Skip to main content

मुक्तक

कोजागिरी पौर्णिमा

लेखक भक्ति यांनी शुक्रवार, 14/10/2011 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
"को जागर्ति ... को जागर्ति ??" असे विचारत येणाऱ्या लक्ष्मीची पाऊले हलकेच आभाळभर रेखून जातात चांदण्यांची नक्षी... अन काळोख भरल्या मनाला एक नवीन उमेद ... नव्या स्वप्नाची.. नव्या दिवसाची ..नव्या वर्षाच्या समृद्ध भविष्याची ...

मनाच्या खोल गाभार्‍यात

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी गुरुवार, 29/09/2011 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल गाभार्‍यात गर्भरेशमी भरजरी वातींच्या सुवर्णदिपांची एक माळ जळतेय . त्या चांद्ररुपेरी प्रकाशाची धग देहाच्या सर्व गात्रातून गरगरतेय . काही तुझ्यातील माझ्या स्मरणांच्या अन् काही माझ्यातील तुझ्या स्मरणांच्या या वाती . . या धगधगणार्‍या वातींवर निळ्या सुरमयी वार्‍याचा सणसणता आघात . विद्ध मनाच्या दग्ध उंबरठ्यावर एक अवघडलेला पाऊस उरलाय . सरता सरता ह्या पावसाने फक्त दोन वाती जळत्या ठेवल्यात . . जळता जळता जाळणा-या जाळता जाळता जळणा-या . मनाच्या खोल गाभा-यात खोल खोल खूप आत दिपांची तमा न बाळगता तमाशी झगडणार्‍या ओंजळभर तेलाची लाज राखण्यास . मनाच्या खोल गाभा-यात गर्भरेशमी भरजरी या वाती |- मिसळ
काव्यरस