Skip to main content

मुक्तक

ट्रंक, संदूक इत्यादी..

लेखक मस्त कलंदर यांनी मंगळवार, 22/04/2014 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे.

गडीमाणस

लेखक मालविका यांनी रविवार, 20/04/2014 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
आमच घर कोकणात असल्याने घरचा मुख्य व्यवसाय हा शेती होता . भातशेती आणि आंबा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन . त्यामुळे साहजिक घरात गडी माणसांची ये जा असायची . हि मानस घरचाच एक अविभाज्य घटक बनलेली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आमच्यकडे "गुण्यादादा"नावाचा एक गडी होता. खर तर वयाने तो माझ्या बाबांपेक्षा सुद्धा १० १२ वर्ष मोठा असेल पण सगळेच त्याला गुण्यादादा म्हणायचे . मी ऐकलय त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या ८ व्या वर्षपासून तो आमच्याकडे कामाला होता . अत्यंत विश्वासू आणि तेवढाच घरचा हक्काचा असा गुण्यादादा . शेतावर काम करून रंग अगदी काळपट झालेला. मध्यम पण काटक अंगकाठी .

अंगठी अनामिकेत का ?

लेखक अक्शु यांनी गुरुवार, 17/04/2014 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
विवाह निश्चित झाल्याची खूण म्हणून वाग्दत्त वधू आणि वर एकमेकांच्या अनामिकेत अंगठी घालतात.ही अंगठी अनामिकेतच का घालतात? दुसऱ्या बोटात का नाही घालत? . . एका तत्त्ववेत्त्याची ही एक सुरेख मांडणी पाहा. ......... . . त्याच्या मते, आपला हात म्हणजे दहा बोटे.

हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं...

लेखक माधुरी विनायक यांनी मंगळवार, 15/04/2014 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वा म्हणजे धमाल मस्ती, पूर्वा म्हणजे अखंड बडबड आणि चैतन्याचा धबधबा... पूर्वा म्हणजे आमचं एकुलतं एक कन्यारत्न. वय वर्ष साडेचार. तिला नाचायला आवडतं, गायला आवडतं. आई-बाबा जेवायला बसले की त्यांना जेवण वाढायला आवडतं, फोटोसाठी वेगवेगळ्या पोझेस द्यायला आवडतं... ही ‘आवडतं’ प्रकारातली यादी खूप मोठी लांबलचक आहे. त्यामुळे त्याविषयी अधनं-मधन बोलत राहूच. तर अशी ही आमची कन्या बोलतेही भरपूर आणि अनेकदा अगदी सहज आमची विकेटही काढते. परवा असेच आम्ही बाईकवरून चाललो होतो. मुलुंड ते शिवडी असा प्रवास. तिच्यासाठी तो सुद्धा तसा जास्तच.

किंग, क्वीन नि आणखी काही.

लेखक प्यारे१ यांनी शनिवार, 12/04/2014 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक स्त्रीच्या मनात एक क्वीन असते म्हणे. ती सापडण्याचा क्षण टिपणं आवश्यक असतं. पुरुष तरी का अपवाद असावेत? क्वीन सापडणं हा स्वत्व गवसण्याचा क्षण असावा असं तो चित्रपट पाहिलेल्या लोकांची मतं वाचताना जाणवलं. तसंच असेल! .................. सातवीच्या वर्गात असलेला पण वर्गात कधीच न बोलणारा मुलगा शिक्षकांच्या आग्रहामुळं एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतो. स्पर्धेवेळी सगळ्यांची भाषणं ऐकून हातपाय गळपटलेला, काय बोलायचं ते न आठवता जसं सुचेल तसं धाडकन बोलून खाली बसतो. नंतर स्पर्धेत तिसरा मिळालेला क्रमांक. इथं 'किंग' सापडत असेल का? ----------------- नुकताच दहावीला चांगले मार्क मिळवून कॉलेजला आलेला तो.

गोची...

लेखक माधुरी विनायक यांनी सोमवार, 07/04/2014 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळची वेळ... साधारण साडेसहा-पावणेसातचा सुमार. मी माझ्या नेहमीच्या बस स्टॉप वर उभी होते. काही वेळाने बस आली आणि मी बसमध्ये चढले. चक्क पुढचा स्टॉप येण्यापूर्वी बसायला जागा सुद्धा मिळाली. कंडक्टर साहेबांना पास दाखवून नेहमीप्रमाणे बॅगमधून पुस्तक काढलं आणि वाचू लागले. साधारण एखादा स्टॉप मागे पडला असेल आणि शेजारी उभ्या बाईकडे लक्ष गेलं. ती गर्भवती असल्याचं दिसत होतं. अर्थात राखीव जागेवर ती बसू शकली असती, पण तोवर बसमध्ये चांगलीच गर्दी झाली होती. कदाचित धक्के खात पुढे जाण्याऐवजी इथेच थांबावं, असा विचार तिने केला असावा.

