अजि ये प्रोभाते - आज पहाटे रविकर आला
कवी मग तो कुठलाही असो, त्याच्यात ऋषि बनण्याची संभाव्यता असते. कारण मनाच्या एका विशिष्ट अवस्थेत त्याला जे झप्पकन दिसून जातं ते तेवढ्याच झगझगीतपणे व्यक्त होणार्या शब्दांत बांधण्याचे कसब कवीकडे असते. ऋषिलाही ते दिसत असते; पण त्याला कविता करण्याची गरज पडत नाही कारण ऋषिने पाहिलेले आणि समोर मांडलेले 'सत्य' असते. म्हणून ऋषिच्या वाणीला धर्मग्रंथांत स्थान मिळते. कवीची अवस्था मात्र जाणीवेच्या दृष्टीने काहीशी खालची मानली जाते कारण कवी सत्य आणि सामान्यत: जग जसे असते त्यातील सीमारेषेचे सतत अतिक्रमण करीत असतो.
मिसळपाव