुळे, जळगाव येथील लोकांनाही बराच प्रवास करावा लागत असावा. पण त्यांच्या प्रवासाचा इतरांनाही त्रास होतो हे कधीकाळी रेल्वेने ज्यांनी त्या मार्गावर प्रवास केला असेल त्यांना चांगलेच ठाऊक असेल. मी पहिल्यांदा मुंबई आलो ती आठवण सुरुवातीला तरी सुखावह नव्हती.