Skip to main content

हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको.........

लेखक छत्रपति यांनी मंगळवार, 15/01/2008 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको......... मनाच्या विवंचनाना आज तु विचारांचा हळवा स्पर्श केलास. स्तब्ध झालेल्या सागरामध्ये क्षणात लाटांचा तांडव निर्माण केलास. मन माझ् आधिर झालं.. तुझ्या आठवणींनी बेजार झाल. परत परत त्याच वळणावर् कस काय् चालायला तयार झाल? पण नाही....... तरीही आजुन मी मला सावरलं आहे. परिस्थीतिला उराशी बाळगलेलं आहे.. पार् करेन न करेन् त्या बाधांला पण. कुपंनातच मी जग बनवलं आहे.. म्हनुणच.. तु पुन्हा पुन्हा मागे वळु नको.. मलाही वाट बदलायला लावु नको... सार काही भुतकाळात विलिन झालय, त्याला प्रेमाच खतपाणी तु घालु नको...... हे स्वप्ना तु स्वप्नात माझ्या येऊ नको.........
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2559
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया