Skip to main content

मुक्तक

मुंबई कट्टा

लेखक सुबोध खरे यांनी शनिवार, 14/12/2013 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी मुक्त विहारींकडून असे कळले कि श्री इस्पिकचा एक्का भारतात आले आहेत आणी पुण्यात वास्तव्याला आहेत. आपण त्यांना भेटूया असे आम्ही ठरविले आहे. त्यावर मी त्यांना दूरध्वनी( हा मुक्त विहारीनीच दिला) केला आणी ते शनिवार दिनांक २१ डिसेम्बर रोजी परत विदेशी जात आहेत. त्यांचे विमान सायंकाळी ७.३० ला सुटत आहे आणी त्यांना ४.३० ला चेक इन करायचे आहे म्हणून आम्ही त्यांना सहार विमानतळाजवळ एखाद्या हॉटेल मध्ये साधारण २ वाजता भेटायचे ठरविले आहे. ज्या मित्रांना तेथे येण्याची इच्छा आहे त्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. खर्च स्वतःचा स्वतःने करायचा आहे.

फोकनाड !

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 10/12/2013 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
फोकनाड !! एका सायंदैनिकात मंत्रालयातील पब्लिसिटी खात्याचा एक अधिकारी पार्टटाईम बातमीदारी करायचा. एकदा तो एक फालतू बातमी घेऊन आला. साहेबाच्या हातात त्याने तो कागद दिला. साहेबांचा नजर हातातल्या कागदावरच्या बातमीवरून फिरत होती आणि हा समोर बसून साहेबाच्या चेहर्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत होता... साहेबानी बातमी वाचून संपवली. कागद बाजूला ठेवला... याला साहेबाच्या प्रतिक्रियेचा काहीच अंदाज येत नव्हता... शेवटी न राहवून त्याने विचारले, 'साहेब कशीय बातमी?'... 'एकदम फोकनाड'... हसतहसत साहेब म्हणाले. याला अर्थ कळला नाही, पण साहेब हसत होते, म्हणजे चांगली असणार असे समजून तो आनंदला.

सखे ..........

लेखक विनय_६६७ यांनी सोमवार, 09/12/2013 18:03 या दिवशी प्रकाशित केले.
सखे , खर सांगू , आता न खूप हलके वाटतेय! खर तू परत आलीस, यावर विश्वास बसतच नव्हता. का कुणास ठाऊक, तुझ्यात ती पूर्वीची तू दिसत नव्हतीस, आणि ते तू कबुल हि केलेस. एरव्ही माझ्या एका शब्दाला तुझे १० शब्द असायचे पण आज ? चक्क तू ? तूच होतीस ती ? कदाचित माझ्या जागी तू जरी असतीस तरी विश्वास ठेवला नसतास यावर. शांतपणे म्हणालीस तू ‘’ .... मी आता तिला ( माझ्या त्या पूर्वीच्या ) ..... मारून टाकलेय. आतापर्यंत हळवी, मनमिळाऊ. भावनाप्रधान, पाहिलीस तू मला, पण आज मी त्या माझ्या रुपाला तिलांजली दिलीय .......किती धक्कादायक सुखद धक्का होता तो? तुझा विश्वास बसणार नाही पण मला तू अशीच हवी होतिस.

क्रेडीट कार्डाबद्दलचे गैरसमज

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 08/12/2013 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रेडीट कार्डाबद्दलचे गैरसमज हा विषय मुद्दाम घेण्याचे कारण आपल्यापैकी जवळ जवळ ९५ % (कदाचित १००%) लोक क्रेडीट कार्ड वापरत आहोत. पण या बद्दल आपल्या मनात बरेच गैरसमज आहेत त्यातील काही जर दूर करता आले तर मला आनंदच होईल. सर्व प्रथम मी अर्थ क्षेत्रातील तज्ञ नाही किंवा माझ्याकडे त्यातील कोणतीही पदवी नाही. बरीच मासिके आणि पुस्तके वाचून आलेल्या सामान्य ज्ञानातून मी हा लेख लिहित आहे यात झालेल्या चुका किंवा घोडचुका तज्ञ लोकांनी दुरुस्त कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे. श्री ज्ञानव यांनी मांडलेल्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा मी सरळ कृती करण्याचा मार्ग अवलंबित आहे. चूक झाली तर क्षमस्व.

डिसेंबर........

