लेखकविदेशयांनी सोमवार, 02/04/2012 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य मी चालत आहे ,
सोबतीला चंद्र चांदण्या -
मी नाही कंटाळलो,
बिचारा चंद्र मूक राहिला !
पाठवून दिले त्याने
माझ्या सोबतीला -
विनातक्रार शांतपणे
किरणांसवे सूर्याला !
...आता मला सोबत करताना
सूर्य भलताच तापला आहे !
प्रतिक्रिया
चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही.....