Skip to main content

मुक्तक

पॅलेस, कोर्टकेस, सुवर्णमोहोरा आणि मी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 07/08/2010 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
"आल्या का गं मॅडम?'' कोर्टरूमच्या आतून माझ्या मैत्रिणीने खुणेनेच विचारलं. माझी मुंडी तिसर्‍यांदा नकारार्थी हालताना बघून तिने चेहरा वाकडा केला आणि कोर्टरूमच्या पुढील बाजूची तिची खड्या पारशाची पोझ घेत पुन्हा एकदा आमच्या दाव्याचा क्रमांक साधारण कधी, किती वाजता येईल याची तेथील लिपिकास विचारणा करू लागली. वेळ दुपारची. दिवस पावसाळ्याचे. कोर्टाच्या ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या कोर्टरूम्समध्ये ओलसर दमट हवेबरोबर पावसाळी आभाळामुळे आज जरा जास्तच अंधार दाटला होता. मधूनच सतावणार्‍या, गुणगुणणार्‍या माशांना संथ लयीत गरगरणारे पंखे अजिबात उडवून लावू न शकल्याने त्या मला आजही नेहमीसारख्याच छळत होत्या.

प्राक्तन

लेखक अवलिया यांनी शनिवार, 07/08/2010 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
थोडं अंतर राहिलय आता...

आभाळमाया

लेखक दत्ता काळे यांनी शुक्रवार, 06/08/2010 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंगणात फिरताना रात्री सहज आकाशाकडे लक्ष गेले खूप दिवसात आकाशच नाही बघितले असंख्य तार्‍यांनी भरलेले दूर दूर विखरलेले तारे स्वयंप्रकाशी, लखलखणारे मूलतत्वाशी नाते असणारे एकमेकांपासूनद्धा आता किती दूर बघता बघता एक तारा निखळला गालावरून ओघळणार्‍या अश्रूसारखा घसरून गेला अनंतात आकाशाशी नाते सोडून दचकून भानावर आलो.. आभाळमाया जपायला हवी अश्म होईतोवर तरी

टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!

लेखक अविनाश ओगले यांनी गुरुवार, 05/08/2010 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
टिळक, पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली! परवा एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज! ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात. शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे. संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड"पाशी येऊन

दारी उभा गे साजण

लेखक मितान यांनी गुरुवार, 05/08/2010 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
तो: एक विचारु ? ती: ह्म्म.. विचार की.. तो: तिच्या गावी जातोय तर एकदा भेटेन म्हणतोय.. ती:( कातर,व्याकूळ झालेले डोळे लपविण्यासाठी मान फिरवून ) बघ. म्हणजे ठरव तूच ! तो: एकदा भेटूनच येतो. ती: परवा सकाळी येशील नं घरी? तो: हो. तो जातो. ही सैरभैर. ही भेटण्याआधी ती याच्या आयुष्यात होती. लाटेसोबत आलेल्या शिंपलीसारखी. दुसर्‍या लाटेबरोबर निघूनही गेली....हिला त्या जखमा दिसल्या तेव्हा दातओठ खाऊन जिवाच्या कराराने त्या पुसण्यासाठी किती झगडली ! आणि आज पुन्हा तो म्हणतोय............ रात्रभर कूस बदलत आभाळातल्या चांदण्या मनात टोचवून घेत राहिली. चांदण्याही मग हक्काने टोचत राहिल्या.

