Skip to main content

मुक्तक

मी एक मिडल क्लास ...............

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 15/04/2011 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी एक मिडल क्लास ............... सकाळी साडे सहाचा गजर वाजतो तो मी चरफडत बंद करून टाकतो चला ऑफिसला जायचे (च )म्हणून रडत - खडत साडेसातला उठतो मला झालेली असते आंघोळीची घाई त्यात पेपरला न्यूज असते आज तुमच्या एरियाला टिंब टिंब कारणामुळे पाणीपुरवठा नाही कसेबसे ४ मग्गे घेऊन स्नान करावे कुठ राहिला फेस ,अन साबण तर टॉवेलाने पुसावे ..... कॉर्न फ्लेक्स रोजची चैन , आपल्याला परवडत नाही , रोजचचे

कृष्ण

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 15/04/2011 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण - १ कधी कधी वाटते...... कृष्ण होण्यापेक्षा राधा व्हावे...... पहाटेच्या चांद्रवैभवाचे रुपेरी चांद्रकण गाळणार्‍या कदंब वृक्षाखाली.......... सुंदर मोरपिसांच्या........ मोठ्या मोठ्या डोळ्यांची नक्षी असलेली..... उदात्त युगांतीत प्रेमाची भरजरी शाल पांघरावी.... म्हणजे मग..... द्रौपदीच्या अब्रूचे धिंडवडे निघतांना....... साध्या सुती साडीच्या दोन हात..... तुकड्याची चिंता करण्याची गरज उरत नाही....... कृष्ण - २ पण मग नंतर वाटते...... राधा होण्यापेक्षाही मीरा व्हावे......... कृ

पुनर्जन्म

लेखक ajay wankhede यांनी गुरुवार, 14/04/2011 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
हजारो वर्षापासुन पडुन होतो.. डोंगराच्या पायथ्याशि दगड बनून. कुठुन अचानक आज एक शिल्पकार आला... त्याचा हात लागताच माझा पुनर्जन्म झाला. मनाचे सारेच बन्द कप्पे अलगत उघडत गेलेत.. जिवनाच्या कवितेला स्फुरण चढत गेले. हजारो वर्षापासुन ओसाड वाटणारा निसर्ग .. आज धुन्द करु लागला. वसन्त,शरद्,ग्रिश्म्,श्रावण सारेच ऋतु .. मनाला भावू लागलेत. सुर्य, चन्द्र जणु माझे डोळे झालेत... आता तर क्षितिजा पलिकडिल जग हि दिसु लागले. आता मि जगणार धुन्द्,मधहोश.. कारण आता माझा पुनर्जन्म झाला.

पहिला पाऊस..

लेखक वैशाली . यांनी मंगळवार, 12/04/2011 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज ह्या वर्षाचा तुला भेटल्या-नंतरचा पहिला पाऊस.. बघना कसा छळतो.. तुझी आठवण ह्या मनात मेघांसारखी दाटून आणतो.. तुझी सोबत सुटल्याच्या वास्तविकतेला, डोळ्यातून पाणी म्हणून बरसण्यास भाग पाडतो.. मग मीही साथ देते त्याला.. मी अन तो पाऊस.. आता एकत्र बरसतो.. अन सोबतीला... तुझी आठवण !! उगीच काही थेंब तो शिंपडतो माझ्यावर.. जणू तुझ्याच स्पर्शाची ती जाणीव.. मोहरते मी.. कधी नुसतीच बहरते.. तुझ्या स्वाधीन व्हायला तयार.. सर्वस्वी.. नाही.. तुझ्या आठवणींच्याच म्हण की .. तू नसतोस..

सांगे वडिलांची किर्ती.....

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे घराणे सरदार घराणे. अस्सल. भेसळ? ह्या. चालणारच नाही महाराजा.एकदम खानदानी. पेटारेच्या पेटारे भरुन सोने होते. मोठ्ठं कुळ. जिकडे नजर जाईल तिकडे जमीन आमचीच. आणि घरचे लोक तर काय एकाहून एक हुस्शार... सगळीकडे आमचाच बोलबाला होता. दुध दुभते भरपूर. आमच्या शौर्याच्या, पराक्रमाच्या, बुद्धीमत्तेच्या गाथा सांगितल्या जात एकेकाळी..... पण म्हणतात ना.... साली दृष्ट लागली हो सगळ्याला. सग्गळं सग्गळं गेलं. चोरांनी लुटलं, ठगांनी फसवलं, काही अजाणतेपणी गेलं अन काही जाणतेपणी. आता आमचे लोक करतात चाकरी कुणाच्या हाताखाली. कुणाचा व्यवसाय गोळ्याबिस्किटांचा. कुणाचा फ्लॅट आहे शहरात दोन बेडरूमचा.

काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 12/04/2011 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
बंद ओठ बंद कान मनही बंद का हो? न्याय मिळेल का येथे एक जीव किंचाळत आहे सहनशिलतेचा येथे आज संग्राम आहे समाजात माथेफिरुंचाच सरंजाम आहे गवताची पाती सजली या भयाण राती काजव्यांचा जणू सूर्यास शाप आहे का लढवय्या आता बदनाम होत आहे पाठीत खंजीर खुपसणार्‍यांचा धाक आहे यल्गाराचा आता दबला आवाज येथे खोट्यांचाच येथे चित्कार आहे ------ शब्दमेघ

वावर

लेखक पेशवा यांनी मंगळवार, 12/04/2011 05:55 या दिवशी प्रकाशित केले.
असे पुरुष, पहिल्यांदा मेहेंदीने सजलेले हात आणतात तेव्हा बराच काळ ठेवतात त्यांना सजवलेल्या मखरातून असूयेने बघणाऱ्या नजरांचा काउंटर जितका जास्त तितकी असते त्यांची अभिमानाची लिंग-कॉलर ताठ असे पुरुष, शिकवलेले असते त्यांना लहानपणापासून पाहिलेले असते त्यांनी, काका, मामा आणि बापाला सफाईदारपणे आणलेले हात वापरताना... साला ते चुकत नाहीत शेंडीला गाठ मारून घोकतात सगळ्या ऋचा घेतात कानमंत्र बापच्या मांडीवर
काव्यरस

प्रेम करायचे राहून गेले...

लेखक बन्या बापु यांनी सोमवार, 11/04/2011 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
काळ काम वेगाचा गणित सोडवताना हिशोब वयाचे राहून गेले, घर बांधता बांधता घरपण मागे राहून गेले. मनात कितीही योजिले होते तुझ्यासाठी, भरभरून ते सगळे तुला द्यायचे राहून गेले. कधीतरी एकांत वेळी आता आठवत काय ते, करूया करूया म्हणत प्रेम तुझ्यावर करायचे राहून गेले. सरणावर आता पसरुनी, मना एकच वाटते, प्याले दोन डोळ्याचे, रिते करायचे राहिले.

ठकू आणि लच्छी!

लेखक नीधप यांनी शनिवार, 09/04/2011 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
माझाच एक जुना लेख टाकतेय इथे. ------------------------------------------------ एकदाची ठकू लिहायला बसली तिनं ठरवलं आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीवर, नाचर्‍या लच्छीवर लिहायचं. ठकू लिहायला बसली आणि लच्छी काही नाचून दाखवायला तयार नाही. कंटाळून ठकी तिथून उठायला लागली आणि लच्छी समोर येऊन बसली. "अशी कशी गं तू? लच्छी सापडायची तर लच्छी बनायला नको? ये चल टाक पावलं माझ्याबरोबर.." ठकूचा हात धरून लच्छी घेऊन गेली. ही लच्छी आहे पु. शि. रेग्यांच्या 'सावित्री' मधे, त्यातल्या एका गोष्टीत. लच्छी आणि मोराच्या गोष्टीत.