ए देवबाप्पा
ए देवबप्पा
ऐकू येते का रे काही तुला
त्या आरतीच्या गोंगाटात
टाळ्या अन झांजेच्या खणखणाटात
लोक काय काय मागत असतात
अन गार्हाणी सांगत असतात
कुणाला काय हवे असते
रुपं देही धनं देही
पुत्रं देही सर्व कामांशा देही मे
गात असतात किती ते तुझे गोडवे
अन म्हणतात की जो गाईल ही आरती
मिळेल त्याला सर्व हवे ते
पण खरे सांग एकदा
खरेच ऐकु येते का रे तुला?
सांग ना.....
ए देवबप्पा
दिसते कारे काही तुला
गाभार्याच्या बाहेरचे
त्या चिमुकल्या दाराच्या फटीतून
किंवा त्या जाळीच्या दरवाजाच्या पलीकडचे
त्या रोषणाईच्या झगमगटात?
किती डोळे लागलेले असतात
आशेचे डोहाळे घेऊन आलेले असतात
ताटकळत उभे असतात दर्शनासाठी
तुझ्यावर केलेल्या रो
मिसळपाव