रस्ते डांबरी
जाहिरात सामोरी...
... गाडी खड्ड्यात !
लाल सिग्नल
वाहतूक सुसाट -
मोक्षाची वाट !
एक ते चार
दुकानदारी गार
- बाणा मराठी !
देव आमचा
बगीचा शेजाऱ्याचा
... त्रस्त कुंपण
सख्खे शेजारी
' केरा ' तून वैरात -
' खांदा ' वांध्यात !
ररा, प्लीज, मला यातले हायकू काय आहेत ते समजावून सांगा ना जरा. मला हायकू कळत नाहीत. पण इथं या तीनोळीत काही तरी कमेंट केली आहे जी मला आवडली. ती हायकू कशी आहे तेवढं समजलं तर, माझा आनंद द्विगुणित होईल. तेवढं पुण्य गाठीला बांधता येईल तुम्हालाही.
आता मी काय डोंबलं समजावणार तुम्हाला. हे म्हणजे 'ना*ड्याशेजारी उघडं गेलं आणि...' तसं व्हायचं. जालावरच्या कविता वाचून आपली कविता वाचण्याची इच्छाच संपली आहे. मुळात कविता कशाला म्हणायचं याबाबतच डोस्क्यात लै गोंधळ निर्माण झालाय आता. बुद्धिभेद का काय म्हणतात तो झालाय म्हणाना.
आणि 'हायकू' हा शब्द 'बायकू' शब्दाच्या समोच्चारी असल्याने धसक्याने आपण लांबच आहोत त्यापासून. तसेही अन्य भाषेतून, भौगोलिक स्थितीतून मराठीत आले की त्या काव्यप्रकारांची 'कोंबडीचं भरीत*' अशी अवस्था होते. गजलेचे तेच नि हायकूचेही तेच. असो. आज एवढी शिकवणी पुरे. घरचा अभ्यास म्हणून शिरीष पैंच्या हायकू वाचून त्यांचे रसग्रहण लिहून आणा उद्या.
(*प्रताधिकार आमच्या नावे रेजिस्टर्ड आहे.)
विदेश यांच्या हायकूमध्ये आणि जपानी (तसेच बहुतेक इंग्रजी) हायकूंमध्ये हे साम्य आहे :
५ अक्षरे
७ अक्षरे
५ अक्षरे
(जपानीमध्ये "अक्षरे" नसून "मात्रा" असतात.)
विदेश यांच्या हायकूंमध्ये तीनपैकी दोन ओळींमध्ये बहुतेक अंत्ययमक असते. हे त्यांचे शैलीवैशिष्ट्य आहे. (अन्य हायकूंमध्ये असा काही नियम नाही.)
विदेश यांच्या हायकूत पहिल्या दोन ओळींत एक कथानक असते, आणि तिसर्या ओळीत त्यावर भाष्य असते. (अन्य हायकूंमध्ये असा काही नियम नाही.)
विदेश यांना हायकूमध्ये सूचकतेपेक्षा शब्दांनी थेट अर्थच सांगणे आवडते. पारंपरिक हायकूंपेक्षा ही विपरित रीत आहे. विदेश यांचा नाविन्याचा आविष्कार आहे.
खि..खि..खि एक ते
विषय: दिलेला नाही.
देव आमचा बगीचा शेजाऱ्याचा ...
पुणेरी हाय्कू करताय
भारी! आवडेश एकदम पुलेशु
+१
आवडल्या गेले आहे.
??
+१
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
प्लीज
In reply to +१ by रमताराम
धागे टूकार प्रतिक्रिया
In reply to प्लीज by श्रावण मोडक
:)
In reply to धागे टूकार प्रतिक्रिया by परिकथेतील राजकुमार
वाह वाह !!
In reply to धागे टूकार प्रतिक्रिया by परिकथेतील राजकुमार
एकाचं लग्न दुसय्राची
In reply to धागे टूकार प्रतिक्रिया by परिकथेतील राजकुमार
_/\_
In reply to धागे टूकार प्रतिक्रिया by परिकथेतील राजकुमार
असो ...
In reply to धागे टूकार प्रतिक्रिया by परिकथेतील राजकुमार
_/\__/\_
In reply to धागे टूकार प्रतिक्रिया by परिकथेतील राजकुमार
प्रकाटाआ
In reply to प्लीज by श्रावण मोडक
श्रामो
In reply to प्लीज by श्रावण मोडक
बास, बास...
In reply to श्रामो by रमताराम
विदेश यांच्या हायकूंची बांधणी
In reply to प्लीज by श्रावण मोडक
एक ते चार दुकानदारी गार -
+१
In reply to एक ते चार दुकानदारी गार - by सख्या