फिट्टंफाट

लेखक अर्धवट यांनी बुधवार, 04/08/2010 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
मला तो खूप वेळा भेटलाय, आताशा संपर्क कमी झालाय हे खरं पण तरीही संबंध काही संपला नाहीये. अजून कधीतरी एखाद्या निवांत रात्री रपरपत असतो. मीच टाळतो बाहेर जायचं. सखीची झोपमोड करून त्याला भेटायला जायचं म्हणजे नको वाटतं. पण अस म्हणून, झोप येते का शांत, त्याच्या हाका चालूच असतात की. आपण तोंडावर पांघरूण ओढून झोपेचं सोंग घेऊन रहायचं. लहानपणी नेहेमीच भेटायचा तो, आणि आतासारखं वरवरचं, तोंडदेखलं नाही, पक्का सामील असायचा मलाच. घरच्यांनी सांगितलं म्हणून छत्री घेऊन बाहेर पडायचं, पण जरा पुढे गेलं की लगेच छत्री मिटून भिजायचं.

“ घेतला वसा षंढतेचा ”

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 04/08/2010 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
“ घेतला वसा षंढतेचा ” आपल्याच लेकरांचे रक्त जेव्ह्ना सांडते, मातेचेहि उर तेव्ह्ना आक्रंदतांना फाटते “ सिमेपारचा ” दहशतवाद सोयीची भाषा असे, फोफावतो तो सर्वत्र येथे खंत त्याची आम्हा नसे . पाहतो उध्वस्त घरे, शहरे अन उष्ण रुधीरांचे सडे, तरीहि शिकवतो जगतां आम्ही षंढतेचे नैतिक धडे. पायघड्या पसरुनी अता स्वागत कसाबाचे करा, घेउनी षंढतेचा वसा, लांगुलचालन पाक्यांचे करा. . काय येवढे काश्मिराचे देश आपुला छोटा नसे, एक काश्मीर नाही म्हणोनी काय अडते फारसे ? निरंजन वहाळेकर

फ्रेंडशिप Band (`बंद'!)

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 03/08/2010 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, आपल्याकडे फ्रेंडशिप बॅंड आहेत?'' शी-शू करायची अक्कल आत्ता आत्ता आलेली आमची साडेपाच वर्षांची चिमुरडी मला विचारत होती. "नाहीत,' असं सांगून मी टाळण्याचा प्रयत्न केला. ""मला उद्या पाच -सहा फ्रेंडशिप बॅंड हवेत!'' तिनं फर्मान सोडलं. ""कशाला गं?'' मी साळसूदपणाचा आव आणला. ""आमच्या वर्गातली मुलं आज एकमेकांना बांधत होती. माझ्याकडे एकही नव्हता. मला उद्या हवा म्हणजे हवा!'' तिनं ठणकावलं. आपला गरीब बिच्चाऱ्या पित्याच्या भूमिकेत शिरून गप्प बसलो. संध्याकाळी आईनं तिला फ्रेंडशिप बॅंड आणून दिले.

आयला!! हे अवघड आहे बुवा !!!

लेखक नितिन थत्ते यांनी शनिवार, 31/07/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः हे लेखन केवळ विरंगुळा म्हणून घ्यायचे आहे. नुकताच एका सदस्याने स्वयंपाक येणे/करणे यावरून एक धागा काढला आहे. लग्न करण्यापूर्वी सांगितलेल्या किंवा अपेक्षित धरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात न झाल्यामुळे होणार्‍या मनस्तापाविषयी तो धागा आहे. आजकाल लग्न ठरताना आणि ठरल्यावर प्रत्यक्ष लग्न होण्यापूर्वी एकमेकांना भेटण्याची बरीच संधी मिळते.

CE मार्कची वांगी!!!!?????

लेखक मिलिंद यांनी शुक्रवार, 30/07/2010 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्षक वाचूनच दचकलात ना!! अहो मी तर ही वांगी पाहूनच गार झालो. वांगी तीही CE मार्कची आणी माझ्या पिशवीत? मी स्वत:ला चिमटा काढून पाहिला पण नाही हो मी जागाही होतो (आणी भारतातच होतो) सीई मार्कचे वांगे १ सीई मार्कचे वांगे २ त्याचं झालं असं मी माझ्या कोकणातल्या गावाहून पुण्यात परतत असताना बहीणीकडे थांबलो.