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 08/12/2013 04:26 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन डिसेंबरात आभाळ दाटून आलंय. ते तसे नेहमी एखाद्या दिवशी होतंच. "डिसेंबर" खरं तर मासानां मार्गोशीर्षोहमः म्हणावा असा. डिसेंबर म्हणजे नुकतीच दिवाळीची सुट्टी संपलेली असते. सुट्टी संपवून शाळा कॉलेजे रुळावर येत असतात. गॅदरिंग चे वेध लागलेले असतात. दिवाळीच्या सुट्टीचा म्हणा की मस्त थंड हवेचा परीणाम म्हणा बहुतेक जण दुपारी सुद्धा उत्साही असतात. घरी कसाबसा एखादा कप चहा पिणारे मस्त पैकी आलं टाकून केलेल्या वाफाळत्या चहाचे दोन तीन राउंड सहज करतात. सकाळचे कॉलेज असणारांची तर एक वेगळीच मजा असते. भल्या पहाटे अंथरुणावरुन बाहेर पडायची इच्छा नसते.

बंड्याचे बुद्धिबळ

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शनिवार, 07/12/2013 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती. एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते.

बाई'को' विकल्यावर

लेखक वाह्यात कार्ट यांनी गुरुवार, 05/12/2013 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षोल्लासीत नावर्यांनो, आधीच सांगतोय शीर्षक वाचून भलते समज करून घेऊ नका. लेख चक्क चक्क बाईक वर आहे. “बाईक 'को' विकल्यावर”. थोडासा आपला हिंदीमिश्रित कोट्या करायचा क्षीण प्रयत्न. आता काय सांगू कसं सांगू असं झालंय. सुरुवात, “धूम” युगा पासूनच करतो. जो तो आपलं टॅनंनॅ नन नॅनननॅ करत गाड्या उडवू लागला. आमच्या इमारतीतलं एक कार्टं तर शेजारच्या इमारतीत गोट्या खेळायला पण स्कुटी वर जाऊ लागलं. फादरकडे बाईक मागताच त्यांनी मला मुस्काडून “दत्त दाखवायची” महत्वाकांक्षा जाहीर केली.

अरेरे, विक्रांत चालली भंगारात

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 05/12/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्रजी भाषेत एक म्हण आहे, "The King is dead, Long live the King!" (आधीचा) राजा मरण पावला, (नवा) राजा चिरायु होवो. "विक्रांत या विमानवाहू नौकेचा लवकरच भंगार म्हणून लिलाव होणार आहे" अशी बातमी आज नौदल दिनाच्या दिवशीच वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर होती आणि नव्याने तयार होत असलेल्या विक्रांत या महाकाय जहाजाचा उल्लेख नौदल दिवसाच्या खास पुरवणींध्ये होता.

साधीशीच माणसं ..

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 02/12/2013 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेहमीपेक्षा वीसेक मिनिटे उशीराच घराबाहेर पडलो. ऑफिसला जायचे नसून ऑफिसच्याच कामासाठी इतरत्र जायचे होते. पुढची ट्रेन पकडायला हरकत नव्हती म्हणून बिछान्यातच पंधरा-वीस मिनिटे जास्तीचा मुक्काम ठोकला. तयारी मात्र नेहमीच्याच वेगाने झरझर आटोपून, मोबाईलमध्ये ट्रेनचा टाईम आणि आता झालेली वेळ, दोन्ही चेक करून रमतगमत चाललो तरी वेळेच्या आधी स्टेशनवर पोहोचेन अश्या हिशोबाने निघालो. पावले मात्र सवयीनेच झपझप पडू लागली, नव्हे किंचित जास्तच उत्साहाने.

मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 02/12/2013 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
मेकिंग ऑफ सिव्ह्गडावरील भजी आजवर ट्रेकचे अर्धशतक झाले. कुठलाही विकांताला ट्रेकला चला असे कोणीही म्हटले की आम्ही एका पायावर तयार! कुठलेही ट्रेक चे ठिकाण असो, काय फरक पडतोय? काय फरक पडतोय ??? फरक तो पडता है भाई, ट्रेकिंग लोकेशन सिलेक्ट करनेमे हमेशा सावधांनी रखो. ! नाहीतर "तू प्लान कर. मी येतो" असे म्हणून तुम्ही एका पायावर तयार व्हायचा ट्रेकला आणि समोरचा पठ्ठ्या तुम्हाला सिव्ह्गडावर न्यायचा. देव करो आणि असले वाईट प्रसंग न येवोत तुमच्यावर! सिव्हगड वा सिंहगड जायचे म्हणजे फुल टू डोके सरकते. आणि त्यात रविवारी जायचे म्हणजे आवराच ! असो, आपले काही वैर नाहीये सिव्ह्गडाशी वा तानाजीशी.