पहिला दिवस…महाविद्यालयातला!

लेखक भाते यांनी सोमवार, 07/04/2014 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
दहावीचा निकाल लागल्यावर चिंता, काळजी आणि ऊत्सुकता होती ती महाविद्यालयाची. मध्यमवर्गीय कुटुंबांतुन आलेला असल्यामुळे तोपर्यंत माझे जग फक्त शाळा आणि घर इतकेच मर्यादित होते. महाविद्यालयात पाऊल टाकेपर्यंत मला त्या बाहेरून गोंडस पण आतुन भयानक असलेल्या जगाची कल्पनाही नव्हती. बरोबर कोणीही मित्र नसल्याने मी घाबरतच पहिल्यांदा महाविद्यालयात पाऊल ठेवले. माझ्या स्वागतासाठी तिकडे एक चौकडी माझी वाट पहात ऊभी होती. तिन मुलं आणि एक मुलगी. एकाने हसत मला माझे नाव विचारले. घाबरतच मी त्यांना माझे नाव सांगितले. दुसरा, इतरांकडे पहात म्हणाला, "मराठी!" मी काहिही न बोलता फक्त मान डोलावुन होकार दिला.

डोंबिवली कट्टा वृत्तांत

लेखक भाते यांनी शनिवार, 05/04/2014 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
कट्टा ऊत्त्सवमुर्ती निनादने सुचवल्याप्रमाणे दरवेळी एकानेच संपुर्ण वृत्तांत लिहिण्याच्या प्रथेला छेद देऊन कोणीतरी एकाने सुरुवात करून बाकीच्यांनी त्या वृत्तांतांत प्रतिसादांमधुन भर घालायची असे ठरल्याने वृत्तांतांची सुरुवात करण्याचे काम माझ्यावर ढकलण्यात आले. साडेसातच्या सुमारास नंदी पॅलेस येथे जमायचे ठरले असल्याने मी हॉटेलसमोर जाऊन इतरांची वाट पहात ऊभा होतो. माझ्या समोरच आणखी एक गृहस्थ इतर कोणाचीतरी वाट पहात ऊभे होते. निनाद आल्यावर एकमेकांची ओळख करून घेऊन आम्ही दोघे आतमध्ये शिरलो.

एक काहीतरी……

लेखक चिनार यांनी गुरुवार, 03/04/2014 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
मामाचं पत्र हरवलंय की पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ? एक काहीतरी नक्कीच हरवलंय ! कोंबड्याचं आरवण थांबलंय की ती सकाळ व्हायचीच थांबलीय ? एक काहीतरी नक्कीच थांबलय ! पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ? एक काहीतरी नक्कीच राहिलंय ! मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ? एक काहीतरी नक्कीच करपलय ! संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ? एक काहीतरी नक्कीच झालंय आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ? एक काहीतरी नक्कीच वाढलंय शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?

काही प्रश्न (?)

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 03/04/2014 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
सोनियांची एकूण मालमत्ता ९ कोटी २८ लाख राहुल गांधीना ९ लाखाचे कर्ज दिले आहे. (आई चे मुलाला कर्ज) सोनियांकडे स्वतःची कार नाही आता असलेली मालमत्ता ५ वर्षापूर्वी जाहीर केलेल्या मालमत्तेपेक्षा ६ पटीने अधिक आहे. असे असून सुद्धा सोनिया मस्त पैकी भारतभर विमानाने फिरतात, परदेशी उपचारासाठी जातात. त्यांचा पोटापाण्याचा व्यवसाय काय? माहित नाही. राहुल गांधींचा काय ते सुद्धा माहित नाही. या दोघांना खान्ग्रेस पोसत असेल असे गृहीत धरले तर मग खान्ग्रेस कडे एवढा पैसा येतो कुठून? मागे एकदा ऐकले होते कि सोनियाजींनी स्वत:च्या मालमत्तेचे विवरण द्यायला नकार दिला होता. मी असे केले तर चालेल का ?