Skip to main content

मुक्तक

दोन चारोळ्या -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 19/07/2011 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
"प्रेम" मी डाफरता तू शांत रहावे तू ओरडता मी गप्प बसावे- मौनातच नजरांनी हसावे बहुधा हेच ते 'प्रेम' असावे ! "बदला" काल कावळा दारी 'काव'ला

निरोप नाही, फक्त आभार!

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 15/07/2011 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच्या बाँबस्फोटासह नुकत्याच घडून गेलेल्या क्लेशदायक घटना ऐकल्या; अगतिक, हताश व्हावं अशा जळजळीत कविता वाचल्या, लेख आणि प्रतिसाद वाचले, आणि परदेशात नेहेमीच वाटणारी असहाय्यता उफाळून आली. पण वाईटातून चांगलंही काही घडतं आहे हे दर्शवणार्‍या काही गोष्टी नजरेला पडल्या. व्यवस्थेतली केवळ छिद्रंच शोधण्यापेक्षा काही आशादायक कणही गोळा करावे, आणि त्या कणांचं जाणीवपूर्वक हव्या त्या ठेव्यात रुपांतर करावं अशी शिकवण देणारे माझे आजोबा आठवले.

तो आणि ती

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/07/2011 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
तो काहीसा अबोल विषेशतः हळव्या विषयांवर ती बडबड करणारी विषेशतः हळव्या विषयांवर तो 'दील और दिमाग़ से' आयुष्याबद्दल व्यवहारी आणि प्रॅक्टिकल असणारा ती फक्त 'दील से' आयुष्याकडे बघत जगण्यात दंग असणारी तो कलासक्त, आस्वादी, बंधने झुगारुन काहीसा बेधुंद, आसक्तीने आयुष्य जगणारा ती नातेवाइक, मुले, समाज...

कोंबडा आरवतो -

लेखक विदेश यांनी रविवार, 03/07/2011 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
कोंबडा आरवतो कुकूऽऽच कूऽक ऊठ बाळा आता झोप झाली खूऽप |१| कावळा करतो काव काव काव हास बाळा आता आईला बोलाव |२| चिमणीची चाले चिव चिव चिव सरकत बाळा आता बाबांना शिव |३| मोत्या भुंकतो भो भो भो बाळ आलं रांगत बाजूला हो |४| पोपट बोलतो मिट्टूऽऽमिया दुडुदुडु बाळ चाले बघायला या |५| मनीमाऊ म्हणते म्याऊ म्याऊ बाळाच्या गंमती बघायला जाऊ |६|

हायकू -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 28/06/2011 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
आकाशी पक्षी उडतात मजेत शिकारी खिन्न हाती लपली चार फुले चाफ्याची शीळ वाऱ्याची निजरूपाचे कुतूहल बाळाचे आरसा खूष पुढे दगड पडलेले रग्गड मी का शहाणा उत्सुक डोळे पिंडापाशी कावळे मोकळा आत्मा

विहीर

लेखक आपला अभिजित यांनी शुक्रवार, 17/06/2011 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
परसदारातल्या विहिरीचं आकर्षण किंवा अप्रूप अजिबात नव्हतं. आपलं बालपण हे किती अमूल्य आणि अविस्मरणीय आहे, हे कळण्याचं ते वय नव्हतं. घराच्या मागच्या अंगणाला लागूनच विहीर होती. आजही आहे. माझ्या बालपणी पंप, नळ वगैरे आधुनिक सेवांचा आम्हाला गंधही नव्हता. रोज विहिरीवरून पाणी भरायला लागायचं. अंगणातल्या माडांना आणि फुलझाडांना विहिरीचंच पाणी काढून घालावं लागायचं. आजोबा या कामात एकदम पुढे असायचे. आम्हाला कळायला आणि झेपायला लागल्यापासून आम्हीही मग त्यांना मदत करायचो. मला आठवतंय, तेव्हापासून विहिरीचं पाणी काढायला दोन रहाट होते. त्याआधी त्यांच्या मध्ये एक तिसरा रहाटही होता, अशी आख्यायिका ऐकायला मिळायची.

धमाल मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक इंटरनेटस्नेही यांनी गुरुवार, 16/06/2011 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव खरडसम्राट, आमचे निकटचे स्नेही व आपल्या सर्वांचे लाडके मिपाकर धमाल मुलगा, श्री. कैवल्य देशमुख यांचा आज, १६ जुन हा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या खरडवहीला असेच उधाण येत राहो, व त्यांनी आपल्या जालीय व जालाबाहेरील आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे सर करावीत, हिच श्री गणेशाचरणी प्रार्थना. :) हॅपी बर्थडे धमाल, कीप रॉकिंग! :)