Skip to main content

स्विकार...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शनिवार, 22/02/2014 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे मुलायम मउ दोन्ही हात आजही ह्रुदयापाशी घट्ट कवटाळुन ठेवले आहेत मी.. कधी कधी प्रचंड एकटं वाटल्यावर शोधुन काढतो अडगळीत गेलेल्या फाइल सारखं...काही क्षण! माहित असतं नंतर .. पुन्हा तोच एकाकीपणा मला छळायला येणार आहे... आणि पुन्हा काही काळ त्याचा हिशेब चुकता झाल्यावर.... पुन्हा तुझ्या हातांची..त्यामागल्या स्पर्शांची वेडी हुरहुर! कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं? मग येते काही क्षणांची विमनस्कता... त्यावरची काही उत्तरं... आणि पुन्हा जीवनाच्या अखंड न थांबणाय्रा प्रवासाचा अपरिहार्य स्विकार... हेच निसर्गानी माणसाला शिकवलेलं रोखठोक उत्तर असावं... यावरचं!!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6074
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

In reply to by धन्या

धन्या मला तर हे आय्सिआय्सिआय मधील नाजुक हाताने घायाळ झालेले एका दिलफेक खातेदाराचे मनोगत वाटते.:-D गुरजी पण मला आवडले नाही. त्यापेक्षा तुमचा खोकले अवतार पुनुर्ज्जिवित करा पाहू. :-D माझा कुणाचा वाला ;-)

कधी कधी मला प्रश्न पडतो... मानवी मन... नाते ... संमंध... त्यातील व्यवहार.
संमंध ?? संबंध असायला हवंय का? पण चांगलं लिहिलंय..

In reply to by आनन्दिता

संमंध ?? संबंध असायला हवंय का?
बहुतेक ते संमंध असंच असावं. अतृप्त आत्म्याने लिहिलेली कविता आहे ना.

In reply to by आनन्दिता

@संमंध ?? संबंध असायला हवंय का? >>> बरोब्बर... संबंध-- हाच योग्य शब्द आहे.माझा या शब्दाबाबत अनेकदा घोटाळा होतो. (संपादकांना विनंती:- प्लीज शब्दबदल करुन द्या ना. :) ) @पण चांगलं लिहिलंय.. >>> धन्यवाद. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

संबंध-- हाच योग्य शब्द आहे.माझा या शब्दाबाबत अनेकदा घोटाळा होतो.
घोटाळा होणारच. संमंध हा शब्द तुम्हाला नेहमीच जास्त जवळिकीचा वाटत असणार.

नक्की कोण चावलं आत्माबुवांना, अकु की मोजी ...?

अ आ याना कोणा माणसाची चावायची टाप आहे? नक्कीच समंध चावला. बुवा, काय असल्या हळव्या कविता लिहिता राव ?

In reply to by चौकटराजा

@बुवा, काय असल्या हळव्या कविता लिहिता राव ?>>> हम्म्म... बरोबर आहे आपलं! एकदा विदुषकाची टोपी चढली,की माणसानी 'आपण हळवे आहोत' हे ही विसरुन जायला पाहिजे. पडेल मला हळुहळू सवय. :)

एव्ह्ड्याचसाठी अत्रुप्ती फक्त वैचारिक राखावी हेच बरे.

"मानवी मन... नाते ... संबंध... त्यातील व्यवहार... हे सर्व या दोन टोकांच्या मधल्या ताटातुटीवर बेतलेले आहे का गं?" मस्त आवडले....

मग येते, काही क्षणांची विमनस्कता... त्यावरची काही उत्तरं... आणि पुन्हा जीवनाच्या अखंड न थांबणाय्रा प्रवासाचा अपरिहार्य स्विकार... सुरेख !

मस्त लिहिलंत! आता प्रवास जरा थांबवा.

प्रिय व्यक्तिचा विरह, त्यातून आलेली व्याकुळता आणि असहाय्य्पणा अगदी व्यवस्थितपणे जाणवतो.....
रोइये जी खुषी से,रोके गा कोइ थोडे ही!?
कौन रोता हैं किसी और की खातिर ऐ दोस्त? सबको अपनीही किसी बात पे रोना आया..... अवांतर : @धन्या : खुर्चीतून पडले हो!!!! :D

स्विकार नाही हो .. स्वीकार ! . . . . . . . . . . , , प्रतिसाद संपला.

In reply to by विटेकर

त्यांनी अत्रुप्त आत्मा असा आयडी घेतलेला असूनही तुम्ही शुद्धलेखन सुचवताय म्हटल्यावर तुमच्या धाडसाला त्रिवार मुजरा !!