Skip to main content

मुक्तक

व्यसनेषु सख्यम!

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 30/07/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
आज दुपारी ऑफिसातील काम उरकल्यानंतर थोडासा वेळ हाताशी होता म्हणून बऱ्याच दिवसांनी सीडी खरेदी आणि विंडो शॉपिंगसाठी लक्ष्मी रस्त्यावरच्या माझ्या आवडत्या दुकानात गेलो होतो. इथूनच मी पहिल्यांदा सीडी प्लेअर घेतला, तेव्हापासून तिथल्या सीडी, कॅसेट कलेक्‍शनच्या प्रेमात पडलो होतो. तिथली शिस्त आणि सगळं साहित्य व्यवस्थित मांडण्याची पद्धत फार आकर्षक आहे. आपल्याला हवी ती सीडी विकत घ्यायला फार सोयीचं जातं. असो. अलिकडच्या काळात बरेच हिंदी, मराठी चित्रपट पाहायला वेळ झालेला नाही. अनेक सिनेमे घरी कॉंप्युटरच्या हार्डडिस्कवर असले, तरी ते बघणं झालेलं नाही.

बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान?

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 29/07/2010 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
बीप बीप - मोबाईल फोन - शाप की वरदान? सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला मोबाईल फोन ची इतकी सवय झालेली असते कि मोबाईल आपल्याजवळ नसला किंवा आपण तो घरीच विसरलो की जणू 'हेल्पलेस' झाल्याचे फिलिंग येते. मात्र, मोबाईल ची इतकी सवय होण्या मागे तो आपल्याला कनेक्टेड ठेवतो हे तर कारण आहेच, पण त्याशिवाय त्यातील इमेल, इंटरनेट, कॅमेरा, म्युझिक प्लेयर आदी अनेक सुविधांवर आपण अवलंबून असतो.

"७ इयर्स इच"

लेखक शुचि यांनी मंगळवार, 27/07/2010 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
"७ इयर्स इच" दचकलात ना ऐकून? आहेच हा प्रकार भन्नाट. म्हटला तर गंभीर, म्हटला तर गमतीशीर. लग्नानंतर साधारण ७ वर्षांनी माणसाला अनावर हुक्की येते, अगदी खाज यावी तशी कंपल्सिव्ह. कशाची म्हणता? ह्म्म तर विवाहबाह्य प्रकरण करण्याची. थोडं अ‍ॅडव्हेन्चरस होण्याची. याला म्हणतात "७ इयर्स इच" :) या विषयावर मर्लीन मन्रोचा एक मस्त विनोदी चित्रपट्देखील निघाला आहे. तिच्याखेरीज कोण न्याय देऊ शकणार अशा इरसाल विषयाला? त्या चित्रपटाचं नावच मुळी "७ इयर्स इच". चांगला सुखासुखी संसार सोडून अशी "सो कॉल्ड" अवदसा का बरं आठवत असावी माणसाला? मला तरी वाटतं याचं उत्तर दड्लय मानसशास्त्रात. टू मच ऑफ एनीथिंग इज बॅड.

सप्तपर्णी

लेखक लिखाळ यांनी मंगळवार, 27/07/2010 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
सप्तपर्णी
सप्तपर्णीच्या झाडाकडे पाहावे तो अचंबा वाटतो. बुंधा तर इतका मोठा, की दोन हात पसरून कवेत घ्यावे तरी शक्य नाही. जुन्या देवरायांमधले हे वृक्ष शाश्वततेची प्रतिके असल्यासारखी पाय रोवून उभी. प्राचीन देवराई, त्यात असा प्रचंड वृक्ष. सप्तपर्णीच्या बुंध्याशी बसून राहावे. अश्या भल्या वृक्षांखाली बोध होत असतो. उंच झाडांखाली वाढलेल्या गडद पानांच्या वनस्पती आणि बराचसा पाचोळा. पाचोळ्यावर एखादे पान पडावे आणि तळ्यावरल्या संथ पाण्यावर तरंग उमटावे तसे आपल्या मनावर उमटावेत. जमीन मात्र सर्वकाही धारण करते. स्तब्ध असते.

..... बाकी सगळं ठीक आहे !

लेखक मनीषा यांनी सोमवार, 26/07/2010 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या देशात देवा - सारं काही ठीक आहे ... काही गरीब, कंगाल काही - काही मात्र श्रीमंत आहेत | जगण्याच्या लढाई मधे , जनता सारी व्यस्त आहे महागाई, भ्रष्टाचाराने , थोडी फार त्रस्त आहे | रस्त्यांवर चारचाकी, रोज रोज वाढत आहेत त्या खाली चिरडून सुद्धा , रोज काही मरत आहेत | पावसाच्या काही सरी, नेतात रस्ते पाण्याखाली नागरिकांचे सेवक मात्र, मागतात थोडी चिरीमिरी | बॉम्बस्फोट आणि गँगवॉर - सारं काही सुरळीत आहे चौका चौकात सिग्नलला - भिकारी देखील खूप आहेत | अणू स्फोट करुन काही - भारत शक्तीशाली होतो समुद्रातून येउन मृत्यु, रस्त्यांवर थैमान घालतो | लोकांनाही त्याचे भय, आता फारसे वाटत नाही मोठ्या मो

मी पहात होतो दूर...

