Skip to main content

मुक्तक

संस्कृती

लेखक सार्थबोध यांनी मंगळवार, 20/08/2013 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृती जाहली मरणप्राय जगवणारी तुरळक गणती मेली संस्कृती केंव्हाच सर्वत्र जाहिरात होती ll १ ll संपली, काळवंडली संस्कृती उजळवणारी तजवीज थोडी गाडून टाकणारी तिजला गर्दी संपत नव्हती ll २ ll जमवाया लोक जागृतीस मित्रास कळविला मोर्चा बघू उद्या म्हणाला दुरूनच हात केला ll ३ ll दुष्परिणाम कथित प्रगतीचे तुडवीत संस्कृती होते मात्र लोकांना याचे अप्रूप काहीच नव्हते ll ४ ll रक्षणास बोलावता आले उपायास नव्हते विकृतीचे बसता फटके ते मोर्चात सामील होते ll ५ ll

सलमानभाऊ, लई भारी!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 20/08/2013 07:31 या दिवशी प्रकाशित केले.
दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या "लई भारी' या आगामी चित्रपटातून सलमान खान मराठीत पदार्पण करणार आहे. सलमानच्या कुठल्याही चित्रपटाप्रमाणे हा चित्रपटही दोनशे कोटींचा गल्ला जमवेल आणि सलमानला चित्रपटात घेण्यासाठी मराठी निर्मात्यांच्या रांगा लागतील, अशी शक्‍यता आहे. सलमानच्याच अनेक हिट हिंदी चित्रपटांवरून मराठीत रिमेक करता येऊ शकतो. काही उदाहरणं ः -ं पहिलं लफडं (मैंने प्यार किया) -लव्हरनं मारली टांग! (सनम बेवफा) -किरण्या-अज्या (करण अर्जुन) -घ्या मुका ः पार्ट 2 (खामोशी) -व्यक्ती तितक्‍या प्रकृती (अंदाज अपना अपना) -लफडी करणाऱ्या सगळ्यांसाठी (हर दिल जो प्यार करेगा) -तुझा-माझा काय संबंध?

बिनकांद्याचा श्रावण

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 20/08/2013 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
""आई, नक्की काय झालंय? बाबा चिडलेत कशानं एवढे?'' ""सांगते नंतर.'' ""अगं, सांग ना. आमच्यावर रेशन निघायच्या आधी त्याचं कारण तर कळू देत.'' ""बोकडाच्या मानेवर सुरी फिरवायच्या आधी त्याला सांगतात का, की बाबा गेल्यावेळी तू एकदा मला ढुशी दिली होतीस, म्हणून तुला कापतोय...?'' सौं.चा युक्तिवाद पटण्यासारखा होता. ""अगं आई, पण...'' कु. काहीतरी बोलणार, एवढ्यात श्री. फ्रेश होऊन हॉलमध्ये आले. त्यामुळे कु.नं तिचे पुढचे शब्द गिळले.

श्रद्धा

लेखक अर्धवटराव यांनी सोमवार, 19/08/2013 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. आज आम्हि एका कुलीन स्त्रीची फर्याद घेऊन मिपा दरबारी हजर झालो आहोत. या बयेचं नाव आहे श्रद्धा. हिच्या बद्दल आम्हाला अपार सहानुभुती, आदर, प्रेम आणि आपुलकी आहे (... नाहि, 'ति' श्रद्धा वेगळी आहे हो... एव्हाना ति लग्न वगैरे करुन सुखाने नांदत असेल.) हिचं गार्‍हाणं असं आहे कि येऊन जाऊन लोकं हिला उगाच टपली मारुन जातात. विचारवंत (अस्सल, आणि खरे अस्सल) हिला "त्या" गल्ली बोळातली असल्यासारखं तुच्छ समजतात, तर अविचारवंत (अस्सल आणि निव्वळ अस्सल) हिच्या नावाने काय वाटेल ते खपवतात.

