Skip to main content

मुक्तक

भेट तुझी......मंतरलेली!

लेखक जाई अस्सल कोल्हापुरी यांनी सोमवार, 20/09/2010 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
.. क्षण मंतरलेले .. . तू येण्या आधीची ती हुरहूर ...अजून जाणवते मला. अस्वस्थ मन.....हृदयाची ती किंचित थरथर ....एखादा चुकलेला ठोका...आताही जाणवतो मला.. तूला पाहताक्षणी..मनभर आणि तनभर पसरत गेलेली गुलाबी सरसर .. ....माझ्याच गालांचा बदललेला वर्ण..ओठांवर अकारण उमलेले स्मित ...त्याही पेक्षा.. हे सारं जाणवलेली तुझी नजर, आणि तुझ्या त्या नजरेने पुन्हा सैरभैर आणि अस्वस्थ मी... अजून आठवते मला .. तू जवळ असतानाचा हवेचा गंध.... तुला स्पर्शून येणारी मंद रेशीम झुळूक.. सैलावलेलं मन..एखादा नकळत ...

ठेवू अम्ही विश्वास

लेखक पॅपिलॉन यांनी रविवार, 19/09/2010 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन मॅकक्रे ह्यांच्या In Flanders Field ह्या कवितेला We Shall Keep The Faith ह्या कवितेने उत्तर दिले आहे मोनिका मायकल ह्या अमेरिकन कवयित्रीने. त्याच कवितेचा हा स्वैर अनुवाद. तुम्ही सोपवलेल्या मशाली, विश्वास आम्ही जपू अविरत! लालभडक खसखशीची फ़ुले रणांगणावर पसरलेली देताहेत संदेश आभाळाला फ़्लॆंडर्सच्या रणावरील ते रक्त केवळ अविस्मरीणयच! ही मशाल आणि ही फ़ुले नेहेमीच आठवण करून देतील फ़्लॆंडर्सच्या रणात शांतपणे निजलेल्यांची! मूळ कविता Oh!

स्व प्न भं ग -

लेखक विदेश यांनी रविवार, 19/09/2010 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
तू हात पुढे जो केला मी दिला त्यास आधार समजून फोड तळहाती हळुवारपणे जपणार वचनास पाळण्याचा केला पक्का निर्धार चाललीस सप्तपदी तू मी कधी न अंतरणार शंकेस कधी तो थारा तू मनात ना देणार जोडीची गोडि गुलाबी ही सदैव दिसणार तू कामावरून येता तव स्वागत मी करणार कप हाती गरम चहाचा बिस्किटासवे देणार तारीख एक ती येता मी खूष अती होणार तव पगार माझ्या हाती- मी तुजभवती फिरणार ...स्वप्नातहि असले भलते तू आणु नको कुविचार - जा सांग तुझ्या बापाला मी घरजावई ना होणार ! ती केबी-फोरची संधी मी नाही दवडणार करोडपती बनण्याची मी स्वप्ने बघणार !!

सर

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 18/09/2010 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,नमस्कार........ विशेष नोंद : मी मिपावर इतर लेखांवर प्रतिसाद देत नाही व ह्यापुढे देणार नाही.पण मी लेख वाचतो,काही चांगले असतात्,आभ्यासु,वैचारीक,नवीन माहीती देणारे असतात.माझ्या एका लेखाच्या प्रतिसादात आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्यासारख्या फडतुस in turn थर्ड क्लास माणसाने एक भिकार लेख लिहावा व त्यावर आपल्यासरख्या प्रेमळ माणसांनी प्रतिसाद द्यावेत,ही गोष्ट माझी पातळी(पडलेली) उंचावल्याचा भास करुन देते. हो,फुकट आपुलकी मिळावी म्हणुन लिहल आहे,आपण खवमधे आपले विचार कळवावेत्,भीक आनंदाने स्विकारली जाईल.असो. आज माझ्या शाळेतल्या आवडत्या शिकक्षकाबद्दलचे व जुना आहे म्हणुन आवडायला लागलेल्या एका मित्रा

माझी मास्तरकी !

लेखक जिप्सी यांनी गुरुवार, 16/09/2010 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातली बुधवार पेठ 'अनेक गोष्टींसाठी' प्रसिद्ध(!) आहे.याच वस्तीतल्या लोकांशी माझा अगदी जवळचा सबंध आलेला आहे त्याविषयी थोडंसं.... २००६ सालची गोष्ट्,पुण्यातल्या माझ्या एका ओळखीतल्या एका गृहस्थांनी 'मामाचं गाव' असा एक उपक्रम राबवला होता. कुणासाठी? तर ज्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीत जायसाठी मामाचं गावच नाही अशां मुलांसाठी. ही मुलं कोण? तर बुधवार पेठेतल्या वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रियांची! ही मुलं ८ दिवस रोज सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत आमच्याकडं येत. त्यांना रमवण्यासाठी आम्ही रोज वेगवेगळे खेळ्,चित्रकला,मातीकाम इ.

