Skip to main content

मुक्तक

भुक

लेखक शानबा५१२ यांनी बुधवार, 06/10/2010 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
ही घटना त्याच काळातली ज्याबद्दल मी काल लिहल आहे.काल लिहलला लेख ह्याच बाबतीत लिहायचा होता.पण दारु कींवा तत्सम नशा करुन माणुस भरकटतो.तसा मी काही कारणांमुळे भरकटलो.म्हणुन गाडीला वेगळेच वळण देउन एका वेगळ्याच कोप-यात थांबवुन टाकली.:) लहानपण आठवल की मला राग जास्त येतो.मी तसा लहानपणापासुन रागीट व माणुसघाण्या असल्याने मला जग व त्यात घडणा-या घटना एके ठीकाणी शांत उभा राहुन बघायला आवडतात.त्यात सहभागी होउन 'सामाजिक प्राणी' बणने(?) मला कधी जमले नाही.नाही माझ्यात मीपणा नाही हे ह्यासाठी सांगतोय की आता मला ज्या घटनेबद्दल (ह्याला घटना म्हणावे का ही शंका आहे,पण दुसरा पर्यायी शब्द मला माहीती नाही) बोलायचे आहे त्

मला हे प्रश्न पडतात

लेखक शुचि यांनी बुधवार, 06/10/2010 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
मॉंटेसरीत असताना होळीच्या भूतांना घाबरले होते. तोंडे रंगवलेले, मुखवटे घातलेले लोक, लहान मुलं पाहून मागे मागे जात गेले अन खरोखरच तारेच्या काटेरी कुंपणावर पडले. बरच ओरखडलं होतं, धनुर्वाताची लस टोचून घ्यावी लागली होती. तेव्हा कितीही सांगीतलं असतं की ती भूतं खोटी असतात तरी बालमनाला पटलं नसतं. त्या क्षणापुरता त्यांची विद्रूप, भडक रूपं हेच वास्तव होतं. ___ भविष्यविषयक चिंता , असुरक्षितता मग ती वित्तीय असो वा आरोग्यविषयक या भूतांसारख्याच असतात का? आपलं उरलं सुरलं मानसिक स्वास्थ्य नष्ट करणार्‍या.

नेट नेटकं

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी बुधवार, 06/10/2010 00:14 या दिवशी प्रकाशित केले.
परदेशात नुकत्याच जन्मलेल्या माझ्या नातवाचं "तोंड" मला फेसबूकवर दाखविण्यात आलं तेव्हा माझ्या इतकच लक्षात आलं कि माझ्या अंत्ययात्रेच्या वेळी ...माझ्या मुलाला यायची गरज नाही अंत्यायात्रेची क्षणचित्रे त्याला फेसबूकवर पाहता येतील...! खरच या इन्टरनेट मुळे किती जवळ आलो आहोत नाही आपण...? अगदी सगळं "नेटनेटकं" झालय....!!
काव्यरस

प्रॉब्लेम

लेखक गणपा यांनी सोमवार, 04/10/2010 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज लेक शाळेतुन जरा तडतडतच घरी आली. बायकोने विचारल 'काय झाल गं? एवढी वैतागली का आहेस?' लेक "तो यश सारखा मला 'आय लव्ह यु' म्हणतो." बायको पण दचकली (लेक यत्ता पहिलीत आहे.) पण सावरुन म्हणाली "नक्की काय करतो वर्गात, तुला त्रास गेतो का?" लेक "त्रास नाही देत. मदत करतो. कधी मी क्रेयॉन्स विसरले, पेन्सिल/इरेझर विसरले तर तो लगेच देतो. पण दुसर्‍या कुणाला माझ्या बाजुला बसु पण देत नाही." बायकोने मग तिला लाईक आणि लव्ह मधला फरक तिच्या वयाला साजेश्या शब्दात सांगितला. बायको : "आता मला सांग तो नेहमी मदत करतो तर तो तुला आवडत नाही का?" लेक : "अग पण तो केवडुसा आहे.

चौकट

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 29/09/2010 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
मळलेल्या वाटेवरुन मी जातो बागेतल्या त्या कोपर्‍याकडे गुलमोहोराखाली असलेल्या लाकडी बाकाकडे तिथे असतो गुलमोहोराच्या फुलांचा पखरण ल्यायलेला जमीनतुकडा. मला हे चित्र सुखदायी वाटतं वाटतं करावंसं चौकटबध्द मी चौकट टाकतो त्या चित्राभोवती. आता लाकडी बाक, मागे बहरलेला गुलमोहोर अन् त्याखालची लालरेशमी जमीन ...

शिरिष कणेकर

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी सोमवार, 27/09/2010 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मला खूप आवडलं म्हणुन येथे दिलं आहे. धोरणात बसत नसेल तर खुशाल उडवा. जरा वाचा आणि विचार करा .......... राज्य करावं तर शिवाजी महाराजां सारखं . शूर असावं तर राणा प्रतापसारखं. स्वामिनिष्ठ असावं तर खंडो बल्लाळासारखं. देशभक्त असावं तर भगतसिंगसारखं. कारस्थानी असावं तर आनंदीबाईसारखं . हुशार असावं तर बिरबलासारखं . धाडसी असावं तर डॉ.आनंदी जोशीसारखं. करिअर करावी तर लता मंगेशकरसारखी. सगळ्यांच्या गळ्यातील ताईत ह्वाव तर सचिन तेंडूलकरसारखं. सत्तेला चिकटून रहाव तर शरद पवारांसारख. राजकीय पक्ष बदलावेत तर सुब्रमन्यम स्वामीसारखं. बेसूर गाव तर अलिशा चिनॉयसारखं. समस्त लोकांना उल्लू बनवावं तर ललित मोदीसारखं.

काय?आठवतंय तुला?

लेखक ऋयाम यांनी रविवार, 26/09/2010 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
देशपांडे गल्लीत त्यांचं घर... तिथं देशपांडेंचा मोठा वाडा... वडिलोपार्जित! म्हणुनच ती देशपांडे गल्ली! तिथंच शेजारी असलेल्या पाटलांच्या त्या दोन मजली घरात, वरच्या मजल्यावर ह्यांचं बिर्‍हाड. शेजारी आणखीही काही भाडेकरु... त्या गल्लीत किराणा मालाचं एकमेव दुकान पाटलांचं.. त्या दुकानाच्या मालकांचच हे घर... पुढं दुकान, मागं घर, आणि वरचा मजला भाड्यानं दिलेला... तर... तिथला जिना चढुन दुसर्‍या मजल्यावर यायचं आणि उजवीकडे पहिलंच घर यांचं... तो जिना चढुन वर आला... दरवाजा उघडुन आत जाऊ लागला, तेव्हा दाराचा जोरात आवाज झाला.. "कररर्र......... " "किती आवाज होतोय... तेल घालायला हवं....