Skip to main content

(फस्स्स्स्स्स्स्कन)

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 12/04/2012 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारात सोडा उघडल्याचा फस्स्स्स्स्स्स्कन आवाज आला... कोणाची तरी बायको माहेरी गेली असणार... डोळ्यात चळचळीत पाणी आणि मनात कचकचीत शिव्या आल्या... आमची बायको घरी आहे म्हणून त्या नुसत्या कानात खळखळ वाजल्या.. पुन्हा पुन्हा डोक्यात घुसणारा तो बूच उघडल्याचा आवाज... कोण ढोसतोय इतकी... मजा मारतोय **चा.. असशील सद्ध्या एकटा म्हणून आमची का जळवतोस... हलकट टेंपररी बॅचलर सारे... शेजारच्या घरी डोकाऊन बघितलं तर तो *म्या होता... मी मान खाली घालून ज्यूस पिऊ लागलो...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3011
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

आज विडंबन दिन साजरा करु या....तसा इथे रोज असतो म्हणा...पण आज जरा जास्त आहे...

>>>शेजारच्या घरी डोकाऊन बघितलं तर तो *म्या होता... >>>मी मान खाली घालून ज्यूस पिऊ लागलो... *म्या - अम्या, सुम्या, रम्या, शाम्या, पम्या, राम्या... आयला, टोटल लागत नाहीये राव! कोण रे अ‍ॅड्या, कोण? ;)

In reply to by प्यारे१

इच्छुक गरजूंनी व्यनी करावे. मागच्या एका लेखात असंच नाव लिहिल्याने मला चहाचं पाणी सोडा घालून पाजण्यात आलं होतं. सो, टेकींग नो चन्सेस धिस टाईम ड्यूड :)

मस्त!

लै म्हंजे लैच भारी, अ‍ॅडीभाय.. सॉलिड्ड :-) *म्याभौच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.. ;-) गविंचा खिलाडूपणाही आवडेश.