उत्तरार्ध
काही दिवसांपूर्वी "अटॅचमेंटमधली वेदना आणि डिटॅचमेंटमधला आनंद" याबद्दल झालेली चर्चा या छोट्याशा स्फूटाला कारणीभूत ठरली.
----------------------------------------------------------------------------
प्रिय,
निसर्गाचा सगळा प्रवास डिटॅचमेंटकडे सुरू असतो, नाही का?
वाळलेली पानं, फळलेला मोहोर, निगुतीने बांधलेली घरटी, मोठी झालेली पिल्लं, बरसून रिकामे झालेले ढग, कशातही गुंतून राहत नाही तो. आणि तरी सतत नव्याने प्रसन्न दिसत राहतो.
'समर्पयामि' हे माणसाला म्हणावं लागतं. तर कधी 'पुरे झालं आता' असं बजावायला लागतं. अर्पणपत्रिका लिहून अर्पण केल्याचीच नोंद ठेवण्याच्या विपर्यस्त मोहातूनही सुटत नाही तो.
निसर्गाचं तसं नसतं. खरंतर सगळ्यात देखणा असा आस्वादाचा अनुभव देऊ शकणारी अशी ही चीज आहे. इतका की घेणाऱ्यालाच नाही तर देणाऱ्यालाही त्या अनुभवाचा लोभ जडावा.
पण म्हणून निसर्ग वेगळा ठरतो.
समर्पण दरक्षणी.
आणि देऊन रिक्त झाल्यावर गेलेल्या क्षणाशी नितळ, निवळशंख, आरपार अलिप्तता.
ही पालवी गळूनच जायचीय म्हणून ती घडवताना खंत नाही, चुकारपणा तर नाहीच.. आणि बहराचा उत्सव साजरा करून ती गळून गेल्यावर तीसाठी झुरणंही नाही.
त्याला कौतुकाची थाप लागत नाही.
निषेधाचा सूर बोचत नाही.
उपेक्षेने हताशा होत नाही.
जात असलेल्याला थांबवू बघण्याची तगमग निसर्गाकडे नाही.
स्वयंपूर्ण असं हे प्रकटन आहे. देत राहणं, देत असताना निःसंग राहणं हा धर्म कर्णानेही इतका स्वीकारला नाही.
आता सांग, ही अशी डिटॅचमेंट खरंच सुरेख नाही का?
वाचने
6180
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजून थोडे हवे होते, पण स्वत
मस्त!
फार छान. आवडलं.
नवं नवं,वाचाया बरं वाटलं...!
Surekh!!
एकदम फ्रेश लेख .
फार छान
आवडलं.
मस्त!
सुरेख लिखाण!
मस्त...
कसे येते हो हे सर्व?
सुंदर.
सगळ्या वाचकांचे आणि
इनिगोय यांचा मुळ लेख आणि
काय सुरेख स्फुट आहे हो इनिगोय
हे थोडे काव्यात्मक झाले.पण,
हा एक खूप चांगला दृष्टिकोन
In reply to हे थोडे काव्यात्मक झाले.पण, by अनिता ठाकूर
निसर्ग या प्रकाराच्या जितकं
In reply to हा एक खूप चांगला दृष्टिकोन by गवि
ईषणाला समानार्थी शब्द माहीत
In reply to निसर्ग या प्रकाराच्या जितकं by इनिगोय
ईषणाला समानार्थी शब्द
In reply to ईषणाला समानार्थी शब्द माहीत by गवि
आपल्या हृदयाचं धडकणं ही सर्वात महत्त्वाची नैसर्गिक क्रिया आहे
In reply to निसर्ग या प्रकाराच्या जितकं by इनिगोय
तेच तर..
In reply to आपल्या हृदयाचं धडकणं ही सर्वात महत्त्वाची नैसर्गिक क्रिया आहे by संजय क्षीरसागर
तुझा प्रतिसाद असा आहे
In reply to तेच तर.. by गवि
आपला श्वास केंव्हाही बंद पडू
In reply to तुझा प्रतिसाद असा आहे by संजय क्षीरसागर
अनियंत्रित म्हणजे स्वछंद, ज्याच्या सुरू होण्याला, चालण्याला आणि
In reply to आपला श्वास केंव्हाही बंद पडू by गवि
हे तर्ककठोर सत्य असूही शकेल : नाही ती वास्तविकता आहे
In reply to हा एक खूप चांगला दृष्टिकोन by गवि
येप्स.
In reply to हा एक खूप चांगला दृष्टिकोन by गवि
सुप्पर्ब रीप्लाय अर्धवटराव ..
In reply to येप्स. by अर्धवटराव
यू आर अॅबस्ल्यूटली राइट
In reply to हे थोडे काव्यात्मक झाले.पण, by अनिता ठाकूर
हे थोडे काव्यात्मक झालेहे अत्यंत योग्य निरिक्षण आहे. अशा जगण्याला मन तयार होत नाही.आवडलं...
लेख आणि प्रतिक्रिया दोन्ही खुप आवडले..:)
सुंदर स्फुट..
इतका
मस्त
छान
In reply to मस्त by मी_आहे_ना
आवडलं, सगळ्यात असून कशातच
+१
In reply to आवडलं, सगळ्यात असून कशातच by सूड
श्री. सुड, त्याला आंतरजालीय
In reply to +१ by स्पंदना
आवडलं. सुन्दर सोनल
सुरेख!
प्रकटन आणि प्रतिसाद रोचक आहेत