Skip to main content

मुक्तक

सरकारी नोकरी २

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 25/04/2013 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
१९९० साली मी विक्रांत मध्ये प्रमुख वैद्यकीय अधिकारी होतो.(मी एकटाच होतो) जहाजात साधारण पणे डॉक्टर हा कल्याण कारी(WELFARE) अधिकारी म्हणून सुद्धा काम करतो कारण त्याची बढती हि वार्षिक अहवाला वर नसते. जहाजाचे स्वास्थ्य विषयक काम हे त्याच्या अखत्यारीत येते यात सर्व स्वयंपाकी वाढपी (COOKS AND STEWARDS) यांची दर महिन्याला तपासणी करणे, स्वयमपाकघर, जेवणघर इ गोष्टीची तपासणी करणे. कीटक, उंदीर इत्यादीपासून प्रतिबंध ठेवणे हे सर्व येते तसेच सर्व सैनिक आणी अधिकारी यांची वार्षिक स्वास्थ्य/वैद्यकीय तपासणी बढतीपूर्व वैद्यकीय तपासणी हे सुद्धा येते त्यामुळे डॉक्टरला बरेच अधिकार आणी शक्ती असते.

सरकारी नोकरी

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 25/04/2013 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
भारताच्या पहिल्या अर्थमंत्र्यांनी आय ए एस अकॅडमी मध्ये केलेल्या भाषणात तिथल्या होऊ घातलेल्या सचिव अधिकार्यांना असे म्हटले होते कि आता तुम्ही जगातल्या सर्वात सुरक्षित अशा नोकरीत शिरत आहात जेथे तुम्ही जरी खून केलात तरी शिक्षा म्हणून फक्त बदली होते. आणी बर्याच वेळा तीसुद्धा बढती च्या पदावर. इतकी सुरक्षित नोकरी असल्यावर आपण त्याचा वापर जनहितासाठी केला पाहिजे. परंतु तीरुनेल्लाई नारायणन शेषन या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या लेखनातील एक वाक्य आठवत आहे.

मामाचं गाव (इसावअज्जा)

लेखक दशानन यांनी मंगळवार, 23/04/2013 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
"राज्या, परिक्षेत किती मार्क पडले रे." मे महिन्याच्या सुटीसाठी बस स्टॅन्डवरुन अजून घरात पाऊल न ठेवलेल्या आपल्या एकुलत्या एक भाच्याला उंबरठ्यावरच प्रश्न विचारणारा मामा आठवला की या मामा लोकांनी माझे लहानपण कसे वाया घालावले याबद्दल दोन-चार आश्रु मी गाळून घेतो. दिड-दोन फुटी आपला भाचा वर्षभर मास्तर व बाईचा मार खाऊन खाऊन वैतागलेला, अभ्यास कर हे एकच पालूपद वर्षभर ज्याच्या मानगुटीवर भुतासारखे बसलेले, तिमाही, सहामाही, वार्षिक च्या सोबत असंख्य तोंडी परीक्षेतून पार पडून थोडा निवांत झालेला असतो तर लगेच घरात टूम निघते..

स्पर्श

लेखक भावना कल्लोळ यांनी गुरुवार, 18/04/2013 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक असह्य वेदना आणि मग एक विचित्र मोकळेपणाचा आभास …. डोळ्यावर आलेली ती तंद्री, तरी पण त्या मध्ये घड्याळाकडे पाहण्याची तळमळ. वेळ पहिली आणि डोळे आपोआप मिटले. आजूबाजूला होणारी लगबग, आवाज, वेदनाच्या किंकाळ्या सर्व काही एकू येत होत, जाणवत होत. पण शरीर खूप थकल होत. मग मला उचलून स्ट्रेचर वर ठेवण्यात आल. वार्ड बोय आणि मावशाची धावपळ उमगत होती. पण डोळे बंदच होते, जणू कल्पोकल्पाचा भार वाहून आज मी मोकळी झाली होते त्यातून. सिस्टर कसले तरी गाठोळे माझ्या मांडी वर देऊन मला बाहेर नेण्याची सूचना करत होत्या मावशींना . दरवाजा उघडण्याचा किरकिर आवाज ऐकला आणि बाहेर येताच आईचा हाताचा स्पर्श जाणवला कपाळावर.

अलि अँड द बॉल: कुंपणाआडचं आभाळ

लेखक रमताराम यांनी शुक्रवार, 12/04/2013 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांचा फुटबॉलचा खेळ रंगात आला आहे. प्रचंड कोलाहल, आरडाओरड्याने त्यांनी आसमंत दणाणून सोडला आहे. कॅमेराही त्यांच्या मधे धावणार्‍या त्या चेंडूचा पाठलाग करू पाहतो, पण जमत नाही त्याला. इतक्यात एक बदामी डोळ्याचा खट्याळ पोरगा तो चेंडू उचलून धूम ठोकतो. उरलेली सारी मुले त्याच्या मागे लागतात. पण तो फार दूर जाऊ शकत नाही, एक भक्कम कुंपण त्याच्या वाटेत उभे आहे. त्या कुंपणाला पाठ लावून तो चेंडू नेण्यासाठी आलेल्या त्या मुलांना चिडवतो आहे. ते ही सगळे मिळून त्याच्यावर धावून जातात नि चेंडू हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताहेत.