"सुशि"... बास्सं. आणखी काय !?

लेखक चिगो यांनी बुधवार, 15/09/2010 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर एवढयातच पुन्हा लिवायचा काही विचार नव्हता. पण "धमु" शी खवखवता "सुशि"चा विषय निघाला, आणि खपली निघाली.. सुशिंना मी पहिल्यांदा केव्हा वाचला, आठवत नाही. पण "शॅबी" हा शब्द मी उगाचच्या उगाच वापरायचो, कारण तो "येता.. जाता" मध्ये वाचला होता. पिसाट हसलो होतो हि कादंबरी वाचुन.. खरंच काय रेंज होती ना या माणसाची स्साली ? हृद्य पिळवटुन घ्यायचंय, वाचा मग दुनियादारी, कल्पान्त, क्षितिज, दास्तान, झूम... हृद्याला भोकं पाडून घ्यावीशी वाटतंय?

खोटे सर्व,खरे तुझे रुप!

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 12/09/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेख नकळत थोडा लांबला आहे,पण कोणी वाचलात तर संपुर्ण वाचावा,अस मनापासुन वाटत. नकस्कार,नमस्कार......... न समजणारे मराठी शब्द मी ह्यापुढे कधीच वापरणार नाही.मी सर्व मिपाकरांची माफी मागतो,पण मला वेगळ्या,चांगल्या शब्दात सांगता आले असते,असो. आपण जीवनात विनोदी असाल तर त्याचे कारण कदाचित तुम्हाला विनोद करायची संधी मिळत असेल कींवा वातावरण तसे असेल.पण माझ्याबाबतीत बोलाल तर मी रीयल लाईफमधे विनोदी तर सोडा एकदम अबोल आहे,मग "जामच भाव खातोय","स्वःताला हुशार समजतो वाटत" वगैरे बोलणा-या नजरांना सामोरे जावे लगते. माझ्या कामाच्या ठीकाणावरुन स्टेशनला कार येत असताना मी त्या ४५-६० मिनिटांच्या प्रवासात एक शब

फोनवरचा संवाद व काही प्रश्न

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 09/09/2010 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,नमस्कार............ मी काही दीवसांपुर्वी "सल्ला हवा आहे" वगैरे काहीतरी एक लेख लिहला होता व विचारल होतं की अमुक व्यक्तीला फोन करायचा आहे.काय बोलु वगैरे.ती माझ्या वर्गात होती.आम्ही ५ ते १०वी एकत्र होतो. मला ह्या लेखातुन काहीतरी सांगायच आहे व विचारायच आहे.आजचा संवाद सांगितल्यानंतर विचारतो. "हॅलो"मी "कोण?"ती. "कोण लीना? मी सुशांत बोलतोय" मी ८-९ वर्षांनी तिच्याशी बोलत होतो.पाहील्याला पण तेवढीच वर्षे झाली. "सुशांत.....हा बोलना"तिचा शंकेने भरलेला सुर. "कुठे आहेस?"मी "कोण सुशांत?" "मी तुझ्या वर्गात होतो ना?.............तो" "तु कोणी वेगळ आहेस का?

किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना?

लेखक भानस यांनी गुरुवार, 09/09/2010 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
' अ वेनस्डे ',' अब तक छप्पन ' हे दोन्ही सिनेमे मी कमीतकमी २५-३० वेळा पाहिले असतील. शिवाय कधीकधी तर कुठूनही सुरवात करून कुठेही बंद केले... असेही पाहिलेत. हे दोन्ही सिनेमे पाहताना वारंवार वाटते, असे खरेही कधी घडावे. हा ' स्टुपिड कॉमन मॅन ' मला हवाय. आतुरतेने मी त्याची वाट पाहतेय. ते आमचे शेकड्याने मारत आहेत तर किमान त्यांचे दोन तरी मारले गेलेले मला पाहायचेत. कुठलाही अतिरेकी हमला झाला की जीव मुंडके अर्धवट चिरलेल्या कोंबडीसारखा तडफडू लागतो. खरे तर मुंडके कधीचेच चिरलेय, त्यावर पुन्हा पुन्हा नव्याने सुरी फिरवली जाते. कधी छातीवर तर कधी पाठीवर.... वारच वार. अव्याहत व पद्धतशीर.