Skip to main content

शब्द

लेखक भावना कल्लोळ यांनी शुक्रवार, 22/03/2013 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी शब्द भेटले मला, विचारले त्यांना का रे हल्ली जास्त येत नाही तुम्ही माझ्याकडे? तर म्हणाले, आम्ही तर रोज येतो, पण तूझेच लक्ष नसते आमच्याकडे, तुझी सखी तर अबोली आहे ना , पाहावे तर रोज असते तुझ्या ओठावर विसावलेली, मग आम्ही कुठे राहणार ? मग हळूच तुझ्या डोळ्यात विसावतो, पण तू पण अशी आहेस ना, तुला उमजतच नाही, कोणी सोबत असताना शब्दांनी बोलतच नाहीस. मग हळूंच आम्हाला वाट करून देतेस, एकटी असताना … किती वेळा पहिले आम्ही स्वतःला आसवात बदलताना …
लेखनविषय:

वाचने 809
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया