Skip to main content

किती वेळ

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी सोमवार, 21/03/2011 या दिवशी प्रकाशित केले.
खिडकीच्या बंद तावदाना आडून अविरत कोसळणारा मुका पावूस बघतेय…किती वेळ. त्याने काचेला फासलेल धुकं रानाचा हिरवा रंग अजूनच गडद करतंय आणि विजेसारखे धारदार त्याचे शिंतोडे ठोठावतायत दार माझ्या जाणिवांच…किती वेळ कान बंद करून पावसालाच मुका ठरवायची सवय कधी लागली कोण जाणे? धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे? भिजून भिजून खंगलेल्या या दमट कोंदट खोलीत बसून हाच विचार करतेय…किती वेळ.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2621
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

खल्लास!! धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे? हे फार फार आवडलं. :) जियो!!

धुक्याआडची त्याची गडद गडद होत जाणारी जखम अजून किती वर्ष हिरवीच राहणार कोण जाणे? भिजून भिजून खंगलेल्या या दमट कोंदट खोलीत बसून हाच विचार करतेय…किती वेळ. ह्या चर ओळीतर फारच छान आहेत.... आवडली.....कविता.... जमल्यास माझी देखील कविता वचुन पाहा आवडले का ते.... (प्रेम म्हणजे नक्की काय असतं ?....) जमल्यास तुमच ह्या बद्दलच मर देखील नोंदवा...

संपलो...

अप्रतिम यार.. पुन्हा एकापेक्षा एक ताकदवान क्रिएशन्स यायला लागल्या आहेत तुझ्याकडून.. आनंद वाटतोय. फारच खास.

कविता आवडली. हिरव्या जखमा!

ही कविता वाचायची राहून गेली. धनंजयने उल्लेख केल्यामुळे ती उणीव भरून निघाली. पावसाला मुकं करून खंगत जाणाऱ्या खोलीतून त्याच्या हिरव्या जखमा बघायच्या.... अशाच शक्तिवान कविता अजून येऊदेत.