Skip to main content

मुक्तक

लग्नानन्तर

लेखक अविनाश पालकर यांनी गुरुवार, 12/08/2010 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
त्याला आवडत नाही तिने तिच्या लग्नानन्तर रस्त्यात त्याच्याशी बोलनं अणि त्याहुन खटकतं ते बोलताना खाली पाहुन मंगळ्सुत्राशी खेळणं
काव्यरस

औदार्य...? ? ? ? ?

लेखक निरन्जन वहालेकर यांनी गुरुवार, 12/08/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
औदार्य…. ? ? ? ? ? प्रीतित तुझिया मला उध्वस्त होते व्हायचे, विधिलिखित भाली जसे तैसेची होते व्हायचे. बरबाद सकल जाहलो “हाय” ही ना वदलो कधी, पहिला मी अन्त माझा दोष तुज ना दिधला कधी. निरंजन वहाळेकर
काव्यरस

पुणेरी विक्षिप्तपणा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी बुधवार, 11/08/2010 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी विक्षिप्तपणा _______________________________________________________ सदर लेख केवळ आपल्या मनोरंजनासाठी, माझा कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नाही. _______________________________________________________ ही घटना 'मे २००७' मधली, या काळात मी 'चाणक्य मंडल परिवारचा एक अभ्यासक्रम' पूर्ण करण्यासाठी म्हणून पुण्यात सुमारे एक महिना वास्तव्याला होतो. सदाशिव पेठेतील एका विद्यार्थी गृहात मी आणि माझा मित्र राहत असताना आलेला हा एक गंमतीशीर अनुभव.

स्वैर कल्पना: "वीजपाऊस"

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 09/08/2010 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
चंदामामा वीज विकत घेतो... सूर्यदादा कडून! चांदण्याताईंना वीज मोफत वाटतो ... ओंजळ भरून! महिनाभर निघते आकाश, प्रकाशाने उजळून! महीना संपल्यावर सूर्याकडून येते, विजबीलही भरभरून! बील भरले नाही तर सूर्यदादा बघतो... रागाने थरथरून! चंद्राची वीज कापतो अमावस्येला... चंद्राकडे पाठवून! ढगआजोबा करीती थयथयाट... चंद्राला विझलेला पाहून! उडल्या वीजरूपी ठीणग्या अन संतापाच्या जलधारा ... त्यात पृथ्वीताई निघाली न्हाऊन!

नाव सुचले नाही....

लेखक बरखा यांनी सोमवार, 09/08/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
दाराला तोरण आ॑ब्याचे र॑गित रा॑गोळी,पणती तेवते, पाहुण्या॑ची रेलचेल गडबड वाढते आज दिन सोनियाचा,माझी लेक सासरला ग जाते... आईच्या डोळ्यात भरले ग पाणि, पापणि लवता मोती येतिल ग खाली ऊरातिल धडधड वाढ्तच जाते बघता बघता लेकीच्या डोक्यावर अक्शत पडेते, सुर येई सनईचे,चऊघडा ग वाजे लेक आईची कशी पति बरोबर सप्तपदी चालते लहान असताना धरे पित्याच्या ग हात सप्तपदी चालताना तिला होते का आठवण आज लेकीची झाल दिली तिच्या सासरी डोक्यावर ठेवली टोपली दिव्या॑ची, आईचे डोळे बोलती, मुली तेवत रहा सदा अशी सासरी झाले सर्व विधि मुलगी आ॑बा ग शि॑पते आईच्या मा॑डित झोपणारी काल, आ़ज पतिच्या मा॑डिवर पाय ठेवते आईच्या हातात डबा फराळाचा

काळडोह

लेखक अवलिया यांनी सोमवार, 09/08/2010 17:28 या दिवशी प्रकाशित केले.
तळ्याचं रुप फार सुरेख आहे. अलगद वा-याच्या झुळकेबरोबर डोलत असतं. कधी खट्याळपणा करत किना-याला ढुशी देत देत उठणा-या लाटा किना-यावरुन मागे परततांना आता पुरे असे म्हणुन मागे हटणा-या मैत्रिणीची आठवण करुन देतात. कोणती आठवण कधी येईल याचा काही नेम नसतो. तळ्यातला मासा पकडणारा ससाणा कसा ऐनवेळी सूर मारुन मासा पकडतो हे आजवर मला कळले नाही. ते कळले तर कदाचित मनात अचानक येणारा विचार कुठुन पटकन येतो हे कोडे पण सुटेल. पण कोडे सुटणार नाही हे नक्की. का ते माहित नाही, पण आयुष्याची मजा कमी होउ नये असे वाटत असेल तर काही काही कोडी न सुटलेलीच चांगली असतात.

