Skip to main content

मुक्तक

वाफाळलेली कटींग चहा .. !!

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 12/01/2014 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारची संध्याकाळ, सात-साडेसातचा सुमार, नेहमीपेक्षा बरीच रिकामी ट्रेन. हा थंडीचा प्रताप म्हणून ट्रेन खाली, की ट्रेन खाली असल्याने वारा अंगाला येऊन जास्तच झोंबत होता माहीत नाही. पण खिडक्या बंद करूनही सुरसुरत आत शिरत होता. किंबहुना बारीकश्या फटीतून तीरासारखा अंगावर झेपावत होता. कसलाही आवाज न करता. जे चार चौदा सहप्रवासी होते त्यांची वार्‍याचा विरुद्ध दिशेला बसायला मारामारी चालू होती. कसलेही भांडण न करता. निदान उबेसाठी म्हणून कोणाच्या तरी सोबतीची गरज यावेळी भासते तसे माझ्याबरोबर कोणी नव्हते.

माया

लेखक नानीचा नाना यांनी गुरुवार, 09/01/2014 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
माया एक दिवस गेलारीत उभा राहून बाहेर होतो . तेवढ्यात एक फाटके कपडे घातलेला मनुष्य एका लहान मुलाला घेऊन पुढील रस्त्यावर बसला . त्यानंतर त्याने त्याच्या पोतडीतून एक तेलाची बाटली काढली व तो मुलाच्या हाता / पायांना लावू लगला .ते पाहून मला वाटले कि तो मनुष्य त्या लहानग्याची किती काळजी घेतो आहे क़दाचित त्या मुलाने व्यवस्थित मोठे होऊन आपल्या म्हातारपणी आपली काळजी घ्यावी असा रेखिला त्याचा हेतू असेल . तो मनुष्य बर्याच आपुलकीने त्याला तेल लावत होता व तो मुलगा देखील शहाण्यासारखा तेल लावून घेत होता .

पाऊस असा रुणझुणता...

लेखक चावटमेला यांनी बुधवार, 08/01/2014 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस कधीचा कोसळतो अंतरात काहूर अनामिक एक, दाटते स्पंदनांत... 'पाऊस' ह्या निसर्गाच्या अविष्कारातच जणू मला एक प्रकारची गूढरम्यता वाटते. परीक्षेत निबंध लेखनासाठी माझा आवडता ऋतू असा विषय असला की पावसाळा सोडून दुसरं काही खरडल्याचं स्मरणात नाही.

नाना ची मनी ( सनी)

लेखक नानीचा नाना यांनी रविवार, 05/01/2014 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
नाना ची मनी ( सनी) आम्ही सनी घेतली तेव्हा ती आमच्या सोसायटीतील ४८ सभासदांपैकी ३ री स्कूटर होती . यथासांग पूजा करून आम्ही आमच्या सनीचे स्वागत केले . त्यावेळी माझी मुलगी ७ - ८ वर्षांची असेल . तिला आमच्या सनी बद्दल अतिशय अभिमान होता . दर शनिवारी तिला मी स्नीवरून शाळेत सोडत असे. तेव्हा इतर मुलांसमोर स्वतः च्या सनी वरून चढण्या - उतरण्याचा तिचा रुबाब काही औरच होता . यथावकाश मला मुलगा झाला . तो तर सनीच्या मधल्या भागात धरून हरून उभा राहायला शिकला आणि इयत्ता ६ वीत जाईपर्यंत तो सनी चालवू लागला आमची सनी म्हणजे ' मूर्ती लहान पण कीर्ती महान ' अशी होती .

नवे देव आणि त्यान्चे नवे भाव

लेखक शेखरमोघे यांनी शनिवार, 04/01/2014 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाव तेथे देव, मग नवीन देव आले तर नवीन नकोत का भाव? विसरा जुनी माहिती, जुन्या पद्धती, खूप ऐकले असेल भाव तेथे देव, पण आता नवीन पद्धती आणि त्यांत "भाव" कसा ठरवावा हे माहीत आहे काय? "प्रयत्नांती परमेश्वर" असेल अनेकदा ऐकलं, पण त्याचाच आता नवा "अर्थ" काय ?

सामान्य

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शनिवार, 04/01/2014 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
तसा कविता हा माझा प्रांत नाही. फार्फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी लिहिलेली ही कविता आज जुने कागद धुंडाळताना समोर आली. म्हटले टाकूया मिपावर.

