Skip to main content

मुक्तक

सगळं कस साधं सोप्प

लेखक अबोली२१५ यांनी शुक्रवार, 30/09/2016 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
सगळं कस साधं सोप्प एक घर, एक गाडी आई बाबा आहेत ना फ्रेम मध्ये एक मुलगी पण मुलगा पाहिजेच आणि बायको अन मी...

श्रावण...

लेखक राजेंद्र देवी यांनी शुक्रवार, 30/09/2016 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण... फेकून चादर काळोखाची सोनपावली उन्हे उतरली वारा शीळ घाली धरती नवचैतन्याने थरथरली पावसाच्या शिडकाव्याने हिरवी काचोळी भिजली लेऊन हार नवकुसुमांचा नवयोवना जणू हि सजली घेण्यास बाहुपाशात नभ टेकले क्षितिजा पलीकडे उधळीत सप्तरंग आकाशी इंद्रधनुकली हि अवतरली राजेंद्र देवी

मनाचा एकांत - काळे पाणी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 30/09/2016 07:55 या दिवशी प्रकाशित केले.
अंदमानातले काळे पाणी, कोलूबेड्याहंटरकदान्न सोबत तीव्र अपमानाचा overtime ! साम्राज्याचा उग्र दर्प अन देशाने केलेली प्रेमळ उपेक्षा....... असे सगळे, अन वरती थोडी जयहिंदची जाळी ! या जीवघेण्या विषाणूजिवाणूंमध्येही, काही काही रक्तांचे malnourishment कि काय ते झालेच नाही! उलट, तुरुंगाच्या अजस्त्र काळभिंतीही त्यांच्या जहालहळव्या लेखणीने cultured झाल्या! मातृभूमीच्या मृत्युंजय विरोत्तमांसाठी, . . . दुसरं काय होता एकांत म्हणजे तरी! - शिवकन्या

ऊरी...

लेखक अर्थहीन यांनी गुरुवार, 29/09/2016 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
पहाटे झोपेत असताना काशमीरात तैनात असलेल्या मराठा लाईट इन्फन्टरीतल्या एका मित्राचा फोन येतो...... आवाज कमालीचा दबलेला... माझा जीव कातरून जातो... . तो म्हणतो- सच्या घरी फोन कर रं माझ्या ---बायको -दोन बारकी लेकरं -कुणीच कशी फोन उचलनायती... आता ड्युटी संपली- पहाटेपासणं करतोय फोन... . . मी त्याच्या घरी फोन करतो... 12-13 वेळात एकदाही फोन उचलला जात नाही... काळजी वाटायला लागते........ . . गावाकडच्या एका मित्राला त्याच्या घरी जाऊन यायला सांगतो... . . परत फोन करतो...

काजळरेषा

लेखक राजेंद्र देवी यांनी गुरुवार, 29/09/2016 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
काजळरेषा का भिरभिरते नजर तुझी? ओलांडू नको रेषा काजळाची वाटत नाही का भीती कोणा रावणाची ठेव जाणीव लक्ष्मणाच्या वचनांची नको देऊस कष्ट वनवासी रामाला नको देऊस प्रश्न या समाजाला अग्निदिव्य शेवटी तुलाच आहे भूमीत जन्म अन भूमीतच शेवट आहे राजेंद्र देवी

ठिकरी

लेखक राजेंद्र देवी यांनी बुधवार, 28/09/2016 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
ठिकरी पडू दे चांगले दान मिळू दे यशाची शिडी नकोत ते सर्प जागोजागी आयुष्याची सापशिडी सापडू दे लगेचच लपलेले सुख नकोच सापडू दे दुःख आयुष्याचा लपंडाव मिळू दे सुखाचा झेल जिंकेन सर्वदा मी जाऊ दे दुःखाची विकेट आयुष्याच्या सामन्यात पडू दे चांगल्या घरात या देहाची ठिकरी नको होऊ दे स्पर्श या दुर्भाग्याच्या रेषांचा राजेंद्र देवी

व्यथा

लेखक राजेंद्र देवी यांनी मंगळवार, 27/09/2016 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
व्यथा भावनेचा कोंडमारा घाव जे जिव्हारा कसा आवरू आता आयुष्याचा पसारा सांगू व्यथा कोणाला आहे कोण ऐकणारा कसा आळवू न कळे सुना सुना देव्हारा गुंतलास कोठे तू कोणास उध्धारा व्याकुळले नयन दे दर्शन परमेश्वरा राजेंद्र देवी

साम दाम दंड भेद

लेखक राजेंद्र देवी यांनी सोमवार, 26/09/2016 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
साम दाम दंड भेद आमच्या घामाला दाम नाही हे रामा, आता जगण्यात राम नाही किती हि कष्ट केले तरी कनवटीला छदाम नाही नियतीला पण काही ना वाटे परिस्थितीशी साम नाही अहोरात्र धडपडतो पण वेदनेला बाम नाही भरल्या गोकुळात भरकटतो भेटत अजून श्याम नाही गतजन्मीच्या कर्माचा दंड हा ह्यात काही भेद नाही जगण्याशिवाय तरी आता या जगात दुसरे काम नाही राजेंद्र देवी

ईती स्थितप्रज्ञ लक्षणं – स्थितप्रज्ञम - इदं न मम !!

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी शनिवार, 24/09/2016 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
स्थितप्रज्ञ म्हणजे काय याची अनेक लक्षणं वेळोवेळी संत-महात्म्यांनी सांगून ठेवलेलीच आहेत. आता मी सांगतो (म्हणजे मला पहा फुलं वहा). तर.. जसा जसा मानव “डार्विन काकांनी” म्हंटल त्या प्रमाणे उत्क्रांत का काय ते होत गेला , तशी तशी त्यातली स्थितप्रज्ञ लक्षणं पण बहुदा बदलायला लागली. सबब , कलीयुगातले स्थितप्रद्न्य म्हणजे एक वेगळी जमातच आहे महाराजा !!
चेहऱ्यावरी मंद भावे , निवांतपणे जो कान खाजवे , ना कोणाशी हेवे दावे , तो एक स्थितप्रद्न्य !!
ई.स. २०१६ संत ज्याक (ग्रंथ-ज्याकाई मधून) (म्हणजे मीच्तो) तर मी आणि असे स्थितप्रज्ञ , आमचं अन यांचं फार जुनं नातं आहे.

राया...

लेखक राजेंद्र देवी यांनी शनिवार, 24/09/2016 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
राया... मखमली मंचकी पसरली, मखमली काया, नका सोडून जाऊ, नका ना जाऊ राया ॥ध्रु॥ करून बसले मंचकी थाट किती दिवस पाहिली वाट उगवेल आता चैत्री पहाट सोनचाफ्याचा सुटेल घमघमाट अत्तराच्या लावल्या या समया नका सोडून जाऊ.... ॥१॥ ल्याले शालू भरजरी देह झाला आज शेवरी ठेवा बाजूला तुम्ही शेला घ्या अलगद कवेत मजला जाईल ज्वानी माझी वाया नका सोडून जाऊ.... ॥२॥ राजेंद्र देवी