Skip to main content

मुक्तक

अंधार

लेखक ढब्बू पैसा यांनी गुरुवार, 29/09/2011 00:55 या दिवशी प्रकाशित केले.
खूपशा अंधार्‍या रात्री आणि दिवस सरत चालले आहेत. जीवघेणा अंधार व्यापून रहावा सगळीकडे असं वातावरण. प्रकाशाला घुसमट व्हावी आत शिरताना असे काळोखे कोपरे. जिथे मनाला जखम झाली ना तरी जखमेतून बाहेर पडतो आरक्त अंधार. हळू हळू नशा चढत जाते अंधाराची. उजेड धडका देत राहतो दाराखिडक्यांवर. एखाद्या चुकार फटीतून आलाच उजेड आत अंधाराशी लढाई जिंकून तरी मी सज्ज असतेच गडद काळं ठिगळ घेऊन. फटीला खिळा मारला की मग तगमग कमी होते. मग मी अशीच ठिगळं लावत फिरते घरभर, उजेडाची प्रत्येक शक्यता बंद करत. अंधार धमन्यांमधे वाहतो. श्वास उच्छवास अंधाराचेच होतात आणि मग मनातला सैतान छद्मीपणे हसत राहतो माझ्या धडपडीवर.

मोबाईल फंडे आणं मोठं मोठे गंडे

लेखक VINODBANKHELE यांनी शुक्रवार, 23/09/2011 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
मोबाईल आजच्या युगातला अल्लाउद्दिनाचा दिवाच जणू , अगदी लहान मुला पासून वयोवृद्ध पर्यंत प्रत्येकाच्या हातात असायलाच हवे असे नव्या युगाचे आयुध , अडी अडचणीला , वेळ प्रसंगाला नव्हे तर अगदी सदा सर्वदा हातात , खिशात पर्स मध्ये असणारा मानवाचा ट्रेड मार्कच जणू . अगदी शेतकरी राजा सुद्धा मोबाईल द्वारे आपल्या विहिरी वरची मोटार चालू आणि बंद सुद्धा करायला लागला , भिकारी एका गल्लीतून दुसर्या गल्लीतील भिकार्याची हाल हवाल विचारायला लागला ,बळी राजाला अगदी देश परदेशातला शेतमालाचा भाव ह्या मोबाईल च्या कृपेने आपल्

निदान नमस्कार तर कराल?

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 23/09/2011 04:44 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी कामावर निघण्याच्या गडबडीत नित्यकर्मे उरकत असतांना पत्नीच्या आई म्हणाल्या, "आज अविधवा नवमी आहे, निघतांना आईच्या फोटोला नमस्कार करून जा, आणि येतांना दुध-केळी आणायला विसरू नकोस." गेली ३० वर्षे पत्नीच्या आईना मीही 'आई'च म्हणतो. त्याही त्यांच्या मुली इतकंच माझ्यावर प्रेम करतात, क्वचित कधी हक्काने रागावतातही. लग्नानंतर माझ्या आईला विचारलं होतं, "मी त्यांना आई म्हणालो तर तुला चालेल का गं?", तर म्हणाली "अरे बाबा, दोन आया मिळणं याला नशीब लागतं, त्या किती प्रेम करतात ते पाहिलंय मी, मला वाईट तर नाहीच, उलट आनंदच वाटेल. फक्त तूच लक्षात ठेव, आई म्हणशील तर तसा मानही ठेव!" मी जमेल तितकं ते पाळतो.

हरकारियाचा दृष्टांत

लेखक सूड यांनी शनिवार, 17/09/2011 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
श्रोतेहो ही कथा ऐकावी । जी विक्रमा वेताळ ऐकवी। मी मूढ कीं कवि । यथामतिं वर्णिलीसे॥१॥ कथेचा राया विक्रमादित्य नायक। फिरें स्मशाने अनेकानेक। पकडूनि चेडेचेटूक। दंड त्यांसि करितसे॥२॥ उगवली अवसेचि रात। विक्रम झाला मार्गस्थ। मार्गी सापडले एक प्रेत। अग्नी द्यावया निघांला॥३॥ तंव तेथे झाला चमत्कार। प्रेती वेताळ करीं संचार। म्हणे मी आता करितो तुज ठार। आलास येथे कासयासीं॥४॥ विक्रम म्हणे तें सोपें नसे। गाठ तुझी मजसंगे पडलीसें। बघ आता तुझे हाल कैसे। करितो आता मी॥५॥ तंव वेताळ झाला सावध। भलत्या प्राण्याची पारध। करावया आलो मी मंद। समजले त्यालागी॥६॥ तो चतुरपणे बोले। यावरी एक उत्तर सापडलें। तें ऐक ऐक वहिलें। मग

पाढेपुराण

लेखक कॉमन मॅन यांनी शुक्रवार, 16/09/2011 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या ओळखीतले एक देवधर आजोबा होते. आता वारले ते बिचारे. आयुष्यभर पोष्टात कारकुनी केली; पुढे पेन्शनीत निघाले आणि काही वर्ष पेन्शन खाऊन एके दिवशी वैकुंठाला गेले. म्हणजे तसं पाहायला गेलं तर देवधर हा एक सामान्य मध्यमवर्गीय गृहस्थ. ओढाताण असली तरी तसा खाऊनपिऊन सुखी. दोन मुलांचा संसार केला. पण एक गोष्ट मात्र विशेष होती देवधर आजोबांच्यात, आणि ती म्हणजे देवधर आजोबांना पाढे पाठ होते. केवळ १ ते ३० नव्हे, तर चांगले १ ते ५००..! विश्वास नाही ना बसत? पण ती वस्तुस्थिती होती. आम्ही पोरंबाळं मग गंमतीने देवधर आजोबांची परिक्षा घ्यायचो. "आजोबा, सांगा पाहू ३५३ त्रिक किती? २५५ अठ्ठे किती?

क्षण

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 16/09/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या सांजपुजेला लावलेल्या कापूरवातीचा दरवळ अजूनही रेंगाळतोय तशी पहाट झालीये, पण कालची संध्या ती अजूनही घुटमळतेय इथे . हम्म... काल तू येऊन गेलीस. . लालकेशरी मावळतीला रेशिमधाग्यात धरून ठेवावे असा तो क्षण . काही क्षणच असे असतात आयुष्याचे दान देऊन जातात . क्षण तर सरून जातो जाता जाता त्या दानाचे ऋण ठेऊन जातो . अन् मग ते फेडता फेडता आपण क्षण क्षण मोजत राहतो वाट पाहत राहतो . क्षणाचे ऋण फेडायला आयुष्य वेचत राहतो.. नाही कां? |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१६/०९/२०११)
काव्यरस

जालरंग प्रकाशनाच्या दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवा !!!

लेखक सुहास झेले यांनी गुरुवार, 15/09/2011 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी आता आपल्याला वेध लागलेत दिवाळी अंकाचे. जालरंग प्रकाशनातर्फे आपणही दिवाळीचे स्वागत साहित्याच्या निरनिराळ्या प्रकारांनी करूया. आपण नवोदित असाल किंवा अनुभवी, आम्ही सगळ्यांना सामावून घेतो. तेव्हा चला,उठा आणि सज्ज व्हा आता. आपल्या दिवाळी अंकासाठी कोणताही एक विशिष्ट असा विषय नाहीये.

पाहूच की

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी बुधवार, 14/09/2011 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
पाण्याला आवड असून चालत नाही रंगांची अन् आरशाला प्रतिमांची . आरशाला तरी मुभा असते अंधारात डोळे मिटण्याची कवीला मात्र पाण्यासारखेच राहावे लागते अंधार असो वा उजेड नावड असो वा आवड त्याला लिहावीच लागते, हृदयातून उमटणारी ओळ . जसे पाण्याला घ्यावाच लागतो, त्यात मिसळणारा रंग . पडलाच उजेड तर दिसेलच कि जगाला पाण्याचा रंग आणि कवीची ओळ म्हणूनच मी निवांत आहे . माझ्या ओळीच्या प्रारब्धिही असेलच कि उजेड उजळेल तेव्हा पाहूच की |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (१४/०९/२०११)
काव्यरस

सचेतन

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 11/09/2011 00:24 या दिवशी प्रकाशित केले.
आज साधारण १वर्षापूर्वी माझा मावस भाऊ (वय-२४) बाइक वरुन पडून अपघाती दिवंगत झाला.असे प्रसंग अनेकांवर येतात,हे प्रसंग विसरत तर नाहीतच,पण स्वतःच्या मनाची समजुत कशी घालावी हेही कळत नाही...त्यामुळे या कवितेला सत्याचा आधार आहेच,पण त्याही पेक्षा हे अश्या प्रकारचं कटु वास्तव स्वीकारावं कसं हा प्रश्न मला छळत होता ...तो सोडवायला मला जमला की नाही?मला कळत नाही.
काव्यरस