Skip to main content

मुक्तक

नक्को नक्को रे!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 29/08/2010 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
"केतन, नाकात बोटं नको घालू.... " "केतन, तुला कितीदा सांगितलंय, असा पाय हलवायचा नाही म्हणून! कुणाला लागला तर? " "अरे केतन, तिथे उभा नको राहू, कोणीतरी धक्का मारील... " एक गौरांगना बसस्टॉपवर खांद्यावरच्या जाडजूड ओझ्याच्या पिशव्यांना कसेबसे सांभाळत, बसची वाट पाहत दर मिनिटाने तिच्या बोअर झालेल्या चिमुकल्याला हटकत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती दमल्याचे स्पष्ट दिसत होते. बराच वेळ थांबूनही बस आली नव्हती. आणि सुपुत्र 'केतन' अतिशय बोअर झालेल्या अवस्थेत स्वतःचे मनोरंजन करू जाता त्याला वारंवार हटकण्यात येत होते. खरं तर आपल्या हटकण्याने मुले खरोखरीच त्यांना करावयाच्या गोष्टी थांबवतात का?

एकच लख्ख अनंत किरण...

लेखक अर्धवट यांनी गुरुवार, 26/08/2010 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला कधी टोचतो की नाही माहित नाही पण मला खुप टोचतो मखमली अंधार... परका अंधार आणि पोरका मी.... म्हणजे नेहेमीच नाही बरंका... कधी कधी कसा मस्त दुलइ सारखा असतो... हवी तेव्हा गुडुप ओढून घ्यावी तोंडावर... कंटाळा आला की खसकन् फेकुन द्यावी... सगळा सोहळा हजर तुमचं स्वागत करायला हसर्‍या चेहेर्‍यानं. कधी कधी मात्र खुप गुदमरायला लावतो... अंधार्‍या डोहात बुडल्यासारखं वाटतं... जिव गुदमरतो अगदी... मग मी डोळे टक्क उघडे ठेउन झपाटल्यासारखा पाहात बसतो... नजरेनेच चाचपडत, तडफडत बसतो... तो तळाशी ही खेचत नाही आणि श्वासही घेउ देत नाही... कधी सोसतो.. कधी पोळतो. पळताही येत नाही त्यापासुन..

दगड

लेखक निरन्जन वहालेकर यांनी बुधवार, 25/08/2010 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
दगड......... दगडांना आपणच देव बनवतो, दगडांनी एकमेकां ची टाळकी फोडतो, दगडांनी ठेचून कुणी बळीहि घेतो, अन दगडाच्या देवालाच अर्पण करतो. दगड जोडून सेतू बनतो, दगड आकारून ताजमहाल घडतो, दगड तोडून कुणी बावरी खणतो, आज काश्मिरात दगड बॉम्बहि होतो, घडवणारे,जोडणारे, अन विध्वंसक, हात मात्र सारखेच असतात, “ माणूस ” जातीतील, माणसाचेच असतात. दगडांच आपलं बरं असते भल्याबुऱ्याची त्यांना जाण नसते विध्वंसक हातांच डोकं मात्र “ जाणत्या ” पुढारयांकडे गहाण असते. निरंजन वहाळेकर

राखी अमावस्या!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 23/08/2010 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
राखी पौर्णिमा जवळ आली, की छातीत धडकी भरायचे दिवस आता सरले आहेत. तरीही राखीपौर्णिमेच्या निमित्तानं जुन्या जखमांवरच्या खपल्या निघतात आणि आमचा अश्‍वत्थामा पुन्हा गत आठवणींच्या भोवऱ्यात भिरभिरत राहतो... शाळेच्या आवाराच्या तटबंदीपेक्षा जास्त भक्कम तटबंदी त्या वेळी आमच्या मनांची होती. मुलीकडे पाहणं म्हणजे "शांतम्‌ पापम्‌' म्हणायचे ते दिवस. त्यातून आम्ही रत्नागिरीसारख्या छोट्या शहरातल्या सर्वांत "सुसंस्कृत' शाळेत, सर्वांत हुशार समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वर्गातले सहाध्यायी. सर्व जगाच्या संस्कृतीरक्षणाची जबाबदारी आमच्यावरच!

माझी आई

लेखक शुचि यांनी सोमवार, 23/08/2010 05:54 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या काही थिअरीज आहेत पैकी १ म्हणजे - शिक्षकांची मुलं चांगली निघतात. चांगली म्हणजे त्यांना शिस्त असते वगैरे वगैरे. असो. माझी आई देखील शिक्षीका होती. मला तिच्याबद्दल आठवेल तसं सांगायचं आहे. प्रयत्न करते. मला वाटतं स्त्रिया-स्त्रियांमधलं सर्वाधिक क्लिष्ट, कडू-गोड, गिल्ट रिडन नातं जर कोणतं असेल तर ते आहे आई-मुलीचं. या सुंदर, अनोख्या, अनवट नात्याबद्दल माझ्या मनात नेहेमीच एक कुतुहल, गंमत अशी संमिश्र भावना आहे. आई हे १ अजब रसायनच असतं नाही? मायेनी डोक्यावरून हात फिरवत तुम्हाला जागं करणारं आणि दुसर्‍या क्षणी तुमच्यावर रागानी बरसणारं सुद्धा. तुमचं सगळं भावविश्व व्यापूनही ४ अंगुळं उरणारं.

