Skip to main content

मुक्तक

किती वेळ

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी सोमवार, 21/03/2011 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीच्या बंद तावदाना आडून अविरत कोसळणारा मुका पावूस बघतेय…किती वेळ. त्याने काचेला फासलेल धुकं रानाचा हिरवा रंग अजूनच गडद करतंय आणि विजेसारखे धारदार त्याचे शिंतोडे ठोठावतायत दार माझ्या जाणिवांच…किती वेळ कान बंद करून पावसालाच मुका ठरवायची सवय कधी लागली कोण जाणे? धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे? भिजून भिजून खंगलेल्या या दमट कोंदट खोलीत बसून हाच विचार करतेय…किती वेळ.
काव्यरस

आज नव्याने

लेखक विश्वेश यांनी सोमवार, 21/03/2011 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी झालो सज्ज रचाया तुझ्यावर नवीन सुरेल गाणी उघडली पुरचुंडी अन, काढल्या जुन्या आठवणी जुनेच सूर जुनेच तराणे ... लिहितो मी शब्द नवे जुनाच पूर जुनेच बहाणे ... वाहतो मी तुझ्या सवे मुद्दाम झालो पूर्णपणे रिते ... आता टाकली ती कात लिहायचो पूर्वी प्रेम गीते ... आता टाकली ती जात कवितेमधून दिसती आता ... काही उरले ओले क्षण दिसते तगमग उरातली अन ... दिसते थरथरले मन फिरून नव्याने विणतो आहे तीच जुनी मी जाळी आज पुन्हा नव्याने शिवली मी माझी फाटकी झोळी आज पुन्हा नव्याने केली मी जुन्या गीतांची होळी

चतुर सरदार.

लेखक utkarsh shah यांनी शुक्रवार, 18/03/2011 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
एक सरदार रोज भारत पाक सिमा ओलांडुन स्मगलिंग (तस्करी)करत असल्याची खबर पाकिस्तानी पोलिसाला कळते.सरदार रोज आपल्या मोटारसायकलवरुन १ पोते भरुन माती घेउन जात असतो.पोलिसाला दाट संशय येतो कि त्या पोत्यातच काहीतरी गडबड असणार, तो खुश होतो.मग पोलिस सरदारच्या मागावार राहुन त्याला चेकनाक्यावर अडवतो.

नेहमीचीच संध्याकाळ

लेखक अन्या दातार यांनी शुक्रवार, 18/03/2011 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे ५.३० वाजतात. सगळेच पीसी बंद करुन उठतात. वर्गात काही लोक सोडून कुणालाच बसायची इच्छा नसते; तरीपण लॅब मध्ये काहीतरी काम करतोय असे मॅडमना दाखवावे लागते. त्याला पर्याय नाही. प्रत्येक शुक्रवारचा हाच दिनक्रम! मॅडमचा शाब्दिक मार, धमक्या सहन होत नाहीयेत, खर्‍या करुन दाखवल्या तर धडगत नाही. त्यातच मंगळवारच्या सेमिनारचे टेंशन. एक ना दोन, हजार लचांडे मागे लावून प्रोफेसर लोक मात्र निवांत चहा आणि सिगरेट प्यायला शहीद भवनात किंवा टिक्कावर! सायकली काढून सगळेच टांग टाकून हॉस्टेलकडे. गप्पा नेहमीच्याच; मॅडमच्या कॉमेंट्स आणि पुढच्या आठवड्यात करायच्या असाईनमेंट्स. काय करायचे, कोणी करायचे याचा थांग नसतो.

एक संध्याकाळ

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 18/03/2011 07:30 या दिवशी प्रकाशित केले.
४ वाजतात. मी पीसी बंद करून उठतो, ऑफिस मधल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. अरे हा आज इतक्या लवकर कलटी? मी त्या नजरा जाणीवपूर्वक टाळतो.आज मनस्थितीच विचित्र असते, त्यात अजून बसून काम करणं मला तरी निदान शक्य नसतं . कामाचं टेन्शन झेपत नाहीये कि बाकीच्या टेन्शन मुळे काम झेपत नाहीये , काहीच कळत नाहीये. खाली येतो आणि बाहेर चालू लागतो, बाहेर भन्नाट हवा सुटलेली असते, पण सगळे उष्ण वारे , हम्म उन्हाळा सुरु झाला तर मी स्वतःशीच पुटपुटतो. आज चालत जाऊया नाहीतरी लवकर निघालो आहे.

आत्ममग्न

लेखक चित्रा यांनी बुधवार, 16/03/2011 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियकरामागून जातेस नीऑन रंगांच्या दरवाज्यातून बेदरकारपणे - होतेस स्वार - गार वार्‍यावर, मागे उडणारी रंगीत वस्त्रे सावरण्याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? * एकटीच असतेस पांढर्‍या गजांच्या खिडकीसमोर निर्विकारपणे - शहारतेस - गार वार्‍याने, पारदर्शक वस्त्रांतून काटकुळे अंग दिसू नये याची शुद्ध नाही तुला कोणी बघितले, तरी तुला काय त्याचे? *
काव्यरस

माउली

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 14/03/2011 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
माउली अपरिचित बंधुत्व त्या दोघांचे अनाकलनीय खेळ त्या नियतीचे अपरंपार हाल मात्र त्या माउलीचे भय दाटे हृदयी त्या अंतिम युद्धाचे ते दोघे आज सामोरे ठाकले मातेचे काळीज विद्ध जाहले एकाच हृदयीचे दोन ठोके 'चुकले' अन् जन्माचे वैरी जाहले एक अंश त्या अविनाशी तेजाचा दुजा तो प्राणसखा त्या मनमोहनाचा सुदैवी मातेवर कैसा फेरा हा दुर्दैवाचा आपल्याच पिल्लांमध्ये डावे-उजवे करण्याचा तेज:पुंज कवचकुंडलांचा धनी तो सदा सोसतो अपमानांचे आघात तो कौन्तेय असूनही जगाला राधेय तो राधेच्या सौभाग्याचा कुंतीला हेवा वाटतो तरीही जपले अन् साधले दुज्याचेच हित तिने मागितले दुज्यासाठीच अभयदान तिने ठरवले खुशाल दोषी तिल
काव्यरस

फुकट ते पौष्टिक?

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 14/03/2011 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
"सर, यू हॅव बीन सिलेक्‍टेड फॉर ए फ्री गिफ्ट व्हावचर...' लाडिक आवाजातल्या एका "तरुणाचा' दोन दिवसांपूर्वी फोन आला होता. सहसा अशा फोनना काय उत्तर द्यायचं, त्याला आता मी सरावलोय. पण इथे जरा माझ्या इंटरेस्टचा विषय होता. चकटफु पर्यटनाचा. "क्‍लब महिंद्रा'कडून हा फोन होता. त्यासाठी आम्हा दोघांना जोडीनं त्यांच्या हापिसात गिफ्ट व्हावचरचा आहेर साकारण्यासाठी जायचं होतं. रविवारचा दिवस ठरला. दुपारी साडेबाराला बोलावलं होतं, बाणेर रोडवर दुपारच्या उन्हात बोंबलत तो पत्ता शोधेपर्यंत एक वाजला. एक तासाचं प्रेझेंटेशन ऐकावं लागणार, ते कुठल्या तरी मेंबरशिपची गळ घालणार, कशात तरी अडकवण्यासाठी भुलवणार, सगळं ठाऊक होतं.