" बघ तुला माझी आठवण येते का ? "

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 09/08/2010 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
" बेधुंद कोसळण्यार्‍या पावसात " " भिजुन परतल्यावर " " आरशासमोर ओलेचिंब " " त्वचेशी एकसंध झालेले " " कपडे बदलताना " " बघ तुला माझी आठवण येते का ? " " चिमण्या परतण्याच्या शांत सांजवेळी " " वाफाळलेल्या चहाचा " " सुंगध श्वासात शिरत असताना " " उबदार रात्रीची हलकीशी " " चाहुल लागत असताना " " बघ तुला माझी आठवण येते का ? " " किचनमध्ये काळ्या मसाल्याची " " वांग्याची भाजी बनविताना " " नाजुक चिमटीत धरुन " " मिठाचा हात फिरवताना " " तर्जनीतल्या अंगठीकडे पाहुन " " बघ तुला माझी आठवण येते का ?
काव्यरस

मैत्री आणी पंचर !! दोन जागतिक ?? समस्या

लेखक सुहास.. यांनी रविवार, 08/08/2010 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
जस्ट अ जोक .एन.ओ.एम !! बिडी अर्थातच बिनधास्त डिसक्लेमर : खालील सर्व व्यक्तींविषयी मला आदर आहे आणी त्यांचाविषयी बोलण्याचा आदरयुक्त मनमोकळेपणाही ..कोणालाही अनादर झाल्यासारखे वाटल्यास मला सेंटर-फ्रेश खाण्यास काही ही हरकत नाही प्रत्येक लेखाआधी थोडेशी प्रस्तावना असावी असे माझे ,शिरीष कणेकरांचे आणी छोटा डॉनचे खाजगी मत आहे..तशी माझी बरीचशी खाजगी मते आहेत आणी त्या मतांशी मी ईमान राखुन आहे ,पण जेव्हा बाटलीतली दारु माझ्या मेंदुशी ईमान राखते तेव्हा माझी खाजगी मते सार्वजनीक होतात. ही व्यथा माझ्या एकट्याची नाही तर जवळपास सर्वांची आहे ...आता काही दिवसांपुर्वीचीच गोष्ट .. परिकथेतील राजकुमार..

स्वप्नधुंद

लेखक अर्धवट यांनी शनिवार, 07/08/2010 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल कोपरयात दडलेले काहीबाही... नकळत वर येते, जाणवतही नाही... खळखळून हसणं, जागवलेल्या रात्री, उबदार गप्पा.. आणि बोलून बोलून लागलेली भूक. कधीतरी कशाचातरी धरलेला राग.... मनाच्या कोपऱ्यातला इवलासा वण... मीच बरोबर होतो तेव्हा... हेका अजून ... मलाच नाही पटत.., तरी खोटा प्रयत्न. निसटून गेले क्षण, एका बेसावध क्षणी... उरतो आता केवडा, आणि चुकार एखादा मणी... आतून आतून येते हाक, मोहरता सुगंध... गंधांच्या शय्येवर, रात्र स्वप्नधुंद.. टीप - मुक्तक लिहिताना ते थोडं कवितेच्या आकृतीबंधात गेलय खरं. पण मुक्तक लिहित होतो म्हणुन या विभागात टाकतोय, समजुन घ्या

पॅलेस, कोर्टकेस, सुवर्णमोहोरा आणि मी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 07/08/2010 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
"आल्या का गं मॅडम?'' कोर्टरूमच्या आतून माझ्या मैत्रिणीने खुणेनेच विचारलं. माझी मुंडी तिसर्‍यांदा नकारार्थी हालताना बघून तिने चेहरा वाकडा केला आणि कोर्टरूमच्या पुढील बाजूची तिची खड्या पारशाची पोझ घेत पुन्हा एकदा आमच्या दाव्याचा क्रमांक साधारण कधी, किती वाजता येईल याची तेथील लिपिकास विचारणा करू लागली. वेळ दुपारची. दिवस पावसाळ्याचे. कोर्टाच्या ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या कोर्टरूम्समध्ये ओलसर दमट हवेबरोबर पावसाळी आभाळामुळे आज जरा जास्तच अंधार दाटला होता. मधूनच सतावणार्‍या, गुणगुणणार्‍या माशांना संथ लयीत गरगरणारे पंखे अजिबात उडवून लावू न शकल्याने त्या मला आजही नेहमीसारख्याच छळत होत्या.