मनात आले म्हणून
आज काही प्रवासाशी संबंधित वाचण्यात आले आणि वाटले कि आपणही काही आठवणी लिहाव्यात. प्रवास म्हटलं कि बऱ्याच वेळेला मुंबईतील लोकांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. जवळपास दररोजच नोकरीनिमित्त आणि सुटी असली तरी खरेदी, नातेवाईकांना भेटणे या निमित्ताने प्रवास करण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय नसतो. तसे धुळे, जळगाव येथील लोकांनाही बराच प्रवास करावा लागत असावा. पण त्यांच्या प्रवासाचा इतरांनाही त्रास होतो हे कधीकाळी रेल्वेने ज्यांनी त्या मार्गावर प्रवास केला असेल त्यांना चांगलेच ठाऊक असेल.
मी पहिल्यांदा मुंबई आलो ती आठवण सुरुवातीला तरी सुखावह नव्हती.
मिसळपाव