विटेवर चा विटोबा

लेखक मन्जिरी पैठन्कर यांनी शनिवार, 21/08/2010 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
विटेवर चा विटोबा , हात टेवून कटीव र उभा आपला युगान युगे , डोळे लावून वाटेव र तो - काही येत नाही , हा - काही ट्ळत नाही अरे कुणी सांगा त्याला आजकाल आपल्या पालकांचे पाय कुणी चेपतच नाही.

माझा अजुन एक लेख(?)

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 21/08/2010 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार.......... आता बारा वाजलेत्('प्रकाशित करा' दाबल तेव्हा १२:४०),उद्या ४.३०ला उठुन,,,,,,,,,पहीला ठाणे व नंतर पुणे.........बापुंचे पैसे न वापरता जन्मात पहील्यांदा प्रवास करणार! पुणे व तिथल्या लोकांबाबत आपल्याला खुप आदर आहे हो,हे तुम्हाला सांगायची तर गरजच नाही.

आक्रसलेल्या क्रोशाची चित्तरकथा

लेखक अरुंधती यांनी रविवार, 15/08/2010 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
तसे अधून-मधून मला सर्जनशीलतेचे झटके येत असतात. कधी त्यांची परिणिती काव्य-लेख-निबंधांत होते तर कधी एखादी 'अनवट' कलाकृती आकार घेते! येथे 'अनवट' शब्दाचा अर्थ 'जरा हट के' असा आहे हे सुज्ञांनी समजून घ्यावे. चांगल्या मशागत केलेल्या जमिनीत ज्या जोमाने तण उगवते त्याहीपेक्षा अधिक जोमाने माझ्या सुपीक डोक्यातून अनेक हरहुन्नरी विचारांचे पीक निघत असते. मग त्यासाठी एखादीच ठिणगी पुरेशीअसते.... भुस्सदिशी विचारांचा जाळ उमटतो आणि त्याचे पर्यवसान अनोख्या 'कला(? )कृती'मध्ये होते!! अशीच परवा टी. व्ही. चॅनल्समधून दमछाक होईस्तोपर्यंत येरझारा घालताना माझी नजर एका चॅनलवर थबकली.

ये रे माझ्या `माग'ल्या!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 14/08/2010 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
युवतीहृदयसम्राट, गालखळीचा बादशहा जॉन अब्राहम तसा नेहमीच चर्चेत असतो, पण या वेळची "पार्श्‍वभूमी' जरा वेगळी होती. बातमी अशी होती, की जॉननं दहा कोटी रुपयांचा विमा करण्याचा घाट घातलाय...विमा कशाचा माहितेय? त्याच्या पार्श्‍वभागाचा! हो हो...! `दोस्ताना'मध्ये त्यानं ज्याची झलक दाखवल्यानंतर त्याला त्याची जास्तच काळजी वाटू लागली असावी... कुणी कुणाच्या कुठल्या अवयवाचा विमा करावा, याविषयी आपला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही, पण ज्या विशिष्ट अवयवाचा त्यानं विमा करायचं ठरवलं, त्यावरून भुवया उंचावल्या जाणं साहजिक होतं.

मणिकांचन योग आणि माझ्या कर्माचे भोग!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 12/08/2010 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूपुष्य, अक्षय तृतीया वगैरे मुहूर्तावर सोने खरेदी करायची असते म्हणे. - मी सर्वपित्री अमावस्येला करतो. ... चतुर्थीच्या दिवशी गणपतीला, नवरात्रात चतुःशृंगीला जायचं असतं म्हणे. - मी संध्याकाळी वेळ असेल तेव्हा पर्यटनासाठी म्हणून जातो. ... संध्याकाळच्या वेळेत तेल, मीठ आणू नये, सोमवारी केस कापू नयेत, म्हणतात. - मी हटकून त्याच दिवशीचा मुहूर्त धरतो. ... बकवास रीतिरिवाज मी पाळत नाही. कुणी तसं सांगितलं तर मी मुद्दाम ते धुडकावण्याची खुमखुमी मला येते. पण अलिकडे का कुणास ठाऊक, (मुलीच्या लग्नाची चिंता सतावायला लागल्यामुळेही असेल कदाचित) सोने खरेदी करून ठेवण्याची खुमखुमी मला आली आहे.