(गड गड गड)

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 12/08/2013 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
(गड गड गड) पाऊस थांबायचे नाव घेईना खिडकीचे तावदाने थरारत थडथडतायत तावदानावर एक एक नीरओळ लिहून जातोय पाऊस गूढ, अनाकलनीय भाषेत (गड गड गड) ----- धडकी भरवणारा ढगांचा गडगडाट कौलांवरची टीपटीप थेंबांची लय चिंचेच्या पानांवरून सरकणारे ओघळ आणि खालच्या पत्र्याच्या डब्यावर होणारे त्यांचे आघात (गड गड गड) ------ खिडकीतून हे सगळे बिचकत बघणारा मी हातात तुझी आणि माझी लग्नातली तस्बीर त्यात हसणारी तू आणि तुला हसतांना बघून हसणारा मी (गड गड गड) ------ रस्त्यांवरच्या पिवळ्या दिव्यांमध्ये चमचमणारे ते चिंचेचे ओघळ डोळ्यांखाली निसटणारे ओले अश्रु स्स...
काव्यरस

सर्पमित्र

लेखक चाफा यांनी सोमवार, 12/08/2013 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
शप्पत, जॅक डी ची थट्टा करण्यासाठी नाही लिहीलेलं, बरंच आधी लिहीलेलं आज आठवलं, ********** " तुमच्या ऑफीसला मघापासून फोन करतेय, कुणीच उचलत नाहीये " " त्या तुम्ही होतात होय ? मला वाटलं परत कुणीतरी मस्करी करतंय, हल्ली लोकांना काही सिरीयसनेसच राहीला नाही. म्हणे "मी मुंगूस बोलतोय मला सापाची भीती वाटतेय", काय पण.. " " बरोबर आहे मुंगूसच बोलत होता फोनवरून " " म्हणजे त्या तुम्ही होतात ? आणि वर तोंड करून परत ऑफीसला येऊन मस्करी करताय ?

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं(९)

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 03/08/2013 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(१) http://misalpav.com/node/2158 : प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(२) http://misalpav.com/node/2266 :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(३) http://www.misalpav.com/node/2327 :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(४) http://www.misalpav.com/node/3153 :प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते(५) http://misalpav.com/node/3583

पाऊस एक चिंतन

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 03/08/2013 04:29 या दिवशी प्रकाशित केले.
थोडी प्रस्तावना: पाऊस म्हणजे नेमकं काय? वाट पहाणे? मिलनाचा आनंद? एक अनामिक हुरहुर? एक अविरत सुरु असणारा काळाचा, विश्वाचा अनंत प्रवास? कि आणखी काही? असे अनेक प्रश्न मला नेहमीच पडत आलेले आहेत. या प्रश्नांची उकल करतांना स्वतःच्या बुद्धीच्या मर्यादाही ध्यानात आल्या. मग एक दिवस या तिघीजणी भेटल्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे देऊन गेल्या आणि काही नवे प्रश्नही.
काव्यरस

डॉक्टर तुम्हीच सांगा

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 28/07/2013 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
परवा एका लग्नाला गेलो होतो त्यानंतर आमच्या मित्राचे सासर शेजारच्या बिल्डींग मध्ये आहे म्हणून त्यांच्या घरी( तिसर्या -पुण्याच्या भाषेत चौथ्या मजल्यावर) गेलो होतो. मित्राचे सासरे बुवा म्हणाले कि डॉक्टर आजकाल जरा काही खाल्ले कि पोटाला तडस लागते. एकंदर त्यांच्या पोटाचा आकार पाहून ते "जरा काही" खात असतिल असे वाटत नव्हते. म्हणून मी त्यांना विचारले कि साहेब तुम्ही आता धावत जिना चढता का ? त्यावर ते म्हणाले कि अहो मी रिटायर झालो तिसरा मजल धावत चढणे कसे शक्य आहे? मग मी विचारले तुम्ही चष्मा का लावता? ते म्हणाले चाळीशीचा चष्मा आहे. मी परत विचारले कि तुमचे अर्धे केस गेले आणि उरले अर्धे पांढरे का झाले?