पोरगं अभ्यासच करत न्हाय राव !
मी काही वर्षांपूर्वी क्रेट्स विकायचो.[माझ्या बहुविध उद्योजकतेचा आणखी एक [अ]यशस्वी टप्पा !- हा हा हा !
तेव्हा एकदा संगमनेरला गेलो, सक्काळी-सक्काळी मार्केट-यार्डला पोचलो. थेट एका दुकानात शिरलो. दुकानात एक लहानसं- ९-१० वर्षांचं पोरगं होतं. आम्ही जरा इकडे-तिकडे घुटमळतोय असं दिसल्या-दिसल्या त्याचा प्रश्न :-
"कॅरट विकता काय ?"
"हो, मालक कुठेत" -- माझा व्यवहारी, मॅच्युअर्ड प्रश्न !
चक्क दुर्लक्ष करून तो पुढे :-
"किती ग्राम ?
मिसळपाव