Skip to main content

मुक्तक

किस बाबा किस!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 11/07/2008 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
---------- बोंबला! :S साधारणपणे डझनभर विवाहसंस्थांचे उंबरे झिजवल्यानंतर, चहा-पोह्यांचे पन्नासेक कार्यक्रम यथासांग पार पाडल्यानंतर आणि विवाहेच्छू युवतींच्या मनांच्या सागरांतल्या गर्तांमध्ये गटांगळ्या खाल्ल्यांनंतर आज "हा हंत हंत' म्हणण्याची वेळ आमच्यावर आली आहे. म्हणजे, एवढ्या दिवसांची, आठवड्यांची, वर्षांची मेहनत वायाच गेली म्हणायची! विवाहेच्छू तरुणी या तरुणांचे व्यक्तिमत्त्व, पगार, घरची श्रीमंती, लफड्यांची पार्श्‍वभूमी, वाईट (नसलेल्या) सवयी, घरातल्या अडचणीच्या ठरू शकणाऱ्या गोष्टी (उदा.

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 11/07/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले.

गर्दी

लेखक छोट्या यांनी मंगळवार, 08/07/2008 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक रस्ता , आणि माणसं. खुप माणसं, कळपासारखी. एवढ़ी माणसं असुनही रस्त्यावर फारसा गोंधळ नाही. आपापले सामान घेउन जो तो चालतोय ... फक्त चालतोय. रस्त्याला थोडा उतार आहे , रस्ताही रुंद, मग चालणंही सोप्प झालयं. गर्दीलाही उत्साह आलाय, उतारबघुन. काहीजण जात्याच मजबुत आहेत, मग त्यांचा वेग अजुन वाढतो ... त्यांच्या नकळत. त्यांना समजत नाही की बाकीचे का हळू चालतायेत. स्वतःशीच हसत चालत रहातात, दुसर्यावर. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सापाच्या आकाराचे चर... नागमोडी पण समांतर. चर मोठे गूढ़.

पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर.

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 08/07/2008 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
झाला बुवा एकदाचा तो बहुप्रतीक्षित घटस्फोट! किती ग वाट बघायची त्यासाठी? किती वेळा देव पाण्यात ठेवायचे? (त्यांना सर्दी-पडसंच नव्हे, आताशा न्युमोनिया पण व्हायला लागला होता...) त्याच्या `बाहेरख्याली'पणाबद्दल तिनं जाहीर संशय घ्यायला सुरवात केलीच होती. परदेशी माणसांबरोबरचं लफडंही चव्याट्यावर आण्लं होतं. तरी त्याला काही शुद्ध नव्हती. त्याचं वेगळंच गणित सुरू होतं. त्याला घरचं अन्न गोड लागेनासं झालं होतं. बायकोने भरवलेलं आधी जे अम्रुत लागायचं, ते आता कडू जहर लागायला लागलं होतं. तुला घटस्फोट घ्यायचा तर घे, मी `बाहेरख्याली'पणा सोडणार नाही, असंच त्याला सुचवायचं होतं.

अनुदिनी अनुतापे...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 04/07/2008 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
माय मराठीच्या जगभर उमटलेल्या पाऊलखुणा संगणकाच्या पडद्यावर पाहाताना येणाया आनंदाच्या भरात मीही एकदा मराठीच्या जागतिकीकरणात आपलाही हातभार लावावा, म्हणून `अनुदिनी' सुरु केली. आनंदाचं ते भरतं ओसरायच्या आत दोनचार लेखही पाडून अनुदिनीवर डकवले. तेव्हापासून रोज त्यावरच्या हिट्स मोजल्याशिवाय मला झोप येईनाशी झाली. दिवसातून दहापंधरा वेळा तरी आपली अनुदिनी उघडावी, आणि जगभरातल्या किती मराठीप्रेमींनी आपल्या `वैश्विक साहित्या'चा आस्वाद घेतला, ते पाहात आनंदून जावे, हा छंद मला जडला.

कशी शांतता शून्य शब्दांत येते....

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 03/07/2008 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
तो किंवा ती आपल्याला मनापासून आवडते. आपल्या काळजातच घुसते. कुठल्याही अपेक्षेनं नव्हे, पण निव्वळ त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आपण प्रेमात पडतो. त्यानं/तिनं आपल्याशी मैत्री करावी, असं वाटतं. पण ती एका मर्यादेपलीकडं आपल्याला फार भीक घालत नाही. आपण अनेक प्रयत्न करतो...त्यासाठी प्रसंगी, वेगळ्या वाटेनं जातो. पण व्यर्थ! ती (व्यक्ती) कुठलीही असू शकते. कुठल्याही पार्श्‍वभूमीची, कुठल्याही प्रवृत्तीची. आपल्याला आवडते, ती तिची प्रवृत्ती. जगण्याची कला. धडाडी, कर्तबगारी, शैली, बोलण्या-वागण्याची पद्धत, एखाद्या विषयातला अभ्यास, विचार, मतं मांडण्याची पद्धत, यांपैकी काहीही.

अश्रु

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 12/06/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो डोळ्यात पाणी येत असेल तर अडवू नका, अश्रु म्हंणजे भावनांचा अविष्कार त्यांना जर उगीचच रोखल तर माणूस दगड होईल.