त्रास

लेखक सुबोध खरे यांनी मंगळवार, 24/12/2013 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात माझ्या मुलीचा वाढदिवस होता.म्हणून आम्ही मुलुंडलाच एका चिनी आणि थाय खाद्यसेवा देणारया हॉटेलात जायचे ठरविले होते.मुळात मधलाच वार असल्याने हॉटेलात गर्दी नसेल म्हणून आम्ही जायचे ठरविले होते.माझा दवाखाना साडेआठला बंद होतो. त्यादिवशी आठ पंचवीसला कोणी रुग्ण नाही म्हणून मी माझ्या स्वागत सहाय्यीकेला दवाखाना बंद करायला सांगून जिना उतरत होतो. आता शांतपणे हॉटेलात बसून छानपैकी जेवूया या विचारत होतो. एवढ्यात एक तरुण जोडपे पंचविशीच्या आत बाहेर ( बायको पंचविशीच्या आत आणि नवरा पंचविशीच्या बाहेर) चिंताक्रांत चेहेर्याने समोरून येताना दिसले.

गारठा!

लेखक amit_m यांनी सोमवार, 23/12/2013 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
नको वाटणाऱ्या अलार्मच्या कर्कश्य आवाजाने त्याला जाग आली…तो उठून बसला…यांत्रिकपणे करायच्या पुढच्या सगळ्या हालचाली आता अंगवळणीच पडलेल्या. उत्तररात्रीच्या त्या अखेरच्या प्रहरात शुभ्र चांदणं पसरलेलं. "थंडी आहे रे खूप…असुदे" म्हणत आईनं बळेच दिलेल्या गोधडीकडे पाहताना त्याला लहानपणीचा गारवा आठवला. आई कधीचीच उठलेली आहे. स्वयंपाक घरातल्या पिवळट बल्बचा प्रकाश डोक्यावरून घेतलेल्या चादारीतूनही आत पाझरायचा. वडील बाहेरगावी जायचे असले कि त्यासाठी आईची लगबग चाललेली असायची. आपल्याला जाग येऊ नये म्हणून दबक्या चालीनच ती सगळी काम करायची.

चायवाला -!_/~

लेखक तुमचा अभिषेक यांनी रविवार, 22/12/2013 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
काल आमच्या ऑफिसच्या चायवाल्याने गोंधळ घातला. घाबरला बावरला, डोळ्यात पाणीही आले बिचार्‍याच्या. २२-२४ वर्षांचा मुलगा म्हणजे अगदीच काही लहान नाही, आपला तर खास फंटर ! कधी आपण जागेवर नसलो तरी आठवणीने चहा ठेवतो.. बघावे तर तसे हे एकच कारण, खास असण्याचे. पण ज्या आपुलकीने चहा पाजतो त्याने स्वताला खास झाल्यासारखे वाटते. म्हटलं तर कुठलीही देवाणघेवाण हा एक धंदाच, पण त्यात थोडा भावनांचा ओलावा आला की त्याचे आपलेच एक नाते बनते. काल कदाचित त्याच नात्याने त्याला तारले. वॉशरूममधून जागेवर आलो तेव्हा त्याचे एकेकाच्या जागेवर जात चहा वाटपाचे काम चालू होते.

प्रामाणिक मत

लेखक इंद्रधनुष्य यांनी शनिवार, 21/12/2013 04:55 या दिवशी प्रकाशित केले.
आपुलकी, प्रेमभाव, माया ममता हे शब्द नुसत्या कानालाही किती गोड वाटतात. शब्दांचा स्पर्शही आकर्षक, मनोवेधक वाटतो. अनुभव तर सोडाच मायेची दोन शब्दासुद्धा दोना जन्मीचे पारणे फेडून जातात. शरीराची कसकस, मनाची धगधग शांत करुन एक मऊ मुलायम पांघरूण घालून जातात. सुखावून जीवाला पुनश्च धड़पडण्याची , जगण्याची जिद्न्यासा देतात. याउलट तितकारा, तिरस्कार, घृणा , मत्सर हवा हे शब्द उच्चारतानाच जिभेची सुद्धा घालमेलच होते ना. मग प्रत्यक्षातल्या अनुभवांचे काय. एखाद्याचा तिटकारा, तिरस्कार करणे, घृणा वाटणे, मत्सर किंवा हेवा करणे या सर्व भावनिक व्याधींच्या आधीन आपण का व्हावे? हां तर प्रत्यक्षात स्वत:चाच आजार.