सैर भैर २

लेखक सुबोध खरे यांनी गुरुवार, 11/04/2013 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
१९९० सालची गोष्ट असेल. मी नौदलाच्या कुलाब्याच्या अश्विनी रुग्णालयात मनोविकार विभागात विभाग प्रमुख कर्नल पेठे यांच्या बरोबर बसलो होतो. त्यांनी पुढच्या रुग्णाला बोलावले. पुढचा रुग्ण एक वरिष्ठ कर्नल आपल्या पत्नीसमवेत आत आला. कर्नल साहेब ४५ ते ५० च्या मध्ये होते आणि ते गणवेशात होते.ते कुलाब्याच्या थळ सेनेच्या महाराष्ट्र गुजरात आणि गोवा विभागाच्या मुख्यालयात कामाला होते. त्यांची अंगकाठी सडपातळ आणी चालण्यात रुबाब होता. पत्नी साधारण ४० च्या आसपास होत्या.टापटीप आणि छान पोशाख केलेल्या. मी विचारात पडलो कि यात रुग्ण कोण? पेठे सरानी पत्नीला विचारले कि काय म्हणताय आणि साहेब काय म्हणताहेत?

अंड्याचे फंडे ५ - शर्यत

लेखक साळसकर यांनी सोमवार, 08/04/2013 12:12 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्‍यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.

सैर भैर

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 07/04/2013 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
हि १९९१ सालची गोष्ट आहे मी डॉकयार्ड दवाखान्यात रात्रीच्या तातडीच्या सेवा विभागात कामावर(ड्युटी) वर होतो याचा एक भाग म्हणून आय एन एस आंग्रे मध्ये असलेल्या नौदल पोलिसांच्या कोठडीला भेट देऊन तेथे असलेल्या कच्च्या कैदेतल्या सैनिकांची तपासणी करणे हा होता. अशा तपासणीच्या वेळी मी हटकून प्रत्येक सैनिकास का अटक झाली आहे? काय परिस्थितीत ते झाले आहे याची शहानिशा करीत असे.( मनोविकार शास्त्रात काम केल्यामुळे मला त्यात जर जास्त रस होता). असे त्या कोठडीतील सैनिक पाहत असताना एक संभाजी माने( किंवा जाधव असेल )वय २५ वर्षे या सैनिकासमोर आलो.

डॉ खरे आणि माझे जुनेच कन्फ्युजन

लेखक मन यांनी मंगळवार, 02/04/2013 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. खरे ह्यांचे मिसळपावावरील लिखाण वाचून पदवीदरम्यान असलेल्या principles of ethics and cyber laws ह्या विषयाची आठवण झाली. त्यात चित्रविचित्र किस्से, निर्णयक्षमतेची कसोटी पाहणारे प्रश्न असत. त्यातली आमची उत्तरे व्यक्तिसापेक्ष बदलत. आम्ही उत्तरे काहीही दिली तरी चालत; पण योग्य ते जस्टिफिकेशन आम्हाला देता येते आहे की नाही; हे पाहिले जात.(वाद विवाद स्पर्धेप्रमाणे; कुठलीही बाजू मांडा; बक्षीस मिळू शकेल; पण तुमचा त्यातला अभ्यास दिसायला हवा.) . त्यासंदर्भात टेक्स्टबुक बाह्य वाचन करताना पडलेला प्रश्न. "ग्रामर्थं कुटुंबम् त्यजेत् | राष्ट्रार्थम् ग्रामम् त्यजेत ||" असे म्हणे चाणक्य म्हणून गेलाय.

सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात सत्यं अपि अप्रियं न ब्रूयात २--पुढे

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 02/04/2013 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
त्या स्त्रीला ३/४ (तीन चतुर्थांश) योनी नव्हतीच. त्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य कसे चालू होते हे त्या स्त्रीला विचारले तर ती म्हणाली व्यवस्थित चालू आहे. त्या नवर्याला सम्भोगाबद्दल अज्ञान असावे किंवा ती स्त्री खोटे बोलत होती. त्या स्त्री कडून हे तत्वज्ञान ऐकून घेतले माझा रिपोर्ट लिहिला आणी तिच्या हातात ठेवला. दार उघडले तर तिचा नवरा बाहेर उभा होता आणि त्याने लगेच विचारले कि साहेब मुल होईल ना? त्या गरीब माणसाकडे पाहून मला कसेसेच झाले. त्याची दुहेरी फसवणूक झाली होती आणि त्यातून त्याला तुला मुल होणे फार कठीण आहे हे सांगण्याचा मला तेंव्हा तरी धीर झाला नाही.