अंधार
खूपशा अंधार्या रात्री आणि दिवस सरत चालले आहेत. जीवघेणा अंधार व्यापून रहावा सगळीकडे असं वातावरण. प्रकाशाला घुसमट व्हावी आत शिरताना असे काळोखे कोपरे. जिथे मनाला जखम झाली ना तरी जखमेतून बाहेर पडतो आरक्त अंधार.
हळू हळू नशा चढत जाते अंधाराची. उजेड धडका देत राहतो दाराखिडक्यांवर. एखाद्या चुकार फटीतून आलाच उजेड आत अंधाराशी लढाई जिंकून तरी मी सज्ज असतेच गडद काळं ठिगळ घेऊन. फटीला खिळा मारला की मग तगमग कमी होते. मग मी अशीच ठिगळं लावत फिरते घरभर, उजेडाची प्रत्येक शक्यता बंद करत.
अंधार धमन्यांमधे वाहतो. श्वास उच्छवास अंधाराचेच होतात आणि मग मनातला सैतान छद्मीपणे हसत राहतो माझ्या धडपडीवर. काळा पलंग, काळं कार्पेट आणि मी सुद्धा. मग स्वतःचंच अस्तित्व जाणवत नाही. स्वतःलाच वाटतं की आता मी नाहीच! मी कुठाय, उरलाय तो फक्त काळोख.
या अंधाराचं एक बरं असतं, सावल्या पण दिसत नाहीत. म्हणजे कुणी आहे की नाही हेच कळत नाही मग स्वत:लाच सेफ वाटतं उगाच की माझ्यापर्यंत कोणीच पोचू शकणार नाही. ह्या नादात लक्षातही येत नाही मीही कुणापर्यंत पोचू शकणार नाही.
त्या अंधारात मी चाचपडत बसते. अंधाराला सराईत असल्याने सगळे कोपरे, खाचाखोचा माहिती असतात. मी आहे त्या खोलीत एका कोपर्यात कधी काळी आकाशी रंगाचं असलेलं टेडीबेअर आहे. 'त्या'ने दिलेलं! ह्या जीवघेण्या अंधारात त्याचा गोडवा दिसेनासा झालाय. कधीतरी उगाच भरकटतांना त्याचा मऊसर स्पर्श मला मस्त निळ्या रंगाची आठवण करून देतो, एक क्षणभर घुसमट थांबली असं वाटतं , पण दुसर्याच क्षणी मनातली निळाई भोवतालच्या कृष्णविवरात वितळत जाताना दिसते आणि एकदम पुन्हा तो अंधार मला वेढून टाकतो.
कधीतरी वाटतंच, की काय अर्थ आहे अश्या असण्याला? स्वतःच स्वतःला छळत बसण्याला? पण हे वाटणं क्षणिकच. पुन्हा खोलीच्या कोपर्यात शक्य तेव्हढं अंग मुडपून मी बसून असते, अंधारडोहातलं खोलपण किंवा उथळपण बघत.
याद्या
4946
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
अभिनंदन !
म म देशपांडे
मुक्तक आवडलं.
व्हाइट नॉइज...
क्या बात है...
In reply to व्हाइट नॉइज... by राजेश घासकडवी
अगदी
In reply to क्या बात है... by श्रावण मोडक
हायला !
In reply to क्या बात है... by श्रावण मोडक
खोदकाम
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
बिघडवलं कोणी
In reply to खोदकाम by श्रावण मोडक
मस्त.
In reply to व्हाइट नॉइज... by राजेश घासकडवी
ग्रॅट !!
In reply to व्हाइट नॉइज... by राजेश घासकडवी
छान प्रतिसाद!
In reply to व्हाइट नॉइज... by राजेश घासकडवी
वाह!!
In reply to व्हाइट नॉइज... by राजेश घासकडवी
नाहीतरी पदार्थविज्ञान म्हणतंच
वा वा... मस्त मस्त मस्त.
छान छान !!
फार छान.. आवडले.
वरच्या लेखात आवडण्यासारखे काय आहे
अंधार माझा सखासोबती..
अंधारात
रात्र काळी
उत्तम
आवडलं...
मुक्तक आणि राजेशचा प्रतिसाद
+१
In reply to मुक्तक आणि राजेशचा प्रतिसाद by बिपिन कार्यकर्ते
लेख छान आहे.