Skip to main content

मुक्तक

मैत्रीचे गणित -

लेखक विदेश यांनी रविवार, 13/02/2011 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीमधे वजाबाकी दोषांची करावी मैत्रीमधे बेरीज ती गुणांची करावी मैत्रीत हवा गुणाकार मैत्रीत नको भागाकार मैत्रीच्या गणितांमधे शून्याला नकोच आधार ! खेळता खेळता आकड्यांनी मैत्रीचे धागे विणावे विणता विणता धाग्यांनी जाळे सुंदरसे बनवावे मैत्रीच्या जाळ्यात खूप खूप गुरफटावे मैत्रीचे नंतर गणित आयुष्यात ना सुटावे !!
काव्यरस

निरोप - तंबुला जसा दिसला!

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 13/02/2011 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिमाखात उभा होता- हजारो राहुट्यांच्या मध्यभागी आपला धवल रेशमी अंगरखा फ़डफ़डवित. तुफ़ानांपासून खाविंदांना महफ़ूस ठेवित. खणखणीत आवाजात जणू निसर्गाला बजावित- खबरदार! खाविंद आराम फ़र्मा रहे है. त्यांना परेशान करण्याची गुस्ताखी करू नका. मुद्दाम ठेंगण्या बनवलेल्या दारात, रेशमी कनातींवरची फ़ारसी नक्षीदार अक्षरे आत शिरणाऱ्या कनिजांना आगाह करीत होती- मान तुकवून कुर्निसात करीत खानबहाद्दूरांना सामोरे जा. माथ्यावर लहरणारे हिरवेगार निशाण उंच मानेने बयां करीत होते- अल्लाह परवरदिगारची मर्जी ह्या तंबूच्या मालकावर आहे.

आमंत्रण - सोमवार संध्याकाळी खादाडिचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 11/02/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन सगळ्यांनी एकत्र जेवायला जावं असा विचार मनात होता, मागच्या सोमवारी मला श्री. स्पा यांच्या पंगतीचा लाभ झालाच होता तसंच श्री. वल्लींबरोबर ही खादाडी चर्चा चालुच होती,म्हणुन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं हे खुलं आमंत्रण. कार्यक्रम फक्त जेवणाचा आहे, - हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे. दिनांक - १४ फेब्रुवारी २०११. वेळ - संध्याकाळी ०७.१५. जे येणार असतील, त्यांनी नुसतं इथे प्रतिसादात हो म्हणुन चालणार नाही, नंतर व्यनिने कळवावे अगदी मोबाईल नंबर सहित.

प्रवास...

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 10/02/2011 13:51 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दमलोय आता.. खूप लांबपर्यंत आल्याची जाणीव होतेय... माहिती आहे कि अजून काहीच प्रवास झलेला नाही... पण ह्या क्षणी खूप दमलोय. स्वतःला झोकून दिलेलं होतं ह्या गर्दीच्या प्रवाहात, कधी मी चाललो तर कधी ह्या गर्दीने मला चालवलं. आता थांबावसं वाटतंय. लांबपर्यंत कधी आलो कळलंच नाही मला. काल हातातून रेती सुटते तसा सुटत गेला आयुष्यातून. जबाबदारीचे ओझे खांद्यावर वागून दमलोय आता. हे ओझ खरच मला उचलायचा होतं का मीच ते उचललं हे सुद्धा समजत नाही.

फक्त मिसळपावमुळे

लेखक अनिल आपटे यांनी गुरुवार, 10/02/2011 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
फक्त मिसळपावमुळे आम्हाला लिहायला उत्साह येतो आम्हाला नवीन माहिती मिळते आम्ही निसर्गाची विविध रूपे पाहतो एकमेकांच्या आनंदात सहभागी होतो फक्त मिसळपावमुळेच अनिल आपटे

गद्य सूर्य प्रार्थना

लेखक शुचि यांनी मंगळवार, 08/02/2011 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
जयाच्या रथा एकची चक्र पाहीं। नसे भूमी आकाश आधार काहीं। असे सारथी पांगुळा ज्या रथासी। नमस्कार त्या सूर्यनारायणासी।।1।।
हे प्रभाकरा मी सूर्यफूल नाही जे की पराकोटीच्या भक्तीने आपले गोजीरवाणे मुख तुझ्याकडे करून तुझे दर्शन घेते. हे कमलिनीनाथा मी कोमल कमलिनीदेखील नाही जी की तू उगवताक्षणी पाकळ्यारूपी बाहू फैलावून सस्मितवदनाने तुझे स्वागत करते. हे हिरण्यगर्भा मी इवलीशी पणती नाही जी तुझ्याकडुनच तेजाचा अंश घेऊन जगाला तेजाचा संदेश देते. हे दिनकरा किंवा मी कोणी ऋषीमुनीदेखील नाही की तुला मी अर्घ्य देऊ शकेन. हे तेजोनिधये फार काय माझे आणि तुझे विपरीत भक्तीचे नातेसु

वाटंतं....

लेखक अज्ञात यांनी रविवार, 06/02/2011 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्यारात्री गवताच्या पात्यावरच्या दवाबिंदुला फुंकर मारून त्या ओघळणार्या मोत्यांना पाहताना... वार्याच्या खोड्यांमुळे नदीच्या हलणाऱ्या चंदेरी पदराला पाहून... पहाटेच्या गार वार्यात कासेला बिलगून पच पच आवाज करून दुध पिताना वासराला पाहून... मंदिराच्या धुपाने भरलेल्या गाभार्यात घंटानादात मंद तेवणाऱ्या सामायीला पाहून... सांजवेळी वाळूत हळुवारपणे पावलांना शिवून परत मागे पळून जाणार्या अल्लड लाटांना पाहून... एखाद्या तेजोवालायाधारी तपास्वीसारखा स्वतःच्या द्वैताची आहुती देऊन अद्वैत दिनकरला सागरात विलीन होताना साक्ष देताना... वाटतं आयुष्य इथेच थांबावं...
काव्यरस