किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?
' अ वेनस्डे ',' अब तक छप्पन ' हे दोन्ही सिनेमे मी कमीतकमी २५-३० वेळा पाहिले असतील. शिवाय कधीकधी तर कुठूनही सुरवात करून कुठेही बंद केले... असेही पाहिलेत. हे दोन्ही सिनेमे पाहताना वारंवार वाटते, असे खरेही कधी घडावे. हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत.
कुठलाही अतिरेकी हमला झाला की जीव मुंडके अर्धवट चिरलेल्या कोंबडीसारखा तडफडू लागतो. खरे तर मुंडके कधीचेच चिरलेय, त्यावर पुन्हा पुन्हा नव्याने सुरी फिरवली जाते. कधी छातीवर तर कधी पाठीवर.... वारच वार. अव्याहत व पद्धतशीर.
मिसळपाव
हे भाग्यवंतांचं खाणं, हे भगवंताचं खाणं. दहीभात म्हणजे निव्वळ सुख आणि मन:शांती..!
कधी जेवणाच्या सरतेशेवटी खावा, कधी फुल जेवण म्हणून खावा.. कधी प्रवासात खावा तर कधी लांबच्या प्रवासानंतर थकूनभागून आल्यावर खावा..तर कधी तळतळत्या उन्हात झाडाखाली बसून खावा..!
पोटात गडबड? अजीर्ण? हम्म..
थोडं चवीपुरतं हिंगाष्टक चूर्ण घालून खावा.. :)
दहीभात कधीही खावा..
छानश्या कालवलेल्या दूधभाताला दह्याचं विरजण लावून केलेला दहीभात..