विळखा
माझा दवाखाना ज्या इमारतीत आहे त्यातच वरच्या मजल्यावर आमचे आई वडील राहतात. आमच्या वसाहतीचा पुनर्विकास झाला त्यात मी दवाखान्याची जागा घेतली आहे आणि वरच्या मजल्यावरचेच घर वडिलांना मिळाले.
आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला होता आणि त्याचा इलाज चालू होता आणि ते सुधारत होते. १९ जून २०१९ रोजी संध्याकाळी ८ वाजता दवाखान्यात कुणी नव्हते म्हणून मी त्यांना पाहायला गेलो. तेंव्हा आईने सांगितले कि अरे आज मी चेहऱ्याला पावडर लावायला गेले तर मला मानेला डावीकडे थोडं सुजल्यासारखं वाटतंय.
आमच्या आईला मानेचा आणि कंबरेच्या स्पॉनडायलॉसिस चा त्रास ८-१० वर्षे तरी आहे.
मिसळपाव