लेखक भारतीय यांनी शनिवार, 24/07/2010 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
तसा काव्याच्या प्रांतात मी नवशिक्याच.. जमेल तशी केलीय, चू.भू.दे.घे. मी पहात होतो दूर, तू दिलास मजला सूर, लावलीस मला हुरहूर, मी पहात होतो दूर.. मीच होतो मूढ, की तूच होती शूर, तू केलस मला चूर, मी पहात होतो दूर.. तुझा होता वेगळाच नूर, माझ्या भावनांना आला पूर, तू छेडलास माझा सूर, मी पहात होतो दूर.. तू आलीस जवळ पुरेपूर, सांग माझा काय कसूर, लावलीस मला हुरहूर, मी पहात होतो दूर.. तू पलटविलास तूझा नूर, केलस मला भेसूर, मी पहात होतो दूर.... तू... तू ऊडुन गेलीस भूर्र्....
काव्यरस

फिनिक्स

लेखक निरन्जन वहालेकर यांनी शनिवार, 24/07/2010 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स इश्क जरी दाहक आग ही खेळ विस्तवाशी मांडला, राख जाहलो तरीहि डाव अर्ध्यावर ना सोडला. मिसळूनी राखेत जो संपतो ते आम्ही नव्हे, फिनिक्स पक्षासम उठूनि पुन्हा डाव खेळू नवा तुजसवे. निरंजन वहाळेकर
काव्यरस

बाहावा !!

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 13/07/2010 10:06 या दिवशी प्रकाशित केले.
.....शेकडो छटांनी खुललेली हिरवाई, ... एक हिरवाकंच बाहावा, आणि पोपटी, झुलता गुलमोहोर... बाहाव्यावर पिवळ्याजर्द फुलांची चादर चढते, अन उन्हाच्या झळांनी सोन्याची झळाळी येते... डोकावणारी शर्मिली हिरवाई, मागे फुललेला लालकेशरी, पिवळ्या ठिपक्यांचा झुबकेदार गुलमोहोर... ------- -- -- आज पाऊस कधीचा कोसळतोय... हिरवा बाहावा ओलाव्यानं जडावलाय... भारावलेल्या फांद्या, आळसावल्यागत सुस्तावल्यात... एखादी झुळूक येते, नकोनकोसं होत त्या इकडेतिकडे करतात, ...आधीच पावसाचा मारा, त्यात तो लंपट वारा... नकोनकोसं होऊन ती फांदी जमिनीकडं झुकते...

सहज...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 10/07/2010 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
सहज... मला वाटलं, म्हणून हे लिहितोय. कदाचित तो विषय अकारण वाटेल. पण असे काही विषयही, विचार करायला लावतात. ... काल अगदी सहजपणे कानावर पडलेले ते शब्द ऐकून मलाही धक्का बसला आणि मी चमकून त्यांच्याकडे बघितलं. ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर ते मस्त गप्पा मारत होते. एक मध्यम वयाचा माणूस, आणि एक, पोरगेलासा, कॉलेजात जाणारा, नुकती मिसरूड उमटूउमटू लागलेला मुलगा. बहुतेक तो त्या माणसाचा मुलगा असावा. चेहेरेपट्टी बरीचशी मिळतीजुळती. आणि, बहुधा ते गुजराती असावेत. कारण, त्यांच्यात `बिझीनेस'च्या `वार्ता' चालल्या होत्या. बहुतेक तो माणूस भडकमकर रोडवर कॉम्पुटर पार्टसचं दुकान थाटून स्थिरावलेला असणार...

निवडुंग........

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 08/07/2010 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
निवडुंग अपेक्षिले प्रेम फुलांचे वैर त्या सवे होते भाली, दूर सारले जरी काट्यांना प्रीति त्यांची नित्य लाभली प्रेम बहरले मग काट्यासंगे, रुतवण हवी हवीशी जाहली. निवडुंगा सम जाहले जीवन, नाजूक नाती विरून गेली फुलाचे बाग सुकतात कधीकधी निवडुंग फुले सदैव फुलती. गुलाब काटेरी फांदीवरचे, कुंतलांना नित्य सजवती. निवडुंग जाहला म्हणुनी तयासि, आस फुलाची गैर नसे. काटेरी झाडावरहि त्याच्या, धवल फुलांत टवटवी वसे. निरंजन वहाळेकर